Thursday, July 17, 2008

आज जरा दुकानात सीझन एंड चा सेल लागाला होता.

कमर्शियल चढाओढित सावळा का मागे राहील?
प्रोफ़ेश्नलिझम ची ओढ तो काय फ़क्तं पाहील?

आज साधा फ़ुकटात कुत्रा सुद्धा हुंगत नाही,
मग ह्या जगाच शहनशाहा क्रुपा फ़ुकटात दाखवील?

"there is no free lunch"चं जग सारं
मग देव काय प्रसाद फ़ुकटात वाटिल?

म्हणुन मी पण जरा तयरिनेच गेले होते,
सोबत दक्शिणा,फ़ळं शिवाय मी काय भक्ती नेईल?

देवाला पण जरा नेमकं ठाउक असणार,गिर्हाइकाची जात,
नाही तर तो काय सगळ्यानाच कन्सेशन देइल?

चार आठाणे टाकुन,साकडं घालतात जगदिश्वराला,
मग गाभारा मॉल चं रुप का नाही घेईल?

आज जरा दुकानात सीझन एंड चा सेल लागाला होता.
मागायला गेले फ़क्तं त्याची साथ,
तर डिस्काउंट माधे तोच उभा होता.

D shivaनी
nagpoor
१७ जुलै २००८

No comments: