Sunday, June 29, 2008

कधी कधी प्रश्नं पड्तो,

कधी कधी प्रश्नं पड्तो,
तु मोठा की मी मोठी?

जगाच्या गाराड्यात
एक युद्धं खेळते,
तुला सोबत ठेउनच,
एक एक पायरी गाठते.
पण कित्येक वेळी
तुझ्या समोर मी ठरते खोटी.
कधी कधी प्रश्नं पड्तो,
तु मोठा की मी मोठी?

मनाचा संयम ठेवावा लागतो,
प्रयत्नं पण बरीच चालतात.
कधी यश हुलकावणी देतं,
कधी दिवस "बैसाखी " मनवतात.
तुझ्या सोबत ताळमेळ ठेवणं
म्हणजे एक तिमिर कसोटी.
कधी कधी प्रश्नं पड्तो,
तु मोठा की मी मोठी?

तुला काय नाव द्यावं
हे कोडं कधी उलगडत नाही.
कधी स्ववलंब,कधी स्वभिमान
कधी गर्वं तर कधी अभिमान म्हणवत नाही.
तु एक अविभाज्यं,अक अतुट घटक,
आणि आयुष्यं एक सचोटी.
कधी कधी प्रश्नं पड्तो,
तु मोठा की मी मोठी?

D shivaनी
nagpoor
29 june 2008

No comments: