Wednesday, July 30, 2008

बाबा म्हणाले पुन्हा नवा रस्ता बांधणार......

आपल्या कडे रस्ता आणि खड्डे हे एक बॅलेन्स्ड एक्वेशन बनलेलं आहे,आणि त्याच बरोबर प्रत्येकाचे अनुभव पण.
असच नविन रस्त्याचे बांधकाम बघ्य्न,नवा रस्ता बांधणे,ह्यावर एका १०-१२ वर्शाच्या मुलाची व्यथा मांडली आहे.


देश प्रगती करतोय म्हणतात सगळे,
आता नव्या रुपा साठी देश कात टाकणार.
वर्षानु वर्षे खड्डे बघितलेल्या रस्त्याला
बाबा म्हणाले पुन्हा नवा रस्ता बांधणार......

काय! रस्ता बांधणार?

म्हणजे आता पाउस आला की,
रस्त्यावर पाणी नाही?

शाळेत काय फ़क्तं हस्तकलेचा तास टोलवाय्चा?
खरी खुरी नाव कुठल्या पाण्यात सोडायची/?
जास्तं पाऊस आला तरी शाळेला सुट्टी नाही मारायची?

खड्ड्यात ल्या पाण्याला मित्रांवर पाणी कसे ऊडवायचे?
भर्रकन सायकल नेउन काठाहुन जाणार्या काकांच्या
आंगावर चिखलाचे शिंतोडे कसे ऊडवायचे?

पाय घसरला सांगुन मुद्दाम कुठल्या पाण्यात पडायचं आता?
काहीच राडा नाही फ़क्ता रुटिन जाता येता?

बापरे किती बोअर होइल लाईफ़?
पाउस फ़क्तं खिडकीतुन बघावा लागेल,
फ़ुलप्रुफ़ ड्रेनेज सिस्टिम मधुन पावसाचं
पाणी डोळ्यातुन ओसरु द्यावं लागेल.

हीच डिमांड आहे म्हणे जनतेची
म्हणुन सरकार नवा मार्गं स्विकारणार,
प्रगतीच्या नावे चेहराच बदलवणार.

डोक्यात जातेय ही गोष्टं,
पण हे असच होणार.
वर्षानु वर्षे खड्डे बघितलेल्या रस्त्याला
बाबा म्हणाले पुन्हा नवा रस्ता बांधणार......

D shivaनी
nagpoor

No comments: