Tuesday, June 24, 2008

बरसणार बरसणार


बरसणार बरसणार
चार दिवस असाच बरसणार,
मग आभाळ फ़ाटल्यावाणी,
आक्रोषाने झोडपणार.

रीमझीम रीमझीम पाउस
मनात घर करुन बसतो,
कधी प्रेमाची आठवण,
कधी बालपणात नेउन सोडतो.

कधी बाइक वर लॉंग ड्राईव्ह ला नेतो
मित्रांसोबत ओलं होत.
कधी घर गळतय म्हणुन,
घरी बसतो पाणी टिपत.

कधी गरम गरम चहा,
आणि सोबतीला समोसे.
कधी वाटतं उन्हाड होउन फ़िरावं
पण उगाच इमेजचं ओझे.

कधी कपडे सर्दं म्हणुन
परत धुणं.
कधी पाउस अवकाळी म्हणुन
परत पिळणं.

हा रीमझीम पाउस
पिकांना सुखाउन आत्महत्येची चिता विझवतो.
आणि पुढे नव्याने पाउल टाकण्यासाठी
नवं अंकुर उगवतो.

हा रीमझीम आहे तोवर ठीक आहे,
कारण

पावसाला कैफ़ म्हणजे
मरगळ,चिख्खल,वैताग,सुट्टी
संहार,प्रहार,पुर विध्वंसं.
घरात,रस्त्यावर,शेतात आणि डोळ्यात पाणी.

म्हणुन रीमझीम पावसाला enjoy कर
आणि वादळाला समोर जाण्याची तयरी ठेव

कारण.
बरसणार बरसणार
चार दिवस असाच बरसणार,
मग आभाळ फ़ाटल्यावाणी,
आक्रोषाने झोडपणार.

D shivaनी
nagpoor

25 june 2008

No comments: