Friday, May 2, 2008

स्वस्तं झाली माणुसकी.............

महगाई वाढ्ली म्हणे,
दारु स्वस्तं आणि ,तेल महाग झालं आहे.
पण आपण मुक गीळुन,जास्तं पैसे मोजताना
जपतो भ्रष्टाचाराशी बांधिलकी.
स्वस्तं झाली माणुसकी.............

ह्या विरोधात शक्ती प्रदर्शन करावं,
पोलिसांचा दंडा,आणि उगाच झमेले
कशाला म्हणुन मागे परततो.
एकटा कंठ टाहो फ़ोडतो
आपण महागाई वाढ्ली म्हणुन ,
अर्ध पोटी निजवतो डोळे,विझवतो खिडकी
स्वस्तं झाली माणुसकी.............

बाजारात तरुणीला,काही छेडतात,
नको नको ते बोलतात........
आपण........
आपण मात्र कशाला राडा म्हणुन
तिच्या आब्रु ला दावा वर लाउन
तुडवत निघुन जातो तिची पोटत्तिड्की
स्वस्तं झाली माणुसकी.............

वर्तमान पत्रात,रोज आत्महत्येच्या
बतम्या वाचतो,
कचेरित जाताना,बेबुनियाद
चर्चा करतो........
मदत म्हणुन जेव्हा त्यांच पिक
थेट खरेदी करण्यास गाव बाजाराचं
बोलवणं येत.
तेव्हा कशाला ते भाव करणं आणि चिकचिक
म्हणुन mall चा रस्ता धरतो.
सकाळी म्हणतो मिळत नाही वाचायला चवदार बतमी
स्वस्तं झाली माणुसकी.............


D shivaनी
nagpoor