Monday, October 6, 2008

नागपुर

नागपुर,
दिलखुलास जगणार्यांचं,
मनापासुन खाणार्यांचं शहर.

सकाळ्च्या पोहे तर्रीला,
केशव च्या आलु बोंड्यांना.
टप्री वरच्या सिगारेट ला
नागपुर शिवाय तोड नाही.

घुगरेंच्या वडापाव ला,
तेलंगखेडी च्या समोस्याला,
यशवंत स्टेदिअम च्याशिकंजी ला
नागपुर शिवाय तोड नाही.

बजाज नगर च्या पानीपुरीला,
धंतोलीत्ल्या पावभाजी ला,
राम भंडारच्या लस्सीला
नागपुर शिवाय तॊड नाही.

हल्दिराम च्या मोतीचूरच्या लाडुला,
हीराच्या काजुकत्लीला,
घाटे च्या मसाला दुधाला,
नागपुर शिवाय तोड नाही.

अस्स्ल सावजी जेवणाला,
धाब्यावरच्या अंडाकरीला,
नाक्याजवळच्या चिकनला,
नागपुर शिवाय तोड नाही.

नागपुरात अस्सल चटखोरे राहतात.
जगण्यासाठी खाण्याऎवजी,
खाण्यासठी जगतात.
दिलखुलास व्यक्तिमत्वं,
बिन्दास्त शैली,
जिभेचे लाड,जगवेगळी मैत्री,
रत्रीच्या पार्ट्या,
ट्प्री वरचा चाहा,सोबत globalisation च्या
स्पर्धेतलं आपलं स्थान,
ह्या सगळ्याच्या समीकरणाला
नागपुर शिवाय तोड नाही

D shivaनी
Nagpoor नागपुर,

No comments: