Saturday, June 14, 2008

तुमच्याच कवितेवर ताव मारते.


आज काल माझ्या शब्दांना लयच गवसत नाही.
भावना over flow होतात पण,वाटच मिळत नाही.

हथात लेखणी घेतल्यावर,पानं कोरी राहुन जातात.
मी आत कासावीस होते,त्या वेगाला शब्दं अड्वतात.

सगळ्यांचा कविता वाचुन घेते,समर्पक प्रतिक्रिया ही देते.
माझ्या शब्दांच्या बांधणीला मात्रं,अधुरी एक कविता राहते.

सगळ्यांच्या शब्दांना वाहवा,शब्बासकी कधी मुजरा,कधी सलाम मिळतो.
माझ्या शब्दांकडे सहसा कुणी वळतच नाही,
वळालच तर कधी छान आणि बरेचदा अपुरी कवितेचा शेरा मिळतो.

कदचीत मनानी भीती बाळगली,चककं धास्तीच बसली,
"चालत रहा" ऎकुन सुद्धा माझी लेखणी थरथरली.

आज सगळ्यांचा पावसात मन ओलं चिंबं झालय,
आणि शब्दांना पण एक अंकुर फ़ुटलय.
आता ठरवलय की शब्दांना पुर्णं न्याय द्यायचा.
आणि एकदा तरी शब्दांवर उत्तम प्रतिसाद घ्यायचाय.

बोचर्या वार्यात,आणि शहारणार्या पावसात
शब्दांना जरा गरम गरम फ़ोडणी घालते.
नाहीच जमलं तरीपण मग तुमच्याच कवितेवर ताव मारते.

D shivaनी
nagpoor

No comments: