Saturday, December 27, 2008

जगण्याचे गाणे नसते

जगण्याचे गाणे नसते,
असते केवळ बहाणे.
जो टाहो फ़ोडी नशिबाला,
त्याचे तर केवळ नाणे.
जगण्याचे गाणे नसते....

असतात केवळ गरजा,
त्या पुर्या करण्यास मग्न.
जो करतो कुणाच्या राखुन,
त्याचे तर व्यर्थ जगणे.
जगण्याचे गाणे नसते....

होते डोईजड जगणे,
श्वास ही उधार मागतो.
आकाशी बघतो आशेने,
दिशा गाठण्या थकतो.
क्वचीतच येतो हाथ कुणाचा.
तोवर जीव निसटून वेदना उरणे.
जगण्याचे गाणे नसते....

मनावर झालेल्या वेदना,
त्यांचे घाव ही असती कोवळे.
वाट कशाची बघु कळेना,
हे परतीचे जल्लोश सोहळे.
ताम्रपटावर जीवनाच्या मग,
भावनात हरवुन झुरणे.
जगण्याचे गाणे नसते....

कुठवर शोधत केवळ,
चालणे हा रस्ता एकटा.
बिकट ठरती वाट प्र्त्येक,
प्रवास्याला मारी फ़टका.
असं जगण्या पे्क्षा अवचीत
बेहतर ठरेन मरणे.
जगण्याचे गाणे नसते....

घेतला मी निरोप नुकताच,
परतीची तयारी करते.
थांबले कुठे अगदीच ,पुन्हा
ह्या शब्दात वेदना गवसते.
काय तारीफ़ ह्या शब्दांची,अमर असुन
ह्या कडुन मरणाचे बळ मिळणे.
जगण्याचे गाणे नसते....

D shivaनी
Nagpoor

No comments: