Saturday, December 27, 2008

जगण्याचे गाणे नसते

जगण्याचे गाणे नसते,
असते केवळ बहाणे.
जो टाहो फ़ोडी नशिबाला,
त्याचे तर केवळ नाणे.
जगण्याचे गाणे नसते....

असतात केवळ गरजा,
त्या पुर्या करण्यास मग्न.
जो करतो कुणाच्या राखुन,
त्याचे तर व्यर्थ जगणे.
जगण्याचे गाणे नसते....

होते डोईजड जगणे,
श्वास ही उधार मागतो.
आकाशी बघतो आशेने,
दिशा गाठण्या थकतो.
क्वचीतच येतो हाथ कुणाचा.
तोवर जीव निसटून वेदना उरणे.
जगण्याचे गाणे नसते....

मनावर झालेल्या वेदना,
त्यांचे घाव ही असती कोवळे.
वाट कशाची बघु कळेना,
हे परतीचे जल्लोश सोहळे.
ताम्रपटावर जीवनाच्या मग,
भावनात हरवुन झुरणे.
जगण्याचे गाणे नसते....

कुठवर शोधत केवळ,
चालणे हा रस्ता एकटा.
बिकट ठरती वाट प्र्त्येक,
प्रवास्याला मारी फ़टका.
असं जगण्या पे्क्षा अवचीत
बेहतर ठरेन मरणे.
जगण्याचे गाणे नसते....

घेतला मी निरोप नुकताच,
परतीची तयारी करते.
थांबले कुठे अगदीच ,पुन्हा
ह्या शब्दात वेदना गवसते.
काय तारीफ़ ह्या शब्दांची,अमर असुन
ह्या कडुन मरणाचे बळ मिळणे.
जगण्याचे गाणे नसते....

D shivaनी
Nagpoor

Wednesday, December 24, 2008

नागपुरी कानफ़ट


सांज होताच आम्ही,निघालो फ़िरायला.
हाथाथ माझी बाईक,नटून गाव मिरवायला.

मी माझी बाईक,सोबत कयनेटीक.
आम्ही चार मैत्रिणी,स्पीड नव्हती झुईक.

चौकात पुढच्या,दोन मुलं आहे सोबतीला,
कधी मला,कधी टापे माझ्या सखीला.

आम्ही पण जरा नयन सुख घेत होतो,
पण त्याम्ची मजल कद्चीत जास्तच वाढवत होतो.

एकाने जवळ येऊन म्हटले,
"क्या प्रिती झींटा लगती है."
आणि घेतली कीक स्टार्ट.

आम्ही पण नागपुरी मुली.
केला सुसात पाठलाग.

पुढल्या चौकात सिग्नल वर जाऊन त्याला विचारले,
भैया.....
भैया.....
excuse me....
मै आपसे बात कर रही हु,
ब्लु शर्ट,आपसे.........

त्याने वळुन बघितलं,
आणि चौकातल्या सगळ्यांनी....

त्याला विचारलं,
"भैया हम मे से प्रिती झीटा कौन?"

वो आपने पिछले चौक मे बोला था ना,

वो क्या है ना,फ़िर हमारे मे झगडा हो जाता है,
क कौन प्रिति झींटा दिखता करके......

खरं सांगते,त्याचा चेहरा जाम पडला होता,
आणि चौकात ्प्रत्येकाच्या चेहर्यावर ह्शा पिकला होता.....

माझ्या मैत्रीणीने विचार्ले हे काय होतं?

मी म्हंटलं,नागपुरी कनपट.........

आता अयुष्यात कोणाला प्रिती झिंटा बनवणार नाही तो,
दिसलीच राखी सावंत तरी पाय धरेल तिचे तो.......

कमाल आहे,नागपुरी कानफ़टीची...........

D shivaनी
Nagpoor

Monday, December 22, 2008

स्वस्तं हास्य

आजवर मी हसण्याला सुद्धा वजनाच्या काट्यात तोलायची.
दुखःला हलकं करुन ,हसण्याला नेहमी स्वस्तं ठरवायची.

आज चायला काही तरी वेगळच झालय.
मीच स्वतःला आज वेगळच बघितलय.

गाडीत नेहमी प्रमाणे ड्रायव्हर सीट वर बसुन गाडी वेगाने पळवली.
तोच वेग,तिच दिशा पण अचानक स्पीड कुठेतरी कमी झाली.
त्याने हाथ गेयर स्टिक वर माझ्या हाथावर ठेवला.
आणि खरं सांगते,माझ्या आयुष्याचिच स्पीड consistent झाली.

आज मझ्या मनाला त्याचा सारखं कोणीतरि दिसलं होतं.
पापण्यांनी आता पापण्यांनीच पांघरल्ं होतं.
माझ्या थरथरणार्या श्वासांना कशाची तरी ओढ होती.
जग जिंकणारी मी त्या दिवशी मी स्वतःशीच हरली होती.

गाडी तीच,फ़क्तं जागा बदलल्या,
मी फ़्रंट सीट ला बसते खरी,ड्रायव्हर तेव्हडा बदलला.
माझ्या हाथात स्टेअरींग च्या जागी त्याचा हाथ असतो.
अनामिक नात्यात,मी माझा दादागीरी स्वभाव हरवला.

नेहमीचे वारे आज ब्रुटस बनलेत माझा साठी.
त्या़च्या साठि मी स्वतःला सीझर बनताना बघितलय.

वार्यानी धरला त्याचा धावा नेहमी,आज मी पण त्याच दिशेने निघालीय.
का असं होतय?
प्रश्नं पडला मला,
महाग वाटणारं हास्यं इत्क्या स्वस्तात कसं मिळतय?????

D shivaनी
Nagpoor

Friday, December 12, 2008

तुझीच आठवण येते......

संथ किती 
हा वेळ जाई,
तुझीच वाट
हुरहुर लावी.

येणार का
तु कातरवेळी,
तुझीच वाट
दिस मावळी.

मी आतुर
दर्शनाला,
तुझीच वाट
स्पर्ष रिझवी.

मधाळ से
हसणे तुझे,
तुझीच वाट
ओठ फ़ुलवी.

D shivaनी
Nagpoor

Monday, December 1, 2008

आज मन

आज मन मा्झं आक्रोश करत नाही.
पण ह्रुदय मात्रं हुमसुन रडतय.
सारं का्ही,रोज सारखच,पण
ह्रुदयातुन आ्ठवणीचं रक्तं गळतय.

चौघडे सनई वाजती त्या पलीकडे,
एकटेपण वणव्याचं रुप घेतय.
केळीचे खांब,आंब्याचं तोरण लावलय तेथे,
येथे क्षितीज दुखःत वाह्तय.

गाभर्यात त्याने दुर केलं मला,
मी त्याच क्षणी,स्व्तःला संपवलय.
आता फ़क्तं श्वासांना ओढतेय,
मरुन स्वतःत त्याला जगवलय.

पापण्या थकल्यात माझ्या,
अश्रुंचे पुर लोटता.
त्या तरळत्या पण्यातही,
मी तुला बघितलय.

कैकदा मी प्रयत्नं केला,
विसरुन जाईल म्हणते.
स्वतःलाच विसरुन मी,
आठवणींना स्मरतेय.

D shivaनी
Nagpoor

Tuesday, October 28, 2008

राजे तुम्ही रक्त सांडले स्वराज्यासाठी

अजुन एक विनंती आणि एक छोटी चेतावनी,
की की जागे व्हा,सर्वं राजनितिचे दलालहो जागे व्हा,


राजे जरी नसले आम्च्यात,त्यांची जिद्दं
आमच्या रक्तात ते भिनली आहेत.
आणि सांडले रक्तं भुतकाळात,त्याची
आजही सल आमच्या मनात जागवली आहे.

ऎकु अजुन काही काळ,आम्हाला रस्त्यावर उतरऊ नका,
लाज ठेवा किमान तुमच्या माय बापाची,
ज्यांचे मीठ खाल्ले त्यांना बेईमान होऊ नका.

’हे स्वराज्यं होणे आहेच’
ही राजांची इच्छा पुर्णं करण्यास उठुन पेटलो.
पुन्हा नव्याने भगवा फ़डकवण्यास,मराठे आम्ही सिद्ध जाहलो.

जागतोय मराठी

तुमचाच कुल्हड जेव्हा माणुस गाडी खाली चिरडतो,
लायकी नाही कुणावर शिंतोडे उडवण्याची,
म्हणुन मराठी वरच डफ़रतॊ.

लोकल थांबवा म्हणतात,कारण महाराष्ट्रात ती बनत नाही.
नका नं चाटु पाय तिचे जिला ईटालीयन शिवाय काहीच उमगत नाही.

चारा खाउन अजुनही भरले नाही पोट,दडपत नाही का छाती?
तरी मुजोर मेले आमच्यात येउनच म्हणतात,आमचा देश आमची माती.......

गणपती ला म्हणे ह्यांनी हिमालय वासी बनवलं.
का विसरले हे जाहील,की मारठी लोकमान्यांनीच
ह्यांना मनामनात आणि नसानसात जगवलं.

गाड्या आणि बसेस चा स्टाफ़ बदला म्हणतात राज्याच्या हद्दिवर.
आजवर आम्हिच आमच्या ताटातल्ं तुमच्या सोबत वाटलं.

भांडकुदळ,अरेरावी तुमचाच मोटॊ,तुमचा स्वभाव,तुम्ही अहंकारानी सांगता.
आज आमच्या हक्का साठी,माती साठी लढलो तर जिहाद म्हणता.

Saturday, October 25, 2008

कधी न कळले मजला

कधी न कळले मजला,प्रेम कशाला म्हणतात?
कधी न कलले मजला,भवना कश्या जपतात?
भोवले मज सदैवं एकटेपण गर्दीत,
कधी न कळले मजला,मित्रं का परके वाटतात?

का मित्रांची मैत्री आज कमी वाटु लागली.
वाळवंटात पण,पाणी ही का कोरडे वाटु लागले?
उगा केला बोभाटा,त्यांनी सोबत असण्याचा.
कधी न कळले मजला,तारे का रात्रीच गळतात?

चालले मी तिमिर गतीने,काळोखाच्या दिशेने,
वाटेत तारे रवी,मी परतवण्याच्या प्रयत्नाने.
लख लखाट मज नकोसा आता,नको ती गजबज.
कधी न भोवला प्रकाश मजला,काळाचे केवळ पार बदलतात.

आज वाजली टाळी माझी एका हथाने,
नको आता मज दुसरा हा निनाद करण्यास.
प्राक्तन माझे व्हावे आता निश्चल शांतीत.
उगा करुन प्रपंच,का भगव्य मनाला कोंडतात???

D shivaनी
Nagpoor

Wednesday, October 22, 2008

धेय बांधणी

एक ध्येय निश्चित झालं,
की वाट आपोआप सापडते.
हजार कारणं न करण्याला देण्याऎवजी,
एकच कारण करण्यासाठी पुरेसं ठरते.

सुरुवात करायला फ़क्तं
एक स्टार्ट कारायचं असतं.
ध्येयावरच प्रेम करत,
वादळ प्यायचं असतं.

सुरुवात तर करायची आहे,
अपयश पचवण्याची
सवय करायची आहे.
एकदा का अपयश गवसल
की यशाच टेलीग्राम आपोआप येतो.
फ़क्त तो वाचण्याची पद्धत शिकायची आहे. ....

तेव्हा..

तुझीच वाट,जगताला ह्या
अर्जुन संयम कायम ठेव.
एका यशाची देणे मोठ्ठी कींमत,
राधेय दान मानी रुझव.

अडथळे येतील रोजच मित्रा,
मीरेसम भक्ती ह्रुदयी वसव.
प्राक्तन असेल तुझेच आसमंत,
नैवेद्द्यी एकलव्यी निष्ठा चढव.

D shivaनी
nagpoor

घुसमठ

नावांपुढे वलय चढलं की एक भलतीच दिशा मिळते.
पण...
आमचं काय?चायला कोणी कुत्रा सुद्धा विचारत नाही.
किमान मागे राहुन,मागे राहण्यात तरी मोठे होऊ म्हंटलं,
तर गुपचुप मागे ही राहु देत नाही.
आता काय,तर फ़क्तं वाहवा करत मागे राहायचं.
आवाज उठवला तर एकटं चिरडुन टाकण्याची भीती असते नं.
वलय असतं ना,त्यांच्या पुढे,सोबत गर्दी पण.
म्हणुन आजकाल असं गर्दीत मिसळुन राहण्याची सवय झाली आहे.
खुप तिर जरी नसले तरी,किमान आपले काम सातत्त्याने करण्याची सवय झाली आहे.

D shivaनी
nagpoor

Friday, October 10, 2008

भटकंती

क्यु हर राह छुटती चली गयी,
जो तेरी ओर जाती ही नही .
क्यु हर निगाह चुभती है,
जॊ तेरी होती ही नही.
संभाला तो ले ही लिया साजन,
तेरे गम के हौसले से,
क्यु हर नफ़्ज सुलगती है,
जो तेरे नाम नही होती.

नगमे तो बहोत जीये,
कुछ तुझे भुलाने मे,
कुच्छ तुझे भुलकर बरबाद कीये,
जींदगी हर मोड ,एक नया इम्तीहा
लेती है.
कुछ पल तेरी याद मे खोकर,
कुछ तेरे तरानो से आबाद कीये.

अजीबसे मतलब निकलते है,
रिश्तो से यहा,
तेरे इन्कार से भी रिश्ते की एक
डोर बांधली.
कभी तेरे गम के शुहाओ मे
इस कदर खो जाती हू,
बस उन्ही चार पलो मे मैने
अपनी जिंदगी समेट ली.

नही जीना अब तेरी राह तकते मुझकॊ साजन,
खुदको कबसे तुझमे मिटा चुकी हु.
फ़ना किया है अरमानो को तेरी मोहब्बत मे,
खुदको तुझ्पे कबसे लुटा चुकी हु.

अपनो ने ही जखम कुछ इस कदर दिये,
हम अप्अने आप से बेगाने हुए.
इसीलीये गैर बन गये खुद उनके लिये,
अश्कोंको हसी मी दफ़नाये,हम सौ मौत जिये.

उसको भी खुश्स्नसीबी समझेंगे हम अपनी,
आखीर मे क्यो ना हो,पूछा तो सही.
हमसे कुछ इस कदर जुदा हुए है,
के उन्हे हमारे जीने की भी कोइ जुस्तजु नही.

D shivaनी
nagpoor

Monday, October 6, 2008

नागपुर

नागपुर,
दिलखुलास जगणार्यांचं,
मनापासुन खाणार्यांचं शहर.

सकाळ्च्या पोहे तर्रीला,
केशव च्या आलु बोंड्यांना.
टप्री वरच्या सिगारेट ला
नागपुर शिवाय तोड नाही.

घुगरेंच्या वडापाव ला,
तेलंगखेडी च्या समोस्याला,
यशवंत स्टेदिअम च्याशिकंजी ला
नागपुर शिवाय तोड नाही.

बजाज नगर च्या पानीपुरीला,
धंतोलीत्ल्या पावभाजी ला,
राम भंडारच्या लस्सीला
नागपुर शिवाय तॊड नाही.

हल्दिराम च्या मोतीचूरच्या लाडुला,
हीराच्या काजुकत्लीला,
घाटे च्या मसाला दुधाला,
नागपुर शिवाय तोड नाही.

अस्स्ल सावजी जेवणाला,
धाब्यावरच्या अंडाकरीला,
नाक्याजवळच्या चिकनला,
नागपुर शिवाय तोड नाही.

नागपुरात अस्सल चटखोरे राहतात.
जगण्यासाठी खाण्याऎवजी,
खाण्यासठी जगतात.
दिलखुलास व्यक्तिमत्वं,
बिन्दास्त शैली,
जिभेचे लाड,जगवेगळी मैत्री,
रत्रीच्या पार्ट्या,
ट्प्री वरचा चाहा,सोबत globalisation च्या
स्पर्धेतलं आपलं स्थान,
ह्या सगळ्याच्या समीकरणाला
नागपुर शिवाय तोड नाही

D shivaनी
Nagpoor नागपुर,

Wednesday, September 10, 2008

माझं निराळं अध्यात्मं...

लोकं बाराही महीने
अठराही काळ माळी जपतात,
आणि मनातुन
मात्रं समोरच्याचं काळं मागतात.
आणि ह्याला लोक
अध्यात्मं म्हणतात.

असं होतं बरं का?
बरेच असे भेटतात सुद्धा,
मी ही त्यांचा मार्गावर
चालावं म्हणुन
फ़ोर्स पण करतात.

पण माझं जरा वेगळच आहे.
मला मनःशांती मिळायला,
हिमालयावर कीवा मठात
जाण्याची गरज कधीही भासत नाही.
आणि भगवंता थॅंक्स,
स्वतःच्या ताटातला घास
भुकेल्याला दिलं ना,
रस्त्याच्या कडेवर थांबुन गरजुला
साईड दिली नं,
की गजबजलेल्या CCD मधे सुद्धा
ती शांती मिळते.
लोक ह्याला माझी पैशाची ऊधळण म्हणतात,
पण माझ्या dictionarइत ह्यालाच अध्यात्मं म्हणतात.

देवाचा वास असावा म्हणुन लोक
धुप दीप लावतात.
म्हणतात की सुगंधात देव वसतो.
पण मला सकाळी सकाळी
मारलेल्या पोहाच्या तर्रित पण हा आनंद लाभतो,
स्वतःसोबत चार गरजुन्ना आणि मित्रांसोबत
ताव मरतांना मनाला देव आनंद भिडतो.
लोक ह्याला माझा अगाउ पणा म्हणतात,
पण माझ्या dictionarइत ह्यालाच अध्यात्मं म्हणतात.

D shivaनी
nagpoor
30 aug 2008
हा एक संवाद आहे माझा आणि राहुल दा आणि सन्तोष चा.
लाल अक्षरं राहुल दा चा reply आणि निळे अक्षरं संतोष चा.
आणि काळे अक्षरं माझा reply.
तेव्हा एक संवाद म्हणुन वाचा आणि कळवा.

माझ्या रुक्षं वाळवंटी जीवनात
नं जरा वेगळच घडलय.

पहीले पालवी फ़ुटली,
ती बहरु लागली.
एका शिकारीने तुला उपटलं.
मात्रं माझ्यात बोन्साय ठेवलं.
आणि मग माझ्यात आभाळ
दाटुन आले,सरी आक्रोषाने
कोसळतात आजही.

माझे आयुष्यं पावसातलं वाळवंटं.
म्हणजेच एक नेहमी वाढत जाणारा
एक अथांग समुद्रा.
नेहमी वाढत जाणारा.
-------------------------------
मी जगते तशी तुझ्यातच,
तुझ्यातच मी निजते.
कधी मोहरावा सुगंधं प्रेमाचा,
म्हणुन चंदनावाणी झिजते.

मी हुंकारते नाम तुझे,
तुझेच चित्रं स्मरते.
मालावलीस ज्योत तु तुझी.
मी सतःला विझवते.

--------------
बोन्साय
खुज नाही .....
छोटं नाही ......
एका चिमटीत मावणारं
ब्रह्मांड !
एका हातात मावणारं
आभाळ !
ज्या पांगळ्यांना नाही ना बघता येत अवकाश
ज्या आंधळ्यांना नाही ना सांधता येत प्रकाश
त्यांच्या साठी
तुझी निर्मिती.......
ब्रह्मदेवाच्या कमंडलूतल्या तीर्थाला आव्हान
देणारी तुझी दुनिया
सारच लाजवाब !
-----------------------

असेलही मी एका चिमटीत मावणारं ब्रह्मांड,
असेलही एका हाथात मावणारं आकाश.
पण...
ज्याच्या अस्तित्वाचं जग मी मानते
त्याचा साठि तर एक खुंट्लेलं झुडुपच ना?

खुप वेदना होतात रे,
जेव्हा माझ्या खुंट्लेल्या वाढिला
सुद्धा लोक एक creative नीर्मिती म्हणतात.

---------------------------

तु निघुन गेल्यावर मनाला खुप घट्टं बांधलय मी.
दोरखंडांनी केलेल्या प्रेमाच्या,कुलुपही लावलय.
मी असते तीथेच,त्याच खोलीत.
अधुन मधुन खिडकीही ऊघडते,
आणि वाट बघते तुझी फ़क्तं तुझी...
किमान आज तरी येउन,ह्या मनाचं
दार उघडुन आत येशील,
बाहेरचं जग तुझ्या डोळ्यात घेउन...?

---------------------------------

तुझ्या विचारात,आठ्वणीत
एकदा फ़क्तंएकदा मरुन
मग निवांत तुझीच म्हणुन
जगेन मी

काय म्हणतो?

कोणाला कानोकान खबरही नाही होउ देणार,
की तुझ्या साठी जीव दिला म्हणुन,
तु फ़क्तं एवढी कबुली दे की,
तु स्वतः माझ्या नसुन असण्य़ाला
प्रचीती देशील.
मग

तुझ्या विचारात,आठ्वणीत
एकदा फ़क्तंएकदा मरुन
मग निवांत तुझीच म्हणुन
जगेन मी

काय म्हणतो?
----------------------------

विरहिणी तू
आभाळाचं मोकळं भान
आणि वा-याचा पदर घेउन
जगणारी तू......
अग् विरहीणी.....
तुझ्या मिठीत असतानापण
तुला नाही जाणवला
माझ्या स्पर्शातला बाजारीपणा..?
तुझ्या केसातुन हात फ़िरवत असताना
माझ्या हातातली थरथर
नाही वाटली कॄत्रिम...?
विरहीणी तू.....
तू तर माझं पा-याचाच रूप
तुझ्यात गोंदुन ठेवल आहेस......
आणी मी असाच
तुझ्या केसातल्या मोग-याचा
वास घेणारा....
अलगद तुला हातावर घेउन
आकाशातुन फ़िरवुन आणणारा.....
माझी म्हणुन जगेन म्हणतेस.....
कशाला आग्रह या मुसाफ़िराला
एका उंब-यात अडकवुन ठेवण्याचा...!!
विरहीणी तू !!!!!!

------------------------------------

मुसाफ़िर असशीलही तु ह्या जगताचा,
प्रेम बाज ही असशील...
माझ्या सठी तर तु रामच ना.
मी तर फ़क्त प्रेम केलं होतं.

तुझ्यातला मुसाफ़ीर बघितला नव्हता.
काय कुणास ठाउक,
लोक म्हणतात तोच डाव चुकला होता.

मी म्हणते चाअलायचच,
तु तुझं ठरव.
मी प्रेम केलय तुझ्यावर,
तुझ्या कडुन प्रेमाचीच अपे्क्षाही होती खरी
पण तु पुर्ती करविच अस नाही.

--------------------------------

पावसात ह्या मी चिंब भिजले आज.
मन मात्रं तुझ्याविना कोरडच राहिलं.

तु नसतांना सोबत माझ्या ह्या जीवनात,
सुखाशी माझं नेहमी भांडणच राहिलं.

कोणी तुला मुसाफ़ीर म्हणतात,कुणी प्रेमबाज,
ह्याच नादात मन माझाशीच फ़ितुर वागलं

--------------------------------

पाऊसच आला भयाण असा..
आणी फुटलेली पालवी गळुन पडली
जो आधार व्हायचा तोच विनाश झाला
झाडाला खुप वाईत वाटल तेव्हां
त्याने आक्रोश केला..
पण तेव्हां पावसाला मात्र दयाच आली नाही..
पालवी गळुन गेली ती कायमचीच ..
तेव्हांपासुन झाडाला नवीन वेध लागलेत ..
वाळवंटाचे..
अगदीच रुक्ष ऊन असेल तरी जीवघेणा पाऊस नसेल त्याच्यात
कधीतरीच बरसेल तो..
पण नव्याने उमललेली पालवी उपटुन नाही टाकणार
त्या पावसासारखी ..

संतोष (कवितेतला) ९८५०९५८१६३

-------------------------

नाही उपटणार नं ती पालवी?
नाही करणार नं ती घोड चुक पुन्हा?

माझ्या त्या व्रुक्षाचं वाळवंट कधीच झालं,
भर वैभवात जगाच्या,ते दुःखानी न्हालं.

ह्या असीम वाळवंटात नियतिने ,
कौस्तवाची पालवी फ़ुलवली.
एकरुप होता होता ती
हरउन ही घेतली.

मझ्या व्रुक्षाला बघुनच कदाचित
आता पुर्णत्वाचे वेध लागले,
मी मात्रं संगम घडउन
कायम अपुर्णच राहिले.

----------------------------

एकदाच आला शेवटचा तु..
सोबत बरसणाऱ्या असंख्य धारा घेऊन,
मी तेव्हांच भिजायला हव होत..
पण .. राहुन गेल..
आणी जेव्हांपासुन ओढ लागलीये अनामीक भिजण्याची
तु मात्र गेलास कायमचा निघुन..
मागे जळजळीत वाळवंट ठेऊन ..
आणी मी पण वेड्यासारखी जळत राहीले
एक ओली पालवी उशाला जपत..
अजुन खुप काही जपायच होत..
पण .. राहुन गेल..
मला बनायच होत, "पुर्ण" तुझ्यात
थोडस फुलायच होत तुझ्या प्रीतीत
राहीलच काही तर थोडस गाणं व्हायच होत..
पण .. राहुन गेल..

संतोष (कवितेतला) ९८५०९५८१६३

------------------------------------

राहुन गेलं जगणं तुझ्या त्या एका नकारात जगताना.
रहुन गेलं उपभोगणं तुझा दुरावा भोगताना.

राहुन गेलं गाणं होणं,तुझ्या साठी विरह गीत गाताना.
राहुन गेलं तुला पलटणं तु शेवटचं जाताना.

राहुन गेले माझे गीत अपुरे तु नसताना सोबतीला,
मुखडा माळला होता मी,तु अंतरा सोबती नेला.

राहुन गेले मरणे पण वास्तवात,मी त्या क्षणीच मेले.
तु स्विकरलं असतं ते तर मी मरुनही असते जगले.

----------------------------------

D shivaनी
nagpoor
20-21 जुलै २००८

Friday, August 1, 2008

हमारे आलम को तो बस
एक बहाना चहीये नशा करनेका.
तेरे नजर के शुआओ
से एक पैमाना पीने का.

तेरी हर आहट एहसास ये दिलाती है,
तुही है मक्सद अब हम्मरे जीने का.

कौनसी आरजु तुझे तौफ़े मे देगी मुझको?
अब तो बस इंतजार है तुझमे खुदको खोने का.

क्या नशा करु तेरी याद मै साजन,
तुने ही पिलाया जाम मोहब्बत का.

साकी ने बतलाया मुझको,नशा बरबादी दिलाएगा,
जबकी शिवानी नाम है,मोहब्बत मे फ़ना होने का.


D shivaनी
nagpoor

Wednesday, July 30, 2008

बाबा म्हणाले पुन्हा नवा रस्ता बांधणार......

आपल्या कडे रस्ता आणि खड्डे हे एक बॅलेन्स्ड एक्वेशन बनलेलं आहे,आणि त्याच बरोबर प्रत्येकाचे अनुभव पण.
असच नविन रस्त्याचे बांधकाम बघ्य्न,नवा रस्ता बांधणे,ह्यावर एका १०-१२ वर्शाच्या मुलाची व्यथा मांडली आहे.


देश प्रगती करतोय म्हणतात सगळे,
आता नव्या रुपा साठी देश कात टाकणार.
वर्षानु वर्षे खड्डे बघितलेल्या रस्त्याला
बाबा म्हणाले पुन्हा नवा रस्ता बांधणार......

काय! रस्ता बांधणार?

म्हणजे आता पाउस आला की,
रस्त्यावर पाणी नाही?

शाळेत काय फ़क्तं हस्तकलेचा तास टोलवाय्चा?
खरी खुरी नाव कुठल्या पाण्यात सोडायची/?
जास्तं पाऊस आला तरी शाळेला सुट्टी नाही मारायची?

खड्ड्यात ल्या पाण्याला मित्रांवर पाणी कसे ऊडवायचे?
भर्रकन सायकल नेउन काठाहुन जाणार्या काकांच्या
आंगावर चिखलाचे शिंतोडे कसे ऊडवायचे?

पाय घसरला सांगुन मुद्दाम कुठल्या पाण्यात पडायचं आता?
काहीच राडा नाही फ़क्ता रुटिन जाता येता?

बापरे किती बोअर होइल लाईफ़?
पाउस फ़क्तं खिडकीतुन बघावा लागेल,
फ़ुलप्रुफ़ ड्रेनेज सिस्टिम मधुन पावसाचं
पाणी डोळ्यातुन ओसरु द्यावं लागेल.

हीच डिमांड आहे म्हणे जनतेची
म्हणुन सरकार नवा मार्गं स्विकारणार,
प्रगतीच्या नावे चेहराच बदलवणार.

डोक्यात जातेय ही गोष्टं,
पण हे असच होणार.
वर्षानु वर्षे खड्डे बघितलेल्या रस्त्याला
बाबा म्हणाले पुन्हा नवा रस्ता बांधणार......

D shivaनी
nagpoor

Friday, July 25, 2008

मी अशी म्हणुन..............

तु एक मस्तमौला मेघ आणि मी एक शपित सर..........
ह्या पारा वरुन त्या पारावर हुंदडणं नेमकं ठाउक आहे तुला.

माझ्यात प्रेम रस भरला,आणि स्वतःपासुन वेगळं केलं.
पुन्हा तु एका नव्या उंबरठ्यावर आणि मी?
मी मात्रं तुझ्यात माझं अस्तित्वं विसरुन कधीचीच संपलेली.

दर वेळी पाउस येतो,आणि तु तिथेच असतो.
मी पण तिथेच असते,
फ़क्तं तुझा पार बदललेला........



........... किती रुपेरी,ओली क्शण मी माझ्या डोळ्यांना पजलीत.
कधी कधी अनावर हा प्याला,म्हणुन ती ओसंडुन वाहुनही गेली.

पण तु मात्रं माझ्या डोळ्यात बुभुळा प्रमाणे आहेस,
की तु आहे म्हणुन रंग सारे,
नाही तर अंधारच सगळयांना उत्तर आहे.



........... मी तर संशयही केला नव्हता रे,
फ़क्तं प्रेम नावाचा एक कशिदा विणला होता.

जाळ्यात अडकला तु मोहाच्या कदचीत.
मी तर फ़क्तं संसार खुणवला होता...........



............ जे नको होतं तेच झालं.
भघ ज्याची भीती होती तेच घडलं.

म्हणतात की,
दोघांमध्ये एक जण अमाप प्रेम करतो.
आणि आपल्यात ती मी नसावी असं स्वप्नं होतं.
पण...........
तु आणि मी कधी आपण झालोच नाही.
आणि अमाप प्रेम मी एकटिनेच केलं,
जे अतुल्यं रहीलं.



............ आयुष्यं कुरतडलय,मी असच म्हणणार नाही.

पण कधीही नं जाणारं व्रण दिलय सोबतीला,

जे काही केल्या मिटत नाही.

आणि काळाला सोसवत पण नाही.

............मला तुला दोष द्यावा असं वाटतच नाही.
काही केल्या तुझा प्रवह डबकं म्हणुन साचतच नाही.

का माझं प्रेम तुला उअमगलच नाही.
तुझ्याही ह्रुदयाला,झंकारुन प्रेमाचा प्रतिसाद स्फ़ुरलाच नाही.

मी मात्रं ह्या का?चं उत्तरही शोधत नसते,
तु जरी नाही तरी तुझ्यावर केलेलं प्रेम मनाला जगवत असते.



............अडवला पदर जरी माझा,

तो थामण्याची ग्वाही दिली नाही.

विश्वास घात झाला असही कसं म्हणणार?

प्रेम केलं होतं,तुला कधी अड घातली नाही...........



...............आठवणींना कधी वेळेची तमा नसते,आणि ती नसावीही.....
मग तुला विसर,असं नियती का खुणावते?

तु तुझे विचा,तुझं गाव सगळं बदललं,
आता मी ही माझा रस्ता बदलावा असं सगळे का म्हणतात?

मी तु्झ्यावर फ़क्तं प्रेम केलं,
प्रेम पुर्तीची अपेक्शाही होती खरी.....
पण त्याने काय फ़रक पडतोय,?
तुझा माझ्या जगण्याला दिलेला खो,
आणि तुझी इच्छापुर्ती एवढं कारण पुरेसं आहे.
आणि अखंडं राहील............
कारण
आठवणींना कधी वेळेची तमा नसते..........


.......... व्रुक्शं रुतु बघतात,
त्यांना काळ पलटवण्याचं कुतुहल असतं,
आणि व्रुक्शाला आपल्या भोवती कड्या वाढवण्याचं.

माझं तसं नाही आहे.

आयुष्यात पहीला श्रावण शेवटचा ठरला आजवर,
नवी पालवी फ़ुटली कौस्तवाची.
पानझड तु घेउन आलास.

आता माझं आयुष्यं इथेच थांबलं.
ना रुतु,ना सर,ना पानझड.
आणि मी तशीच निःशब्दं,
पहिल्याच श्रवणाच्या प्रतिक्शेत.



............. मी तुझ्यावर अमाप,असीम प्रेम केलं.
आणि जगाच्या प्रत्येक वस्तवाने तुला
माझ्यात नं मिळ्ण्याची साजिश केली.
मी सरळ आणि प्रत्येक रस्ता उलटा
येउ लागला.........................
कदाचीत मीच वाकडा रस्ता धरला.

आज म्हणुनच मी एकटी उभी आहे.
एक भयाण आकश आणि टोचणार्या
चांदण्या सोबतिला आहे.
असंख्य लोकं चहुबाजुला माझ्या.
त्यांची तिरपी नजर,
सगळ अंगावर झेलते आहे.
कदाचीत मीच वाकडा रस्ता धरला.


D shivaनी
nagpoor

Monday, July 21, 2008

दिल्ली कुणाचीच नाही होउ शकली,

दिल्ली कुणाचीच नाही होउ शकली,
ना फ़ॅन्सी ड्रेस करणार्यांची,
ना राजकारणाचा सट्टा
लावणार्या भडव्यांची.

बाजारात ह्या लोकशाहीचा
लिलाव केला.
विश्वास मत नावाने,
जगी गवगवा केला.

कुठे चुकले हो ह्यांचे?

आपणही प्रोत्साहन देत उभेच होतो की.
ह्याच बाजारात,
ह्याच बाजारात,
मुल्यांची अब्रु लुटतांना बघतच होतो की.

का द्यायचा दोष ह्या लाल गाडित फ़िरणार्यांना?
आपण साधं मत द्यायला पण पुढे सर्सावत नाही.
कित्येकांचे तर मतदार यादीत नाव ही नसेल.

आपण शंढ झालोत म्हणुन ह्या भडव्यांची चालली,
म्हणुनच आजही,
दिल्ली कुणाचीच नाही होउ शकली,.

D shivaनी
nagpoor
२१ जुलै २००८

Thursday, July 17, 2008

आज जरा दुकानात सीझन एंड चा सेल लागाला होता.

कमर्शियल चढाओढित सावळा का मागे राहील?
प्रोफ़ेश्नलिझम ची ओढ तो काय फ़क्तं पाहील?

आज साधा फ़ुकटात कुत्रा सुद्धा हुंगत नाही,
मग ह्या जगाच शहनशाहा क्रुपा फ़ुकटात दाखवील?

"there is no free lunch"चं जग सारं
मग देव काय प्रसाद फ़ुकटात वाटिल?

म्हणुन मी पण जरा तयरिनेच गेले होते,
सोबत दक्शिणा,फ़ळं शिवाय मी काय भक्ती नेईल?

देवाला पण जरा नेमकं ठाउक असणार,गिर्हाइकाची जात,
नाही तर तो काय सगळ्यानाच कन्सेशन देइल?

चार आठाणे टाकुन,साकडं घालतात जगदिश्वराला,
मग गाभारा मॉल चं रुप का नाही घेईल?

आज जरा दुकानात सीझन एंड चा सेल लागाला होता.
मागायला गेले फ़क्तं त्याची साथ,
तर डिस्काउंट माधे तोच उभा होता.

D shivaनी
nagpoor
१७ जुलै २००८

Wednesday, July 16, 2008

"तेच ते राजकारण"

रोज बसते मी पहिल्या बाकावर,
काल ती आधीच बसली होती.
भांडायला चढवला आवाज तर,
सगळी गर्दि तिच्या बाजुने नरमली होती.
माझ्या मागची टिम,का तिच्या बाजुने झुकली.
ह्याचे शोधु लगले कारण
मग आले लक्शात की
"तेच ते राजकारण".

भाजी बाजर आसॊ की,
गल्लितले भांडण.
शेजारचे असो की,
दाउद कींवा राजन.
रोजचेच गडी, आपापले रंग बदलतात.
कधी अफ़जल ठरतो देशभक्तं
कधी भगत व्हिलन.
परत मग मी
ह्याच शोधु लागले कारण
मग आले लक्शात की
"तेच ते राजकारण"

D shivaनी
nagpoor
१५ जुलै २००८

Tuesday, July 15, 2008

तुला माझ्यात सामावुन घेण्यासाठी.

तु म्हण्तो की माझ्या समोर रडत नाहीस.
आसवांशी flirt करतो.
पाठ फ़िरताच माझी,
तु आसवांशी गुज साधतो?"

मी चांदणी होते तुझ्या निरभ्रं आकाशाची,
तुटतेही तुझी इच्छा पुर्णं करण्यासठी.
ओघळते एक अश्रु बनुन.
मिटुन जाते तुझं मन हल्कं करयला.

तेव्हा तु ही माझ्या डोळ्यात नकळत तरळतो.
माझ्याही डॊळ्यात पाणी तरंगतं.
माझ्याही मनात घालमेल होते,
श्वास दाटुन येतात.
पाणी ओघळणार,तेवढ्यात मी डोळे मिटुन घेते,
तुला माझ्यात सामावुन घेण्यासाठी.


D shivaनी
nagpoor

Monday, July 14, 2008

साकारले स्वप्नं माझे,

सखे तु आज अवतरली.

बहाणे बनवुन अनेक,

तु भावनांना माझ्या जगली.


आजच अनुभवुया आपण नाद प्रेमाचे.

चांदण्यात फ़िरुन येउ गाउ साज प्रेमाचे.

होइल रात्र्म उद्याहि सखे,

पण आजच न्हाउ भाव प्रेमाचे


ह्या सौम्यं समीरासंगे,

चांदण्यांचे गुज ऐकुया.

तु द्यावा हाथात हाथ तुझा.

एक नवा बंधं जोडुया


मधाळ ह्या निशेस सखे,

प्रितिची रंग चढुदे.

होइल पहाट काळाने,

समई जरा मालउ दे.


रुतु निरोप घेउन सरले,

म्रुगाने हजेरी लावली.

आभाळ नभी गजबजले,

चांदणे तुझ्यासाठी सांडली.


एकेक चांदणी माझ्या

तुझ्या प्रेमाचे गाणे गाते.

स्वप्नाच्या दुनियेत राणी

तुझ्यासम मन चिंब चिंब न्हाते.


श्वासांनी ठेवली लाज माझ्या

तुझ्या सोबत जगण्याची.

मी धन्य झालो तुझ्यात हरउन

किमया ही प्रेमाची.


D shivaनी
nagpoor
14th july 2008
बहर मागितला होता तुला

तु पान झडिचं रान दिलं.

गुलाबाचं फ़ुल मागितलं

तु कॅकटसचं पान दिलं


नसेल मी ह्या जगतात जेव्हा,
तुझ्या डोळ्यां मध्ये दोन अश्रु येतील.
किमान माझ्या दुसर्यांदा मरण्याने
तुझ्यात आठवणींचे पुर येतील.

आठ्वतय,तुझ्या आठवणीत
म्रुग,वसंत आणि शिशिर पालटलीत.
पाऊस तुझीच कहाणी ऐकवुन गेला
बघ,सांभाळ कदाचीत आता तुला माझे वेड लागेल.

गंधं आसेलही मोगर्याचा तो,
पण तुला आपला वाटला नाही.
त्याच मोगर्याचा सेज चढ्वला चितेवर माझ्या
पण तुला तरीही माझ्या प्रेमाचा केवडा सुचलाच नाही.

त्या सुगंधात किमान तुला
माझं पहिलं गुलाब आठउ दे.
शेवटचं दर्शन माझ्या चितेला तुझम
तुला धुरात साठउ दे.

काय कमाल आहे नं,
आजही तुझी प्रेयसी मागे उभी आहे.
तुला माझ्या चितेजवळ रडताना बघुन
जरा तिलाही हेवा वाटु दे.

D shivaनी
nagpoor
झरे काका

कवितेने वेड लावलं
जागे पणी स्वप्नं मागता?
स्वप्नातच कोवळी पालवी
म्हणुन शब्दाचं अंकुर मागता?

गवसेल ती,
रुजेल ती,
स्वप्नातल्या काळजातुन,
झंकारुन फ़ुटेल ती.

रिझवेल ती,
भुलवेल ती,
अक्शरांच्या पुंगळी मधुन
बासरी नाद गुंजवेल ती.

D shivaनी
nagpoor
तुझं नाव पुसुन टाकलं

मी ह्या ह्रुदयाच्या ताम्रपटा वरुन.

पण असच अवेळी

डोळ्यात एक अश्रु बनुन तु ये

D shivaनी

nagpoor

Saturday, July 5, 2008

देव च्या कवितेला दिलेला रिप्लाय.................

गांधी देवापेक्षा मोठा होता का?
गोळी चालली,
"हे राम" आवाज आला,
आणि गांधी खाली पडला.
किती वेळात मेला माहित नाही.
" श्री राम" तेच ना,
ज्यांनी रावणाचा वध केला होता?
अरे मग गांधी नुसार,
" श्री राम" तर हिंसावादि" होते,
मग त्यांचे नाव गांधीच्या तोंडात कसे?
भगत, बोस, आज़ाद, सावरकर यांच्या विषयी,
लोकांच्या मनात द्वेष निर्माण..
करणार्‍या गांधीच्या तोंडात.
" हे राम" हा शब्द शोभला नाही ना....

बरं झाले त्या काळात गांधी नव्हता,,
नाहीतर रामाने उपवास...,
केला असता सीतामाई ला मिळविण्यासाठी....

जेव्हा देव स्वतः लढले पापाविरुद्ध
तेव्हा हिन्दुस्तानच्या भोळ्या जनतेला...
भरकटवण्याचा गांधीला कय अधिकार होता?

गांधी देवापेक्षा मोठा होता का?

निशब्द(देव)



सगळ्यात पहीले कोणालाही एकेरी संबोधणे चुकीचे आहे.त्यामुळे देव त्याबददल माझा निशेध.

मात्रं,

गांधीजींना पण देश स्वातंत्र व्हवा असं मना पासुन वाटत होतं,त्यासाठी चळवळ उभी करण्याची महत्वाकंक्शा मनात दडुन होती.पण स्वतःकडे बघता आणि स्वतःचा स्वभाव बघता त्यांना हे नेमकं ठाउक होतं की ते जहाल विरोध नाही करु शकत आणि म्हणूनच त्यांनी सत्याग्रह नावाचा जालीम उपाय शोधला.त्यांची मोहिम त्या संपुर्ण आवाम ला आव्हान होती जी जहाल प्रकारे विरोध दर्शउ नव्हती शकत.ज्यांच्यात जहाल विरोधाला सामोरे जाण्याचं धाडस नव्हतं ते सर्वं गांधीजींच्या मागे उभे झाले आणि त्यानी आपल्या परीनी लाढाई लढली.
त्या काळात डोक्यावर कफ़न बांधुन स्वातंत्र्यासाठी लढ्णार्याची संख्या सत्याग्रहींच्या comparision मधे कमी दिसली आणि म्हणुन हा मार्गं ऎवढा समोर आला.
ह्या पद्ध्तती अवलंबिल्या मुळे भन्नाट प्रोबलेम्स झाले.आणि त्याची शिक्शा त्यांना नथुराम च्या रुपात मिळाली सुद्धा...........
वयक्तिक मला त्यांचा विचार आणि व्यक्तिरेखा खुप काही पटत नाही.
जहाल रुपात,"ना तारिख ना मुकदमा,सीधा इन्साफ़ on the spot"असं वागण्याची हिम्मत आणि परिस्थिती सगळ्यांमधे नसल्याने अमाप लोकांन्नई त्यांना राष्ट्रपिता बनवलं.

राहीली गोष्टं त्यांच्या विरोधात बोलण्याची अथवा नाही तर आम्ही तो संपुर्ण अधिकार ठेवतो,
२ वेळा अटक,४०-५० मोर्चे,रेडिओ वर २४ मुलाखाती,वर्तमान पत्रात १०० हुन अधिक लेख,किमात २० deputation ३० हुन अधिक सामाजिक कार्यक्रमातुन देशासठी काहीतरी करण्याच्या प्रयत्नात झटतो आहोत.........

त्यांनी त्यांच्या परिनि केलं,जे मला आणि देव ला नाही पटलं.म्हणूण शब्दांची बांधणी करावी लगली.............

Thursday, July 3, 2008

बंद चा आवाज देश भर उठतो.

कोणी म्हणे नौटंकी.
कोणी म्हणे देशप्रेम,
कोणता मुद्दा?कश्याचं काय?
ह्याचा कुणालाच नाही नेम.
आगीचा भपका,मनात धगधगतो
बंद चा आवाज देश भर उठतो.

ह्याला हे तर आम्हाला पण ते मिळुच दे.
पैशानी देव विकणार्याला पण ते कळु दे.
श्क्ती प्रदर्शन करु,शंढांना ती दखउन देउ.
हक्क तो आमचा,आमच्याच जमिनीत उधार दे.
शेवटी एकाच धडाचे दोन हाथ,
मोठे होण्यासाठी झगडतो.
बंद चा आवाज देश भर उठतो.

कधी कधी तो मुद्दा सामांन्यांपर्यत पोहोचतच नाही.
वरच्या वर निर्णय होतात खाल पर्यंत ते गळतच नाही.
फ़क्तं झळ पोहोचते,दैनंदीन जिवनात,
सामान्यांचा हुंकार वरचा ऎकतच नाही.
तोड फ़ोड,जाळ लोट ह्यानी अगदी उब येतो,
जेव्हा
बंद चा आवाज देश भर उठतो.


D shivaनी
nagpoor
3 july 2008

Sunday, June 29, 2008

कधी कधी प्रश्नं पड्तो,

कधी कधी प्रश्नं पड्तो,
तु मोठा की मी मोठी?

जगाच्या गाराड्यात
एक युद्धं खेळते,
तुला सोबत ठेउनच,
एक एक पायरी गाठते.
पण कित्येक वेळी
तुझ्या समोर मी ठरते खोटी.
कधी कधी प्रश्नं पड्तो,
तु मोठा की मी मोठी?

मनाचा संयम ठेवावा लागतो,
प्रयत्नं पण बरीच चालतात.
कधी यश हुलकावणी देतं,
कधी दिवस "बैसाखी " मनवतात.
तुझ्या सोबत ताळमेळ ठेवणं
म्हणजे एक तिमिर कसोटी.
कधी कधी प्रश्नं पड्तो,
तु मोठा की मी मोठी?

तुला काय नाव द्यावं
हे कोडं कधी उलगडत नाही.
कधी स्ववलंब,कधी स्वभिमान
कधी गर्वं तर कधी अभिमान म्हणवत नाही.
तु एक अविभाज्यं,अक अतुट घटक,
आणि आयुष्यं एक सचोटी.
कधी कधी प्रश्नं पड्तो,
तु मोठा की मी मोठी?

D shivaनी
nagpoor
29 june 2008

Saturday, June 28, 2008

स्पर्षं

एक अबोल संबंधं.
भावनांना मिळणारी वाट,
चंचल मनाला,
खळखळणारी सपाट.
म्हणजे स्पर्षं........................

डोळ्यात बघण्यापेक्शा,
जो बंध कधी कधी जवळचा वाटतो.
आणि डोळ्यांनी जे नातं जुळत नाही,
काळजाच्या आगीला भुलवत नाही
तो स्पर्षं.......................

श्ब्दांना जे साद्ध्यं होत नाही,कधी कधी
एक मिठी सारं काही बोलुन जाते.
डोळ्याच्या भावना,काळजाची हुर हुर
एका साधनेतुन सांडुन जाते
तो स्पर्षं.......................

D shivaनी
nagpoor
28 june 2008

Tuesday, June 24, 2008

बरसणार बरसणार


बरसणार बरसणार
चार दिवस असाच बरसणार,
मग आभाळ फ़ाटल्यावाणी,
आक्रोषाने झोडपणार.

रीमझीम रीमझीम पाउस
मनात घर करुन बसतो,
कधी प्रेमाची आठवण,
कधी बालपणात नेउन सोडतो.

कधी बाइक वर लॉंग ड्राईव्ह ला नेतो
मित्रांसोबत ओलं होत.
कधी घर गळतय म्हणुन,
घरी बसतो पाणी टिपत.

कधी गरम गरम चहा,
आणि सोबतीला समोसे.
कधी वाटतं उन्हाड होउन फ़िरावं
पण उगाच इमेजचं ओझे.

कधी कपडे सर्दं म्हणुन
परत धुणं.
कधी पाउस अवकाळी म्हणुन
परत पिळणं.

हा रीमझीम पाउस
पिकांना सुखाउन आत्महत्येची चिता विझवतो.
आणि पुढे नव्याने पाउल टाकण्यासाठी
नवं अंकुर उगवतो.

हा रीमझीम आहे तोवर ठीक आहे,
कारण

पावसाला कैफ़ म्हणजे
मरगळ,चिख्खल,वैताग,सुट्टी
संहार,प्रहार,पुर विध्वंसं.
घरात,रस्त्यावर,शेतात आणि डोळ्यात पाणी.

म्हणुन रीमझीम पावसाला enjoy कर
आणि वादळाला समोर जाण्याची तयरी ठेव

कारण.
बरसणार बरसणार
चार दिवस असाच बरसणार,
मग आभाळ फ़ाटल्यावाणी,
आक्रोषाने झोडपणार.

D shivaनी
nagpoor

25 june 2008

Monday, June 23, 2008

प्रेमात हरण्यार्यां साठी लिहिलं आहे,


प्रेमात हरणार्‍यांसाठी लिहिलं आहे,
"प्रेम म्हणजे मिळवणे,जिंकणे नव्हे".

आज मी आयुष्याच्या नव्या उंबरठ्यावर उभी आहे.
स्वप्नांची होळी आज मी लावणार,
आणि नव्या आयुष्यात पहीलं पाउल टाकणार.


ह्याच होळीच्या बाजुला गर्दी का दिसतेय?
लोकं का जमलीत?
अरे ती जल्लोष का करतायेत?
oh.............
दुरुन तर तो मुलगा तुझ्या सारखा दिसतोय.
काही पण.........
कदाचित अजुनही प्रेम करते तुझ्यावर,
प्रत्येकात तुझाच भास होतोय.

पण नाही.......

अरे हा तर तुच आहे.

माझ्या होळिला यज्ञकुंड बनवून
तुझ्या प्रेयसी सोबत सात जन्माचं नातं जोडतोय.

तुला तुझं प्रेम मीळालं,
मी मात्रं प्रेमात हरले.
म्हणूनच.......कदाचित....
नाही म्हणुनच
प्रेमात हरण्यार्‍यांसाठी लिहिलं आहे,
"प्रेम म्हणजे मिळवणे,जिंकणे नव्हे".

मी म्हणेन,
"प्रेम म्हणजे हार पत्करणे,जगणं नव्हे"

D shivaनी
nagpoor
22 june 2008

Saturday, June 21, 2008

प्रेयसी मागे एक सावली खुणवत असेल?


एखादं ध्येय निश्चित केल्यावर ,
जेव्हा मार्ग शोधत फ़िरते.
तेव्हा तुझ्या हाथाची आणि
साथीला नजर भिरभिरते.

मी ठरवलय तुझ्या विनाच
आता हा मार्गं गाठायचा.
प्रवास हा एकट्यानेच
सोसायचा.

कधी कधी मी ध्येय
सुद्धा गाठते.
पण
पण
प्रत्येक यशात मी एकटी
पुर्णत्वाला समजावते.

तुला कधीतरी माझी
आठवण येत असेल?
तुझ्या अफ़ाट यशात,
प्रेयसी मागे एक सावली खुणवत असेल?

D shivaनी
nagpoor

20 june 2008

Monday, June 16, 2008

एका बादलीत तोंड बुडउन,


एका बादलीत तोंड बुडउन,
नाकातुन हवा पण सोडता येत नाही आहे.

गुदमरुन जाईल रे मन ते,पण मनाच्या
पेटीचे कवच तोडुन एकही तार जोडता येत नाही आहे.

अर्ध्यावर आला रे खेळ हा,आता नव्याने सुरवात
करायला खेळ मोड्ता येत नाही आहे.

आयुष्याचीच सुत्रे जोडलीत नं,आता सगळं
संपलं म्हणुन एकतर्फ़ी नातं तोडता येत नाही आहे.

पिसाळलेल्या कुत्र्या सारखे लचके तोड्ले तिने पण,
नियतीला कुत्र्यासारखं झोडता येत नाहई आहे.

अस्व्स्थं व्यथा माझी,अल्याड मी आणि पल्याड
जीवन,मधली नाईलाजाची भिंतं फ़ोडता येत नाही आहे.

D shivaनी
nagpoor
15 june 2008

Sunday, June 15, 2008

आजही

आजही ह्रुदय तुझ्या साठी स्पंदते,
आजही मी तशीच हासते.
जी तेव्हा होती,ती आता नाही,
आजही मी हे स्व्प्नं विणते.

आजही मला लोक चांगलं म्हणतात,
आजही मला लोक प्रसिद्धं म्हणतात.
तुच आहे कारण माझ्या असण्याला,
आजही लोक बावरी राधा म्हणतात.

आजही गुज सांगतात तारे.
आजही तुझाच शहारा आणातात वारे.
रोखु नाही शकत श्वासांना,
आजही यंत्र तुझ्यावरच जगणारे.

आजही ओढा वाहतो प्रेमाचा,
आजही संगम होतो श्वसांचा.
माझ्या जागी आज तुझी प्रेयसी आहे.
आजही होई दिवस आसवांचा.

D shivaनी
nagpoor
14 june 2008

Saturday, June 14, 2008

तुमच्याच कवितेवर ताव मारते.


आज काल माझ्या शब्दांना लयच गवसत नाही.
भावना over flow होतात पण,वाटच मिळत नाही.

हथात लेखणी घेतल्यावर,पानं कोरी राहुन जातात.
मी आत कासावीस होते,त्या वेगाला शब्दं अड्वतात.

सगळ्यांचा कविता वाचुन घेते,समर्पक प्रतिक्रिया ही देते.
माझ्या शब्दांच्या बांधणीला मात्रं,अधुरी एक कविता राहते.

सगळ्यांच्या शब्दांना वाहवा,शब्बासकी कधी मुजरा,कधी सलाम मिळतो.
माझ्या शब्दांकडे सहसा कुणी वळतच नाही,
वळालच तर कधी छान आणि बरेचदा अपुरी कवितेचा शेरा मिळतो.

कदचीत मनानी भीती बाळगली,चककं धास्तीच बसली,
"चालत रहा" ऎकुन सुद्धा माझी लेखणी थरथरली.

आज सगळ्यांचा पावसात मन ओलं चिंबं झालय,
आणि शब्दांना पण एक अंकुर फ़ुटलय.
आता ठरवलय की शब्दांना पुर्णं न्याय द्यायचा.
आणि एकदा तरी शब्दांवर उत्तम प्रतिसाद घ्यायचाय.

बोचर्या वार्यात,आणि शहारणार्या पावसात
शब्दांना जरा गरम गरम फ़ोडणी घालते.
नाहीच जमलं तरीपण मग तुमच्याच कवितेवर ताव मारते.

D shivaनी
nagpoor

Wednesday, June 11, 2008

IT COULD BE MORE BEAUTIFUL

तुला माझाशी जोडणारं नात एकच होतं,
तुला माझाशी जोडणारं नातं एकच होतं,
प्रेम आणि भावना ह्यांना तुझ्या मते
असणारं स्थान फ़ेकच होतं.

तुझ्या नसण्याने बेरंग झालेल्या
जिवनात,बेरंग नावाचा रंग बनवला.
आता फ़क्तं तुझ्याच आठवणीच्या
भिंतींनी आणि बेरंगी छपरानी महाल सजवला.

पाऊस आला,गालावरुन पाण्यासोबत
अश्रु ओघळले,मी चिंब भिजले.
कात टाकल्या प्रमाणे एक वेगळाच उत्साह
जाणउ लागला,जग सुंदर दिसत होतं
पण
IT COULD BE MORE BEAUTIFUL
जर तु असता तर.........................

D shivaनी
nagpoor

Sunday, June 8, 2008

डोस्कं वेडं पीसं झाले,

डोस्कं वेडं पीसं झाले,
पन सापडेना वाटं.
शोधाया गेले रस्ता,
मिळे खद्द्ड पायवाटं.

म्या हरवुन गेले,
ह्या गजबजीत आता.
मनं उतरुन गेले,
वाटे राहावे एकटं.

टोचे मले नजर,
त्या शहर वाल्यांची,
हरेक श्वसांमंधी
येई भयाचे सावटं.

थाटला संसार,
म्या कामं सोधू लागली.
पैसे मिळे आसानीने,पन
आस्था नं मीळे फ़ुकटं

सेवटी सापडला रस्ता ,
म्याबी शहरामंदी रमले.
वर्याच्या वेगालाबी लाज वाटे
एव्ह्डा प्रवास बिकटं.

D shivaनी
nagpoor

अस्सा पाउस .... तस्सा पाउस


प्रेमाची भाषा बोलणारा,
त्याची भावना ऎकणारा.
आणि म्हणुनच अवेळी
बरसणारा
एक वेड पाउस,उन्हाड पाउस
अस्सा पाउस .... तस्सा पाउस

Monday, May 26, 2008

मस्तानी.....

नितळ कान्ती तीची,अन सुरेख वाणी..
गोरा वर्ण तीचा,नामे मस्तानी.....

वाखाण्यजोगं सौन्दर्य तीचं
बजीरावाने जपलं...............
लोकांने मात्र ह्याला व्यव्हीचाराचं
नाव दिलं......

मला ह्यात काहीच वावगं वाट्त नाही.
मस्तानी सोबत हा न्याय पण वाट्त नाही
प्रत्येक सौंदर्याचं कौतुक हा मानवतेचा
संस्कार आहे.
बाजीरावाने तो जपला,व्यव्हीचार
मानणार्यांवर केलेला प्रहार आहे.


(नैतिकता बाजुला ठेउन निव्वळ,मस्तानीच्या सौंदर्याला उद्देशुन मनात उमटलेल्या ह्या ओळी,please dont take it otherwise)

D shivaनी
nagpoor

Thursday, May 22, 2008

hi bhasha premachi,
he nata manacha........
dharmaviranna thauk ranangan
aani gaan sanharacha.
kashya kaltil ya bhavna,
tujhi apeksha fol tharel.......
tu bindast prem kar,
tujha prem premvirannaa mol tharel.............

Wednesday, May 21, 2008

कारण हरलेय मी आज..


मन धाव घेतय फ़क्तं तुझिच
कारण हरलेय मी आज..

जणु घ्यायाळ मी अजुनी,
स्वप्नं मनात दफ़न
आणि अश्रु नयनी.
का मान्य नाही माझ्या
सुरांन्ना तुझा साज???
कारण हरलेयय मी आज..

तुला ठाउक आहे दुःखं,
as you say,
"the pain of refusal of love"
आणि होणार्या अनावर वेदना,
संपले ते क्शण,स्वप्नं
आणि माझ्या संवेदना.
माझ्या नशिबाला ही
नुकताच चढ्लाय माज..
कारण हरलेय मी आज..

रागाउ तरी कुणावर?
तुझ्यावर?स्वतःवर?
की तुझ्यावर केलेल्या
अक्शम्यं प्रेमावर??
माझ्या प्रेमालाही नाही
त्याच्या स्पंदनांची लाज..
कारण हरलेय मी आज..

D shivaनी
nagpoor

Thursday, May 15, 2008

continued to ha ek adbhut prayatna

त्या धुरालाही तुझ्याच
प्रतीमेची आस
तू कुठेच नसताना
सारखे तुझेच भास
श्वास घेतानाही
बोचातात तुझ्याच आठवाणी
साला............
म्हाणुनच मी श्वासालाच नाकारल

ही कैफीयत तुझ्या प्रेमाची
मला मृत्युलाही कवटाळू देत नाही
ओढल मला या आमानुष जगतात
उधार म्हणुन पण माझ आयुष्य
क्षणभर घेत नाही.
कोंडलेल्या तुझ्या प्रेमाच्या खोलीत
मी असच कुढत जगण्याच ठरवल

D shivani
nagpoor

Tuesday, May 13, 2008

एक अद्भुत प्रयत्न


एक अद्भुत प्रयत्न

श्वास घेतांना ,आठ्वणिच्या प्रत्येक
क्शणाला मी गिळलं
आणि श्वास सोडतांना
सगळं धुरात मिसळवलं.

आज नकोच ते आठ्वणींचं
डोळ्यात तरळणं,
म्हणुन त्याचं जग मी
डोळ्याबाहेर ओघळवलं.

माझ्या मनाचा आक्रोश
नाही कळायचा त्याला,
म्हणुन त्याच्या आनंदात
मी जगणं मालवलं.

हा एक अद्भुत प्रयत्नं,
मला क्शितिजा पार नेइल,
पण तेव्हाही तु माझ्यातच असशिल
हे मला तेव्हा जाणवलं.

तु असशील ह्या पार तेव्हाला
मी क्शितिजा पार असेन,
तु जिंकावं प्रेम तुझं
म्हणुन मी स्वतःला हरवलं.

मी जगेलही तेव्हा,
तुझ्या नसण्यात रमुन जाईल.
मी धुर बनवला तेव्हा,
आज मढाला धुराने कवटाळलं

D shivaनी
nagpoor

Friday, May 2, 2008

स्वस्तं झाली माणुसकी.............

महगाई वाढ्ली म्हणे,
दारु स्वस्तं आणि ,तेल महाग झालं आहे.
पण आपण मुक गीळुन,जास्तं पैसे मोजताना
जपतो भ्रष्टाचाराशी बांधिलकी.
स्वस्तं झाली माणुसकी.............

ह्या विरोधात शक्ती प्रदर्शन करावं,
पोलिसांचा दंडा,आणि उगाच झमेले
कशाला म्हणुन मागे परततो.
एकटा कंठ टाहो फ़ोडतो
आपण महागाई वाढ्ली म्हणुन ,
अर्ध पोटी निजवतो डोळे,विझवतो खिडकी
स्वस्तं झाली माणुसकी.............

बाजारात तरुणीला,काही छेडतात,
नको नको ते बोलतात........
आपण........
आपण मात्र कशाला राडा म्हणुन
तिच्या आब्रु ला दावा वर लाउन
तुडवत निघुन जातो तिची पोटत्तिड्की
स्वस्तं झाली माणुसकी.............

वर्तमान पत्रात,रोज आत्महत्येच्या
बतम्या वाचतो,
कचेरित जाताना,बेबुनियाद
चर्चा करतो........
मदत म्हणुन जेव्हा त्यांच पिक
थेट खरेदी करण्यास गाव बाजाराचं
बोलवणं येत.
तेव्हा कशाला ते भाव करणं आणि चिकचिक
म्हणुन mall चा रस्ता धरतो.
सकाळी म्हणतो मिळत नाही वाचायला चवदार बतमी
स्वस्तं झाली माणुसकी.............


D shivaनी
nagpoor

Wednesday, April 30, 2008

मित्रांसोबत आकाशात उंच उडावसं वाटतय...................................


आज परत एकदा,ग्राउंड वर जाउन
बेधुंद धावावसं वाटतय...........
निःश्चिंत मनाने
मित्रांसोबत आकाशात उंच उडावसं वाटतय...

लहानपणी मोठं होण्याचं आकर्शण होतं.
खेळणं सोडुन मोठ्यांसारखं गाणी ऐकायची.
आज मात्रं परत एक्दा टाळ्यांच्या गजरात
लगोरी खेळवसं वाटतय...

नको त्या जवाबदार्या,नको ते टेन्शन्स.
नको ते मोठेपण ,नको ती स्पर्धा, ती गजबज
शेजारच्या पिंपळच्या झाडाखाली
दोन क्षण एकटं रहवसं वाटतय


D shivaनी
nagpoor

समाप्त!!!!!!!!!!!!!!!!

कैफ़ियत एका प्रेमाची.
निनावी नात्याची.
साठ्वलं होतं मनात,
पण हुरहुर फ़क्तं त्याची.


नकोसं झालं होतं जगणं ,
तेव्हा त्याने समोरुन हाथ दिला.
आता मात्रं पाठ फ़िराउन.
परीक्शा घेतोय संयामाची.


माझच चुकलं ,
मी दखवलेल्या स्वप्नात उडली.
पंख कापले काळाने,
मी धाव धरते जमीनीची..........


आआआआअ...............................


समाप्त!!!!!!!!!!!!!!!!

D shivaनी

nagpoor

Monday, April 28, 2008

डायरी..............

किमान चार दा तरी मी ती डायरी फ़ेकण्याचा प्रयत्ना केला,
आणि चारहीदा तो फ़सला.......

मझी डयरी तशी फ़ाडलेली नव्हती आणि कोरि सुद्द्धा
पूरणं पाने तुझ्या श्वासाला मझ्याशी जोडत होती.

पहील्या पनावरुन शेवटच्ह्या पनावर जातांना
रात्रं मनात एक निखारा सोडुन जाते,
मग तो शांत करायला डोळ्यात पाणी.
आणि तुझ्या आठवणिंचे चिल्लर नाणी.


समुद्राला ओहोटी येते ना,मझ्या डायरीचं पण असच आहे.
सरळ ती डयरीच्या अंतरंगात घेउन जाते............................

आणी बघते तर काय?चहुबाजुला पाण्य़ासारखं
दुखांच्या लाटांनी आणी सुखाच्या रत्नांनी वेढ्लेलं.


रत्नं जरी असलीत,तरी एकदा श्वास घ्यायला,
पण्याबाहेर यावं लागतं,
मग डायरी बंद करुन हे आयुश्य सोसावं लगतं............


D shivani
nagpoor

Thursday, April 24, 2008

तु माझ्या अंतरंगात आहे............................



चायला माझा प्रेमभंग झाला
आणि मी जाम घेतली
पहिले व्हिस्की मझ्यात
आणि मग मी व्हिस्कीत उडी घेत्ली.....................

सगळी रात्रं मग मी तुझ्यावर
अश्रुंचा वर्शाव केला,
मग माझा प्रवास तुझ्या
आठ्वणित निजुन गेला.

दुसर्या दिवशी मग hangover
ने डोक्याचा पारा अजुनच चढ्ला.
तो उतरवाय्ला मित्राने,हथात
कोफ़ीचा कप दीला............

कोफ़ी आणी तु............
एक अतुट समीकरण.
माझ्या असण्याला
तु एकच कारण..........

तुझ्या सोबत मी पहिल्यांदा
कोफ़ीशोप लाच भेट्लो होतो.
तु आणी तुझा सहवास
सगळं डॊळयासमोर तरळ्लं
तुझ्या सोबत घलव्लेले
अमाप क्शण,जणु सात
ज्न्मांचं नातं जुळलं....

पण माझं मन परत त्या
अमानुश संध्याकळी आलं.
आणी
तुझा नकार,दुरावा
माझ्या पदरात पड्लं........

सगळे जण माझ्यावर हसत होते,
झाडे,पानं,फ़ुले,चन्द्रं ,तारे सगळेच.....
ज्यांच्या सक्शिने सोबत रहण्याचा
नीर्णय घेत्ला होता ते सगळेच......

माझं चार्चौघात हसं केल होतं
चालय्चच पण खरं सांगु??
मन आक्रोशने रडलं होतं.........

ह्याच विचरत संध्यकळ झाली,
तु आता नाही ह्या विचरने परत मझी सरक्ली,,,
परत व्हिस्की आणी नेहमी प्रमणे तुझीच रात्रं
hangover उतरवण्यासाठी cofee चा कप
आणी दीवस्भर तुझेच विचार.................


माझं आयुश्य अता असच सुरु आहे,
दिवसा cofee आणी रात्रि व्हिस्कि ची साथ आहे...........
ह्या दरम्यान प्रत्येक क्शणी आणी चहुबाजुला,
नसलेली आणी मझ्या रोमा रोमात ठ्सलेली
तु माझ्या अंतरंगात आहे.............................

D shivani
nagpoor

Monday, April 21, 2008

आज मी शर्वरी ..................

gajhal lihinyacha tutka prayatna

आज मी शर्वरी तु चन्द्रं पौर्णिमेचा
प्रेमाची सन्थं साज,कैफ़ नवलाइचा........

हरवल्या भावना,निशब्द झलेत वारे
मी पान्घरले तारे,तु कात चन्दण्याची.........

श्वासाचे अन्तर मिटले,तुझ्यात समाउन गेले.
मी रात राणीची वेलि..तु झाड चन्दनाचे...........

होताच स्पर्श तुझा,झन्कारले मन माझे
मी शान्तता पूर्विची,तु आगज वदाळिचा...........

विस्कटल्या केशरचना,मी तुज समिप एक झाले
आता मी शर्वरी,तु प्रहर पहटेचा.........


D shivani
nagpoor

Friday, April 18, 2008

तरुणाइची मन्दी होती.......................

मला ना थोडी वेगळीच सवय आहे

आयुष्याच्या घरातले प्रत्येक दार

उघडुन बघण्याची..................

बरेच नजारे बघितले,

सुखवणारे,भुलवणारे,

पन तयारी नव्हती ह्या अनुभवाची.


आज MR Beens च्या कॅफ़ेचं दार

तस मुद्दामच चुकुन उघडलं,

भर दुपारी डोळ्यासमोर

पहाटेचं धुकं पसरलं.


मस्तीत वावरणार्‍या तरुणाईला

नशेची धुंदी होती,

मनानी चिरतरुण चालतील,

पण तरुण प्रौढांना बंदी होती.


म्हणुन प्रत्येक पाउल

आमचं अडखळत होतं,

पण तरुणाईच्या ह्या कैफ़ाला

बघण्याची हीच एक संधी होती.


म्हणतात तरुण देशाचे नागरिक

आणि वर्तमान घडवतात,

पन ह्या बाजारात वर्तमान आणि भविष्य

घडवणार्‍या तरुणाईची मंदी होती......................

D shivani

nagpoor

uttar

http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=41419010&tid=2589680355406819243&na=4&nst=1&nid=41419010-2589680355406819243-2589756163736947686


hi anuradha mhapankar chi kavita,jyala mi asa uttar dilay........................


झाला ना गैर समज
हाच नको होता ......
ग्रुप एस एम एस च्या निमित्ताने,
तो फक्त तुझ्याचसाठी पाठविला होता........

अगं प्रेम व्यक्त करायला घाबरत होते,
म्हणुन या ग्रुप मेल्सचा आधार घेतला...
अक्षरशः काळजात बुडवून पाठवला होता,
पण तुला तो कोरडाच वाटला .......

आज मला चक्क हरल्यासारखं वाटतय,
तुझा असा रिप्लाय वाचुन आभाळ मनात दाटतय....
प्रेमाचं स्वप्न फुलण्या आधी तुटतय,
तरी पण तुझी दखल बघून डोळ्याचं पारण फिटतय......
..D shivani
nagpur............................

प्रेम हे असचं असतं.................

प्रेम हे असच असतं

धारदार नजरेने कोमल,
मनावर केलेला प्रहार.

होकार आला तर स्वर्गं
नाही तर फ़क्तं संहार..............




प्रेम हे असचं असतं

प्रेम हे असचं असतं

खळखळणार्या पाण्याचं

जसं डबकं साचतं.


D shivani

nagpoor

मी तुझ्याकडे पाहिल्यावर...............

मी तुझ्याकडे पाहिल्यावर

तुझ्यात हरऊन गेली.

कळलच नाही मजला ही

रात्रं कधी सरुन गेली.

मी तुझ्याकडे पाहिल्यावर

मी स्वतःला विसरते........

वास्तवाचं माहीत नाही

तुझ्या नजरेच्या दुनियेत वावरते


मी तुझ्याकडे पाहिल्यावर

पहिले कविता सुचत होती.

आता मात्रं तुझ्या सानिद्ध्यात

मी गझल गात आहे.

मी तुझ्याकडे पाहिल्यावर

माझी वाट चुकुन जाते.

स्वप्नांमधे वावरते मी,

माझी वाट फ़ुलुन येते.

मी तुझ्याकडे पाहिल्यावर

एका नविन विश्वची अनुभुती झाली.

मला तर कळलेच नाही,

तुझी माझी कधी प्रीती झाली.


मी तुझ्याकडे पाहिल्यावर

hm.....................

मी तुझ्याकडे पाहिल्यावर

मला काय म्हणाय़चं विसरुन गेली.

डोळेच सगळं काही बोलले,

मी भावनांशी हरुन गेली.

मी तुझ्याकडे पाहिल्यावर

परत तुझ्या प्रेमात पडली.

तुझा नकार आल्यावर मरण्यासाठी

परत नव्या उमेदिने जगली.

मी तुझ्याकडे पाहिल्यावर...............
मी तुझ्याकडे पाहिल्यावर....

स्वप्नांना ही वास्तवाचा हेवा
वाटु लागतो.

तुझं असं येणं आणि मला आपल्या
पंखां खाली घॆणं.

की मनात प्रेमाचा ढ्ग
दाटु लागतो.

D shivani

nagpoor
आयुष्याच्या वाटेवरती चालताना

स्वप्नांची वास्तवाशी चढाओढ.

कधी होती साकार ती,

स्वप्नांशीच तडजोड.


D shivani

nagpoor

आयुष्य तेच आहे........................

आयुष्यं तेच आहे,

पण सोबत तू नाही.

मैफ़िलीत आहे अस्तित्वं माझं

मात्रं मनाला एकटेपण पण सोबतीला नाही.


आयुष्य तेच आहे

रोज नवा रंग.

कधी भॆटती फ़ुले,

कधी सोबतीला निवडूंग.


आयुष्य तेच आहे

कधी दुसर्यांना

हरऊन जिंकणे आहे,

पण कधी दुसर्याला

हरुन जिंकणे आहे



आयुष्य तेच आहे

वीण माहीत नसतांना

प्रेमाचा कशिदा

विणणे आहे.............




आयुष्य तेच आहे

त्याचं नसतांना

असणे आहे,

आणि त्याच्या आठवणिंने

विनाकारण छ्ळणॆ आहे.



आयुष्य तेच आहे

प्रेम आणि कसब

ह्यातली चढाओढ आहे

कधी आंबट,कडु आठवणी

कधी आयुष्यं गोड आहे.



आयुष्य तेच आहे

कधी सावल्यांचा खेळ

कधी अपयशाशी ताळमेळ

आयुष्य तेच आहे.


D shivani

nagpoor

Thursday, April 17, 2008

एकदातरी मला समुद्र व्हायचय..

म्हणतात की धाव आकाशाची घ्यावी
आणि म्हणूनच
एकदा तरी, अवघा आसमंत
सामावणारा समुद्र व्हायचय

किती प्रेम करतेस नेहमी विचारतात
कधीच मोजू न शकणारी खोली
म्हणजेच माझं हे प्रेम सांगायला
एकदा तरी, समुद्राच्या खोलीला माझ्या
प्रेमाची ओली बनवायला समुद्र व्हायचय..

प्रत्येक नदी आपलं ध्येय म्हणून समुद्र गाठते..
पण सगळ्यांना सामावून घेणं हेच ध्येय
ठरवून समुद्र स्वतःला खालवतो..
असाच सर्व दूर , सगळ्यांना सामावून घेण्याची
वृत्ती बनवायला..
एकदा तरी समुद्र व्हायचय..

लाटांवर स्वार होत समुद्र क्षितीजा पलीकडे पोहचतो
वास्तवात माहीत नाही, पण क्षितीजा पलिकडे उभ्या
असलेल्या तुझ्यापर्यंत पोहचण्यासाठी
एकदातरी मला समुद्र व्हायचय..
एकदातरी मला समुद्र व्हायचय..

D shivani
nagpur

मला प्रश्न पडलाय....

मला प्रश्न पडलाय....

पाडगांवकर म्हणतात ना,
"वयाची १६ वर्ष सरली की प्रेमाची फुलं फुलू लागतात."
मी म्हणेन,"आणि म्हणूनच अवास्तव गोष्टी वास्तवात घडत असतात."

वयाची १६ वर्ष सरली
मी प्रेम केलं होतं.
माझं मन मग त्याच्या गावी गेलं होतं....

दिवसांमागून दिवस
स्वप्नांचे झुले बांधण्यात गेले
वास्तवाचा पाया नसतांना
भविष्याची महालं बांधण्यात गेले....

प्रेमात चिंब भिजण्यासाठी
मी त्याला प्रपोज केलं
चिंब भिजले....
ख-या पाण्यानी रिझ्युम केलं....

त्याने दिलेला नकार सहन करण्यात
वर्षे सरुन गेली
तो तर कधी नव्हताच,कालांतराने
त्याची आठवण पण मरुन गेली....

नको त्या वेदना म्हणून
त्या गावची वाटच सोडली
पण आता ह्या नव्या वाटेवर
एक जुना सोबती नव्याने उभा आहे....

परत निस्तेज जग
ओलं आणि सुपीक वाटू लागलंय
त्याच्या विचाराने आणि साध्या एसेमेस ने
मन दाटू लागलंय....

आता परत नकार पचवण्याची
हिंमत नाही
म्हणून साध्या मैत्रीचा
प्रस्ताव नेण्याची पण तयारी नाही....

का कुणास ठाऊक
त्याला अजून कुणी आवडत असेल
रॅपिड फास्ट लाइफमध्ये
अजून कुणी भुलवत असेल....

काश
काश....ते भाग्यशाली मन
मला होता आलं असतं
पहिले नकार आणि आता हे असं झुरणं
हे नेहमी असंच चालत राहील ?
त्यांच्या प्रेमाला जिंकून मी नेहमीच हरत राहील ?
मी पण एक व्यक्ती आहे आणि मला पण मन
कुणाला तरी कळत असेल ?
मला प्रश्न पडलाय....



- D shivani
नागपूर

Friday, February 22, 2008

स्वप्ने खाट्याळ माझी
स्वप्ने अजुन तरूण
स्वप्नाताला तू कान्हा
स्वप्ने गेली सरून........

तू आलासी tevhaa
जोदलीस प्रीती,
तुझ्यात झाले धुंद
प्रेमाची ती भरती.

येणार तू पुन्हा
संगुन गेला होतास.
मी वाट तुझी बाळगुन
सारखे तुझेच भास.

ऋतु सरून गेले
पाने गळून गेली,
हरून गेलेत वारे,
परत फुलुनी आली वेली.

नाव तुझे लावाण्याची,
सवय केली होती........
reletionship status मध्ये
committed झाली होती.

दिवस, आठवडे महीने
उलटून गेले
आणि मग तू आलास.
परत दाखवुनी स्वप्ने
तू मागे परतुं गेलास.
मी ठरली बावरी राधा
आणि तुही कान्हा झालास.

D shivani
nagpur

Sunday, February 3, 2008

अमृत प्राशन

अमृत प्राशन

दोन नारळ,एक देठ.
नजरेला िमळते नजर थेट.
एक ओलं,दुसरं कोरडं
ितच त्य़ांची शॆवटची भॆट.


आजन्म सोबत राहण्याचा नेम
तीथेच जुळलं त्यांचं प्रेम
पण......................


प्रेमाच्या वैर्यांन्ना आिण
नारळाच्या दलालांना
हे कधी पटलच नाही,
सुरु झाला प्रवास एक
अनोळखी गेम.

नवा प्रवास,
प्ण जुनाच ध्यास.
कुठेतरी िविलन होण्या आधी
ऎकदा भेटण्य़ाची आस.

िदवस,आठवडे मिहने झाले
एक मेकान्च्या आठवणींचे सुकुन न्हाले.
स्वतःचा व्यापार बघुन
त्याच क्शणी जाहले.

आज िविल्न होण्याची वेळ आली.
अमृत बर्िफ़ ब्नवण्याची तयारी झाली.
एक ओलं,दुसरं कोरडं नारळ खव्यात
िमसळण्यात आलं.
ंिवलग होउन,मैलांचा प्रवास करुन पण
दैवतवानं ऎक्मेकात िवलीन होता आलं.

आज त्या दोघांना जगण्याचं सार्थक
झाल्यासर्खं वाटत होतं,
आिण ती बरफ़ी ंमझ्या प्रीयकरा कडुन
खताना अमृत प्राशन केल्या सरखं वाटत होतं,..................

अमृत प्राशन केल्या सरखं वाटत होतं,..................


D shivaनी
nagpoor