Thursday, July 3, 2008

बंद चा आवाज देश भर उठतो.

कोणी म्हणे नौटंकी.
कोणी म्हणे देशप्रेम,
कोणता मुद्दा?कश्याचं काय?
ह्याचा कुणालाच नाही नेम.
आगीचा भपका,मनात धगधगतो
बंद चा आवाज देश भर उठतो.

ह्याला हे तर आम्हाला पण ते मिळुच दे.
पैशानी देव विकणार्याला पण ते कळु दे.
श्क्ती प्रदर्शन करु,शंढांना ती दखउन देउ.
हक्क तो आमचा,आमच्याच जमिनीत उधार दे.
शेवटी एकाच धडाचे दोन हाथ,
मोठे होण्यासाठी झगडतो.
बंद चा आवाज देश भर उठतो.

कधी कधी तो मुद्दा सामांन्यांपर्यत पोहोचतच नाही.
वरच्या वर निर्णय होतात खाल पर्यंत ते गळतच नाही.
फ़क्तं झळ पोहोचते,दैनंदीन जिवनात,
सामान्यांचा हुंकार वरचा ऎकतच नाही.
तोड फ़ोड,जाळ लोट ह्यानी अगदी उब येतो,
जेव्हा
बंद चा आवाज देश भर उठतो.


D shivaनी
nagpoor
3 july 2008

1 comment:

Shashank said...

sadya paristhivar chhan kavita aahe. keep writing.