Monday, December 22, 2008

स्वस्तं हास्य

आजवर मी हसण्याला सुद्धा वजनाच्या काट्यात तोलायची.
दुखःला हलकं करुन ,हसण्याला नेहमी स्वस्तं ठरवायची.

आज चायला काही तरी वेगळच झालय.
मीच स्वतःला आज वेगळच बघितलय.

गाडीत नेहमी प्रमाणे ड्रायव्हर सीट वर बसुन गाडी वेगाने पळवली.
तोच वेग,तिच दिशा पण अचानक स्पीड कुठेतरी कमी झाली.
त्याने हाथ गेयर स्टिक वर माझ्या हाथावर ठेवला.
आणि खरं सांगते,माझ्या आयुष्याचिच स्पीड consistent झाली.

आज मझ्या मनाला त्याचा सारखं कोणीतरि दिसलं होतं.
पापण्यांनी आता पापण्यांनीच पांघरल्ं होतं.
माझ्या थरथरणार्या श्वासांना कशाची तरी ओढ होती.
जग जिंकणारी मी त्या दिवशी मी स्वतःशीच हरली होती.

गाडी तीच,फ़क्तं जागा बदलल्या,
मी फ़्रंट सीट ला बसते खरी,ड्रायव्हर तेव्हडा बदलला.
माझ्या हाथात स्टेअरींग च्या जागी त्याचा हाथ असतो.
अनामिक नात्यात,मी माझा दादागीरी स्वभाव हरवला.

नेहमीचे वारे आज ब्रुटस बनलेत माझा साठी.
त्या़च्या साठि मी स्वतःला सीझर बनताना बघितलय.

वार्यानी धरला त्याचा धावा नेहमी,आज मी पण त्याच दिशेने निघालीय.
का असं होतय?
प्रश्नं पडला मला,
महाग वाटणारं हास्यं इत्क्या स्वस्तात कसं मिळतय?????

D shivaनी
Nagpoor

No comments: