Monday, June 23, 2008

प्रेमात हरण्यार्यां साठी लिहिलं आहे,


प्रेमात हरणार्‍यांसाठी लिहिलं आहे,
"प्रेम म्हणजे मिळवणे,जिंकणे नव्हे".

आज मी आयुष्याच्या नव्या उंबरठ्यावर उभी आहे.
स्वप्नांची होळी आज मी लावणार,
आणि नव्या आयुष्यात पहीलं पाउल टाकणार.


ह्याच होळीच्या बाजुला गर्दी का दिसतेय?
लोकं का जमलीत?
अरे ती जल्लोष का करतायेत?
oh.............
दुरुन तर तो मुलगा तुझ्या सारखा दिसतोय.
काही पण.........
कदाचित अजुनही प्रेम करते तुझ्यावर,
प्रत्येकात तुझाच भास होतोय.

पण नाही.......

अरे हा तर तुच आहे.

माझ्या होळिला यज्ञकुंड बनवून
तुझ्या प्रेयसी सोबत सात जन्माचं नातं जोडतोय.

तुला तुझं प्रेम मीळालं,
मी मात्रं प्रेमात हरले.
म्हणूनच.......कदाचित....
नाही म्हणुनच
प्रेमात हरण्यार्‍यांसाठी लिहिलं आहे,
"प्रेम म्हणजे मिळवणे,जिंकणे नव्हे".

मी म्हणेन,
"प्रेम म्हणजे हार पत्करणे,जगणं नव्हे"

D shivaनी
nagpoor
22 june 2008

No comments: