Sunday, June 15, 2008

आजही

आजही ह्रुदय तुझ्या साठी स्पंदते,
आजही मी तशीच हासते.
जी तेव्हा होती,ती आता नाही,
आजही मी हे स्व्प्नं विणते.

आजही मला लोक चांगलं म्हणतात,
आजही मला लोक प्रसिद्धं म्हणतात.
तुच आहे कारण माझ्या असण्याला,
आजही लोक बावरी राधा म्हणतात.

आजही गुज सांगतात तारे.
आजही तुझाच शहारा आणातात वारे.
रोखु नाही शकत श्वासांना,
आजही यंत्र तुझ्यावरच जगणारे.

आजही ओढा वाहतो प्रेमाचा,
आजही संगम होतो श्वसांचा.
माझ्या जागी आज तुझी प्रेयसी आहे.
आजही होई दिवस आसवांचा.

D shivaनी
nagpoor
14 june 2008

No comments: