Monday, July 14, 2008

बहर मागितला होता तुला

तु पान झडिचं रान दिलं.

गुलाबाचं फ़ुल मागितलं

तु कॅकटसचं पान दिलं


नसेल मी ह्या जगतात जेव्हा,
तुझ्या डोळ्यां मध्ये दोन अश्रु येतील.
किमान माझ्या दुसर्यांदा मरण्याने
तुझ्यात आठवणींचे पुर येतील.

आठ्वतय,तुझ्या आठवणीत
म्रुग,वसंत आणि शिशिर पालटलीत.
पाऊस तुझीच कहाणी ऐकवुन गेला
बघ,सांभाळ कदाचीत आता तुला माझे वेड लागेल.

गंधं आसेलही मोगर्याचा तो,
पण तुला आपला वाटला नाही.
त्याच मोगर्याचा सेज चढ्वला चितेवर माझ्या
पण तुला तरीही माझ्या प्रेमाचा केवडा सुचलाच नाही.

त्या सुगंधात किमान तुला
माझं पहिलं गुलाब आठउ दे.
शेवटचं दर्शन माझ्या चितेला तुझम
तुला धुरात साठउ दे.

काय कमाल आहे नं,
आजही तुझी प्रेयसी मागे उभी आहे.
तुला माझ्या चितेजवळ रडताना बघुन
जरा तिलाही हेवा वाटु दे.

D shivaनी
nagpoor

No comments: