Monday, June 16, 2008

एका बादलीत तोंड बुडउन,


एका बादलीत तोंड बुडउन,
नाकातुन हवा पण सोडता येत नाही आहे.

गुदमरुन जाईल रे मन ते,पण मनाच्या
पेटीचे कवच तोडुन एकही तार जोडता येत नाही आहे.

अर्ध्यावर आला रे खेळ हा,आता नव्याने सुरवात
करायला खेळ मोड्ता येत नाही आहे.

आयुष्याचीच सुत्रे जोडलीत नं,आता सगळं
संपलं म्हणुन एकतर्फ़ी नातं तोडता येत नाही आहे.

पिसाळलेल्या कुत्र्या सारखे लचके तोड्ले तिने पण,
नियतीला कुत्र्यासारखं झोडता येत नाहई आहे.

अस्व्स्थं व्यथा माझी,अल्याड मी आणि पल्याड
जीवन,मधली नाईलाजाची भिंतं फ़ोडता येत नाही आहे.

D shivaनी
nagpoor
15 june 2008

2 comments:

HAREKRISHNAJI said...

केवढी केवढी ही अस्वस्थता ?

D shivani said...

hmmmmmm.pratyekacha manat hi aswasthata aste,mi fakta shbdat mandaliy.