Wednesday, October 22, 2008

धेय बांधणी

एक ध्येय निश्चित झालं,
की वाट आपोआप सापडते.
हजार कारणं न करण्याला देण्याऎवजी,
एकच कारण करण्यासाठी पुरेसं ठरते.

सुरुवात करायला फ़क्तं
एक स्टार्ट कारायचं असतं.
ध्येयावरच प्रेम करत,
वादळ प्यायचं असतं.

सुरुवात तर करायची आहे,
अपयश पचवण्याची
सवय करायची आहे.
एकदा का अपयश गवसल
की यशाच टेलीग्राम आपोआप येतो.
फ़क्त तो वाचण्याची पद्धत शिकायची आहे. ....

तेव्हा..

तुझीच वाट,जगताला ह्या
अर्जुन संयम कायम ठेव.
एका यशाची देणे मोठ्ठी कींमत,
राधेय दान मानी रुझव.

अडथळे येतील रोजच मित्रा,
मीरेसम भक्ती ह्रुदयी वसव.
प्राक्तन असेल तुझेच आसमंत,
नैवेद्द्यी एकलव्यी निष्ठा चढव.

D shivaनी
nagpoor

No comments: