Monday, December 1, 2008

आज मन

आज मन मा्झं आक्रोश करत नाही.
पण ह्रुदय मात्रं हुमसुन रडतय.
सारं का्ही,रोज सारखच,पण
ह्रुदयातुन आ्ठवणीचं रक्तं गळतय.

चौघडे सनई वाजती त्या पलीकडे,
एकटेपण वणव्याचं रुप घेतय.
केळीचे खांब,आंब्याचं तोरण लावलय तेथे,
येथे क्षितीज दुखःत वाह्तय.

गाभर्यात त्याने दुर केलं मला,
मी त्याच क्षणी,स्व्तःला संपवलय.
आता फ़क्तं श्वासांना ओढतेय,
मरुन स्वतःत त्याला जगवलय.

पापण्या थकल्यात माझ्या,
अश्रुंचे पुर लोटता.
त्या तरळत्या पण्यातही,
मी तुला बघितलय.

कैकदा मी प्रयत्नं केला,
विसरुन जाईल म्हणते.
स्वतःलाच विसरुन मी,
आठवणींना स्मरतेय.

D shivaनी
Nagpoor

No comments: