Friday, April 18, 2008

तरुणाइची मन्दी होती.......................

मला ना थोडी वेगळीच सवय आहे

आयुष्याच्या घरातले प्रत्येक दार

उघडुन बघण्याची..................

बरेच नजारे बघितले,

सुखवणारे,भुलवणारे,

पन तयारी नव्हती ह्या अनुभवाची.


आज MR Beens च्या कॅफ़ेचं दार

तस मुद्दामच चुकुन उघडलं,

भर दुपारी डोळ्यासमोर

पहाटेचं धुकं पसरलं.


मस्तीत वावरणार्‍या तरुणाईला

नशेची धुंदी होती,

मनानी चिरतरुण चालतील,

पण तरुण प्रौढांना बंदी होती.


म्हणुन प्रत्येक पाउल

आमचं अडखळत होतं,

पण तरुणाईच्या ह्या कैफ़ाला

बघण्याची हीच एक संधी होती.


म्हणतात तरुण देशाचे नागरिक

आणि वर्तमान घडवतात,

पन ह्या बाजारात वर्तमान आणि भविष्य

घडवणार्‍या तरुणाईची मंदी होती......................

D shivani

nagpoor

1 comment:

मोरपीस said...

फ़ार फ़ार आवडली तुमची कविता