Saturday, October 25, 2008

कधी न कळले मजला

कधी न कळले मजला,प्रेम कशाला म्हणतात?
कधी न कलले मजला,भवना कश्या जपतात?
भोवले मज सदैवं एकटेपण गर्दीत,
कधी न कळले मजला,मित्रं का परके वाटतात?

का मित्रांची मैत्री आज कमी वाटु लागली.
वाळवंटात पण,पाणी ही का कोरडे वाटु लागले?
उगा केला बोभाटा,त्यांनी सोबत असण्याचा.
कधी न कळले मजला,तारे का रात्रीच गळतात?

चालले मी तिमिर गतीने,काळोखाच्या दिशेने,
वाटेत तारे रवी,मी परतवण्याच्या प्रयत्नाने.
लख लखाट मज नकोसा आता,नको ती गजबज.
कधी न भोवला प्रकाश मजला,काळाचे केवळ पार बदलतात.

आज वाजली टाळी माझी एका हथाने,
नको आता मज दुसरा हा निनाद करण्यास.
प्राक्तन माझे व्हावे आता निश्चल शांतीत.
उगा करुन प्रपंच,का भगव्य मनाला कोंडतात???

D shivaनी
Nagpoor

No comments: