Friday, July 25, 2008

मी अशी म्हणुन..............

तु एक मस्तमौला मेघ आणि मी एक शपित सर..........
ह्या पारा वरुन त्या पारावर हुंदडणं नेमकं ठाउक आहे तुला.

माझ्यात प्रेम रस भरला,आणि स्वतःपासुन वेगळं केलं.
पुन्हा तु एका नव्या उंबरठ्यावर आणि मी?
मी मात्रं तुझ्यात माझं अस्तित्वं विसरुन कधीचीच संपलेली.

दर वेळी पाउस येतो,आणि तु तिथेच असतो.
मी पण तिथेच असते,
फ़क्तं तुझा पार बदललेला........



........... किती रुपेरी,ओली क्शण मी माझ्या डोळ्यांना पजलीत.
कधी कधी अनावर हा प्याला,म्हणुन ती ओसंडुन वाहुनही गेली.

पण तु मात्रं माझ्या डोळ्यात बुभुळा प्रमाणे आहेस,
की तु आहे म्हणुन रंग सारे,
नाही तर अंधारच सगळयांना उत्तर आहे.



........... मी तर संशयही केला नव्हता रे,
फ़क्तं प्रेम नावाचा एक कशिदा विणला होता.

जाळ्यात अडकला तु मोहाच्या कदचीत.
मी तर फ़क्तं संसार खुणवला होता...........



............ जे नको होतं तेच झालं.
भघ ज्याची भीती होती तेच घडलं.

म्हणतात की,
दोघांमध्ये एक जण अमाप प्रेम करतो.
आणि आपल्यात ती मी नसावी असं स्वप्नं होतं.
पण...........
तु आणि मी कधी आपण झालोच नाही.
आणि अमाप प्रेम मी एकटिनेच केलं,
जे अतुल्यं रहीलं.



............ आयुष्यं कुरतडलय,मी असच म्हणणार नाही.

पण कधीही नं जाणारं व्रण दिलय सोबतीला,

जे काही केल्या मिटत नाही.

आणि काळाला सोसवत पण नाही.

............मला तुला दोष द्यावा असं वाटतच नाही.
काही केल्या तुझा प्रवह डबकं म्हणुन साचतच नाही.

का माझं प्रेम तुला उअमगलच नाही.
तुझ्याही ह्रुदयाला,झंकारुन प्रेमाचा प्रतिसाद स्फ़ुरलाच नाही.

मी मात्रं ह्या का?चं उत्तरही शोधत नसते,
तु जरी नाही तरी तुझ्यावर केलेलं प्रेम मनाला जगवत असते.



............अडवला पदर जरी माझा,

तो थामण्याची ग्वाही दिली नाही.

विश्वास घात झाला असही कसं म्हणणार?

प्रेम केलं होतं,तुला कधी अड घातली नाही...........



...............आठवणींना कधी वेळेची तमा नसते,आणि ती नसावीही.....
मग तुला विसर,असं नियती का खुणावते?

तु तुझे विचा,तुझं गाव सगळं बदललं,
आता मी ही माझा रस्ता बदलावा असं सगळे का म्हणतात?

मी तु्झ्यावर फ़क्तं प्रेम केलं,
प्रेम पुर्तीची अपेक्शाही होती खरी.....
पण त्याने काय फ़रक पडतोय,?
तुझा माझ्या जगण्याला दिलेला खो,
आणि तुझी इच्छापुर्ती एवढं कारण पुरेसं आहे.
आणि अखंडं राहील............
कारण
आठवणींना कधी वेळेची तमा नसते..........


.......... व्रुक्शं रुतु बघतात,
त्यांना काळ पलटवण्याचं कुतुहल असतं,
आणि व्रुक्शाला आपल्या भोवती कड्या वाढवण्याचं.

माझं तसं नाही आहे.

आयुष्यात पहीला श्रावण शेवटचा ठरला आजवर,
नवी पालवी फ़ुटली कौस्तवाची.
पानझड तु घेउन आलास.

आता माझं आयुष्यं इथेच थांबलं.
ना रुतु,ना सर,ना पानझड.
आणि मी तशीच निःशब्दं,
पहिल्याच श्रवणाच्या प्रतिक्शेत.



............. मी तुझ्यावर अमाप,असीम प्रेम केलं.
आणि जगाच्या प्रत्येक वस्तवाने तुला
माझ्यात नं मिळ्ण्याची साजिश केली.
मी सरळ आणि प्रत्येक रस्ता उलटा
येउ लागला.........................
कदाचीत मीच वाकडा रस्ता धरला.

आज म्हणुनच मी एकटी उभी आहे.
एक भयाण आकश आणि टोचणार्या
चांदण्या सोबतिला आहे.
असंख्य लोकं चहुबाजुला माझ्या.
त्यांची तिरपी नजर,
सगळ अंगावर झेलते आहे.
कदाचीत मीच वाकडा रस्ता धरला.


D shivaनी
nagpoor

No comments: