Wednesday, June 13, 2012

कम्बख्त किसीके आने से मुलाकात गैर होगयी....

Monday, November 21, 2011

पोरी, जपून चाल....

सगळं काही गोड, गुलाबी चटकदार वाटणारच.
तू नव्या ऋतूला आन्दनात ठेवलय.
नवे वारे, नवा उत्साह सगळं काही भुलावणारं,
वाफाळतय नं सगळं.
उकळल्यावर मात्र कडवट पणा राहील पोरी, जपून चाल....

D shivaनी
Nagpur

Tuesday, March 29, 2011

Koi deewana kehata hai..

कुणी दिवाणं म्हणतं मला,कुणी पागल समजणार,
पण ह्या धारेची तहान,फक्त ते ढग समजणार.
तू म्झ्याहून दूर कशी आहेस,अन मी दूर कसा?
हे तुझं मन समजणार,अन माझं मन समजणार.

भ्रमर कुण्या कळीवर भाळला तर होणार हंगामा,
आमच्या मनात कुठले स्वप्नं प्रसवले तर हंगामा.
एव्हाना डुबून ऐकत होते किस्से प्रेमाचे,
मी किस्स्याला,वास्तवात उतरवले तर हंगामा.

प्रेम तर एक पावन कथा आहे जाणिवांची
कधी कबीरा दिवाना होता,कधी मीरा दिवाणी आहे.
सगळे लोक म्हणतात,माझ्या डोळ्यात अश्रू आहेत.
जे तू समजली तर मोती,नाही तर पाणी आहे.

मूळ रचना : डॉ कुमार विश्वास.गाझियाबाद
अनुवाद:शिवानी दानी,नागपूर

Wednesday, January 26, 2011

asa hi karun bagha

कालीदास म्हणाला,मी प्रियेला
ढगावरुन चित्रं पाठवतो.
ते ऎकु्न शास्त्रंध्न्यं म्हणाले,
कविता लिहि नाही तर बडवतो.

आज नोकियाच्या एम एम एस ची एड बघितली.
आणि जाणवलं,
त्या कालिदासाची कल्पना त्या विध्न्यानाने ऎकली
असती.
तर जगातली सगळी उपल्ब्धी आपल्या घरी आली असती.

आजही कित्येक डोक्यांना,मुर्खं म्हणुन थांबवल्या जातं.
स्वप्नांना उडण्या आधीच मारलं जातं.
बिन्धास्त बघा स्वप्नं मित्रांनो.
जग तुमचं आहे.तुमचाच आभाळ.
कालिदास ही तुमचाच आहे.
बिन्धास्त बघा स्व्प्नं.आ्णि स्वप्नांना पुर्णं करण्यास बळ आणा.
अडलाच कुठे मधे तर त्या काली दासाला आठवा...................

D shivaनी
Nagpoor

Monday, January 10, 2011

aivayi

आज फिर उसके दर पे जाने को जी करता है.

रोज कि हवा ओ ने रुख मोड लिया हो,
वो फासला आज मिटाने को जी करता है.

वही सब मुकाम दस्तक दे राहे है,
उनसे हाथ मिलाने को जी करता है.

जीन हाथो को किसी और के लिये पीछे छोड आई थी
उसे फिर गले लगने को जी करता है.

वो चौकठ सुनी है मेरे बगैर,
फिर उसे मस्ती के रंग मे रंगाने को जी करता है.

Dshivaनी
Nagpoor-USA

Thursday, March 18, 2010

निखळ जगलो होतो.

अजुनही कातरवेळी
मी जाते त्या पारावर.
जीथे आपण एकदा
सहज विसावलो होतो.

संवादही प्रस्रुती,
ओळखीच्या रस्त्यावर,
जीथे आपण बोलण्यात
गुंग झालो होतो.

तुझे ते हसणे आपसुक,
मी मनात बांधुन ठेवलेय,
त्या चार क्षणांना अवचित,
आपण निखळ जगलो होतो.

D shivaनी
Nagpoor

Sunday, February 14, 2010

एलर्जी

मला पानझडिच्या
पानां समावेत गळुन गेल्यागत वाटतय,

क्षितीजावर पसरलेल्या
रंगांसारखं,टोटल मिक्स होऊन गेल्यागत वाटतय.

प्रवाहाच्याच दिशेने,
पण थोडं कडेनी प्रवास करावासा वाटतोय.

आणि आकाशात उंच,कधीही
परत न येता येण्यासाठी उडावसं वाटतय...

कटल्यावर पेचातुन पतंगी सारखं,
म्हणेल त्या दिशेनं वाहुन जावं वाटतय..

आले तर खुश ,
अन नाही तर अजुनच खुश मन आज होतय.

कदाचीत मला माणसांची एलर्जी होतेय....
आणि कदाचीत स्वतःची सुद्धा...........

D shivaनी
Nagpoor
21st jan 2010