
एक अद्भुत प्रयत्न
श्वास घेतांना ,आठ्वणिच्या प्रत्येक
क्शणाला मी गिळलं
आणि श्वास सोडतांना
सगळं धुरात मिसळवलं.
आज नकोच ते आठ्वणींचं
डोळ्यात तरळणं,
म्हणुन त्याचं जग मी
डोळ्याबाहेर ओघळवलं.
माझ्या मनाचा आक्रोश
नाही कळायचा त्याला,
म्हणुन त्याच्या आनंदात
मी जगणं मालवलं.
हा एक अद्भुत प्रयत्नं,
मला क्शितिजा पार नेइल,
पण तेव्हाही तु माझ्यातच असशिल
हे मला तेव्हा जाणवलं.
तु असशील ह्या पार तेव्हाला
मी क्शितिजा पार असेन,
तु जिंकावं प्रेम तुझं
म्हणुन मी स्वतःला हरवलं.
मी जगेलही तेव्हा,
तुझ्या नसण्यात रमुन जाईल.
मी धुर बनवला तेव्हा,
आज मढाला धुराने कवटाळलं
D shivaनी
nagpoor
1 comment:
mast kavita aahe.
Post a Comment