Thursday, April 17, 2008

मला प्रश्न पडलाय....

मला प्रश्न पडलाय....

पाडगांवकर म्हणतात ना,
"वयाची १६ वर्ष सरली की प्रेमाची फुलं फुलू लागतात."
मी म्हणेन,"आणि म्हणूनच अवास्तव गोष्टी वास्तवात घडत असतात."

वयाची १६ वर्ष सरली
मी प्रेम केलं होतं.
माझं मन मग त्याच्या गावी गेलं होतं....

दिवसांमागून दिवस
स्वप्नांचे झुले बांधण्यात गेले
वास्तवाचा पाया नसतांना
भविष्याची महालं बांधण्यात गेले....

प्रेमात चिंब भिजण्यासाठी
मी त्याला प्रपोज केलं
चिंब भिजले....
ख-या पाण्यानी रिझ्युम केलं....

त्याने दिलेला नकार सहन करण्यात
वर्षे सरुन गेली
तो तर कधी नव्हताच,कालांतराने
त्याची आठवण पण मरुन गेली....

नको त्या वेदना म्हणून
त्या गावची वाटच सोडली
पण आता ह्या नव्या वाटेवर
एक जुना सोबती नव्याने उभा आहे....

परत निस्तेज जग
ओलं आणि सुपीक वाटू लागलंय
त्याच्या विचाराने आणि साध्या एसेमेस ने
मन दाटू लागलंय....

आता परत नकार पचवण्याची
हिंमत नाही
म्हणून साध्या मैत्रीचा
प्रस्ताव नेण्याची पण तयारी नाही....

का कुणास ठाऊक
त्याला अजून कुणी आवडत असेल
रॅपिड फास्ट लाइफमध्ये
अजून कुणी भुलवत असेल....

काश
काश....ते भाग्यशाली मन
मला होता आलं असतं
पहिले नकार आणि आता हे असं झुरणं
हे नेहमी असंच चालत राहील ?
त्यांच्या प्रेमाला जिंकून मी नेहमीच हरत राहील ?
मी पण एक व्यक्ती आहे आणि मला पण मन
कुणाला तरी कळत असेल ?
मला प्रश्न पडलाय....



- D shivani
नागपूर

No comments: