Thursday, April 17, 2008

एकदातरी मला समुद्र व्हायचय..

म्हणतात की धाव आकाशाची घ्यावी
आणि म्हणूनच
एकदा तरी, अवघा आसमंत
सामावणारा समुद्र व्हायचय

किती प्रेम करतेस नेहमी विचारतात
कधीच मोजू न शकणारी खोली
म्हणजेच माझं हे प्रेम सांगायला
एकदा तरी, समुद्राच्या खोलीला माझ्या
प्रेमाची ओली बनवायला समुद्र व्हायचय..

प्रत्येक नदी आपलं ध्येय म्हणून समुद्र गाठते..
पण सगळ्यांना सामावून घेणं हेच ध्येय
ठरवून समुद्र स्वतःला खालवतो..
असाच सर्व दूर , सगळ्यांना सामावून घेण्याची
वृत्ती बनवायला..
एकदा तरी समुद्र व्हायचय..

लाटांवर स्वार होत समुद्र क्षितीजा पलीकडे पोहचतो
वास्तवात माहीत नाही, पण क्षितीजा पलिकडे उभ्या
असलेल्या तुझ्यापर्यंत पोहचण्यासाठी
एकदातरी मला समुद्र व्हायचय..
एकदातरी मला समुद्र व्हायचय..

D shivani
nagpur

No comments: