Wednesday, July 30, 2008

बाबा म्हणाले पुन्हा नवा रस्ता बांधणार......

आपल्या कडे रस्ता आणि खड्डे हे एक बॅलेन्स्ड एक्वेशन बनलेलं आहे,आणि त्याच बरोबर प्रत्येकाचे अनुभव पण.
असच नविन रस्त्याचे बांधकाम बघ्य्न,नवा रस्ता बांधणे,ह्यावर एका १०-१२ वर्शाच्या मुलाची व्यथा मांडली आहे.


देश प्रगती करतोय म्हणतात सगळे,
आता नव्या रुपा साठी देश कात टाकणार.
वर्षानु वर्षे खड्डे बघितलेल्या रस्त्याला
बाबा म्हणाले पुन्हा नवा रस्ता बांधणार......

काय! रस्ता बांधणार?

म्हणजे आता पाउस आला की,
रस्त्यावर पाणी नाही?

शाळेत काय फ़क्तं हस्तकलेचा तास टोलवाय्चा?
खरी खुरी नाव कुठल्या पाण्यात सोडायची/?
जास्तं पाऊस आला तरी शाळेला सुट्टी नाही मारायची?

खड्ड्यात ल्या पाण्याला मित्रांवर पाणी कसे ऊडवायचे?
भर्रकन सायकल नेउन काठाहुन जाणार्या काकांच्या
आंगावर चिखलाचे शिंतोडे कसे ऊडवायचे?

पाय घसरला सांगुन मुद्दाम कुठल्या पाण्यात पडायचं आता?
काहीच राडा नाही फ़क्ता रुटिन जाता येता?

बापरे किती बोअर होइल लाईफ़?
पाउस फ़क्तं खिडकीतुन बघावा लागेल,
फ़ुलप्रुफ़ ड्रेनेज सिस्टिम मधुन पावसाचं
पाणी डोळ्यातुन ओसरु द्यावं लागेल.

हीच डिमांड आहे म्हणे जनतेची
म्हणुन सरकार नवा मार्गं स्विकारणार,
प्रगतीच्या नावे चेहराच बदलवणार.

डोक्यात जातेय ही गोष्टं,
पण हे असच होणार.
वर्षानु वर्षे खड्डे बघितलेल्या रस्त्याला
बाबा म्हणाले पुन्हा नवा रस्ता बांधणार......

D shivaनी
nagpoor

Friday, July 25, 2008

मी अशी म्हणुन..............

तु एक मस्तमौला मेघ आणि मी एक शपित सर..........
ह्या पारा वरुन त्या पारावर हुंदडणं नेमकं ठाउक आहे तुला.

माझ्यात प्रेम रस भरला,आणि स्वतःपासुन वेगळं केलं.
पुन्हा तु एका नव्या उंबरठ्यावर आणि मी?
मी मात्रं तुझ्यात माझं अस्तित्वं विसरुन कधीचीच संपलेली.

दर वेळी पाउस येतो,आणि तु तिथेच असतो.
मी पण तिथेच असते,
फ़क्तं तुझा पार बदललेला........



........... किती रुपेरी,ओली क्शण मी माझ्या डोळ्यांना पजलीत.
कधी कधी अनावर हा प्याला,म्हणुन ती ओसंडुन वाहुनही गेली.

पण तु मात्रं माझ्या डोळ्यात बुभुळा प्रमाणे आहेस,
की तु आहे म्हणुन रंग सारे,
नाही तर अंधारच सगळयांना उत्तर आहे.



........... मी तर संशयही केला नव्हता रे,
फ़क्तं प्रेम नावाचा एक कशिदा विणला होता.

जाळ्यात अडकला तु मोहाच्या कदचीत.
मी तर फ़क्तं संसार खुणवला होता...........



............ जे नको होतं तेच झालं.
भघ ज्याची भीती होती तेच घडलं.

म्हणतात की,
दोघांमध्ये एक जण अमाप प्रेम करतो.
आणि आपल्यात ती मी नसावी असं स्वप्नं होतं.
पण...........
तु आणि मी कधी आपण झालोच नाही.
आणि अमाप प्रेम मी एकटिनेच केलं,
जे अतुल्यं रहीलं.



............ आयुष्यं कुरतडलय,मी असच म्हणणार नाही.

पण कधीही नं जाणारं व्रण दिलय सोबतीला,

जे काही केल्या मिटत नाही.

आणि काळाला सोसवत पण नाही.

............मला तुला दोष द्यावा असं वाटतच नाही.
काही केल्या तुझा प्रवह डबकं म्हणुन साचतच नाही.

का माझं प्रेम तुला उअमगलच नाही.
तुझ्याही ह्रुदयाला,झंकारुन प्रेमाचा प्रतिसाद स्फ़ुरलाच नाही.

मी मात्रं ह्या का?चं उत्तरही शोधत नसते,
तु जरी नाही तरी तुझ्यावर केलेलं प्रेम मनाला जगवत असते.



............अडवला पदर जरी माझा,

तो थामण्याची ग्वाही दिली नाही.

विश्वास घात झाला असही कसं म्हणणार?

प्रेम केलं होतं,तुला कधी अड घातली नाही...........



...............आठवणींना कधी वेळेची तमा नसते,आणि ती नसावीही.....
मग तुला विसर,असं नियती का खुणावते?

तु तुझे विचा,तुझं गाव सगळं बदललं,
आता मी ही माझा रस्ता बदलावा असं सगळे का म्हणतात?

मी तु्झ्यावर फ़क्तं प्रेम केलं,
प्रेम पुर्तीची अपेक्शाही होती खरी.....
पण त्याने काय फ़रक पडतोय,?
तुझा माझ्या जगण्याला दिलेला खो,
आणि तुझी इच्छापुर्ती एवढं कारण पुरेसं आहे.
आणि अखंडं राहील............
कारण
आठवणींना कधी वेळेची तमा नसते..........


.......... व्रुक्शं रुतु बघतात,
त्यांना काळ पलटवण्याचं कुतुहल असतं,
आणि व्रुक्शाला आपल्या भोवती कड्या वाढवण्याचं.

माझं तसं नाही आहे.

आयुष्यात पहीला श्रावण शेवटचा ठरला आजवर,
नवी पालवी फ़ुटली कौस्तवाची.
पानझड तु घेउन आलास.

आता माझं आयुष्यं इथेच थांबलं.
ना रुतु,ना सर,ना पानझड.
आणि मी तशीच निःशब्दं,
पहिल्याच श्रवणाच्या प्रतिक्शेत.



............. मी तुझ्यावर अमाप,असीम प्रेम केलं.
आणि जगाच्या प्रत्येक वस्तवाने तुला
माझ्यात नं मिळ्ण्याची साजिश केली.
मी सरळ आणि प्रत्येक रस्ता उलटा
येउ लागला.........................
कदाचीत मीच वाकडा रस्ता धरला.

आज म्हणुनच मी एकटी उभी आहे.
एक भयाण आकश आणि टोचणार्या
चांदण्या सोबतिला आहे.
असंख्य लोकं चहुबाजुला माझ्या.
त्यांची तिरपी नजर,
सगळ अंगावर झेलते आहे.
कदाचीत मीच वाकडा रस्ता धरला.


D shivaनी
nagpoor

Monday, July 21, 2008

दिल्ली कुणाचीच नाही होउ शकली,

दिल्ली कुणाचीच नाही होउ शकली,
ना फ़ॅन्सी ड्रेस करणार्यांची,
ना राजकारणाचा सट्टा
लावणार्या भडव्यांची.

बाजारात ह्या लोकशाहीचा
लिलाव केला.
विश्वास मत नावाने,
जगी गवगवा केला.

कुठे चुकले हो ह्यांचे?

आपणही प्रोत्साहन देत उभेच होतो की.
ह्याच बाजारात,
ह्याच बाजारात,
मुल्यांची अब्रु लुटतांना बघतच होतो की.

का द्यायचा दोष ह्या लाल गाडित फ़िरणार्यांना?
आपण साधं मत द्यायला पण पुढे सर्सावत नाही.
कित्येकांचे तर मतदार यादीत नाव ही नसेल.

आपण शंढ झालोत म्हणुन ह्या भडव्यांची चालली,
म्हणुनच आजही,
दिल्ली कुणाचीच नाही होउ शकली,.

D shivaनी
nagpoor
२१ जुलै २००८

Thursday, July 17, 2008

आज जरा दुकानात सीझन एंड चा सेल लागाला होता.

कमर्शियल चढाओढित सावळा का मागे राहील?
प्रोफ़ेश्नलिझम ची ओढ तो काय फ़क्तं पाहील?

आज साधा फ़ुकटात कुत्रा सुद्धा हुंगत नाही,
मग ह्या जगाच शहनशाहा क्रुपा फ़ुकटात दाखवील?

"there is no free lunch"चं जग सारं
मग देव काय प्रसाद फ़ुकटात वाटिल?

म्हणुन मी पण जरा तयरिनेच गेले होते,
सोबत दक्शिणा,फ़ळं शिवाय मी काय भक्ती नेईल?

देवाला पण जरा नेमकं ठाउक असणार,गिर्हाइकाची जात,
नाही तर तो काय सगळ्यानाच कन्सेशन देइल?

चार आठाणे टाकुन,साकडं घालतात जगदिश्वराला,
मग गाभारा मॉल चं रुप का नाही घेईल?

आज जरा दुकानात सीझन एंड चा सेल लागाला होता.
मागायला गेले फ़क्तं त्याची साथ,
तर डिस्काउंट माधे तोच उभा होता.

D shivaनी
nagpoor
१७ जुलै २००८

Wednesday, July 16, 2008

"तेच ते राजकारण"

रोज बसते मी पहिल्या बाकावर,
काल ती आधीच बसली होती.
भांडायला चढवला आवाज तर,
सगळी गर्दि तिच्या बाजुने नरमली होती.
माझ्या मागची टिम,का तिच्या बाजुने झुकली.
ह्याचे शोधु लगले कारण
मग आले लक्शात की
"तेच ते राजकारण".

भाजी बाजर आसॊ की,
गल्लितले भांडण.
शेजारचे असो की,
दाउद कींवा राजन.
रोजचेच गडी, आपापले रंग बदलतात.
कधी अफ़जल ठरतो देशभक्तं
कधी भगत व्हिलन.
परत मग मी
ह्याच शोधु लागले कारण
मग आले लक्शात की
"तेच ते राजकारण"

D shivaनी
nagpoor
१५ जुलै २००८

Tuesday, July 15, 2008

तुला माझ्यात सामावुन घेण्यासाठी.

तु म्हण्तो की माझ्या समोर रडत नाहीस.
आसवांशी flirt करतो.
पाठ फ़िरताच माझी,
तु आसवांशी गुज साधतो?"

मी चांदणी होते तुझ्या निरभ्रं आकाशाची,
तुटतेही तुझी इच्छा पुर्णं करण्यासठी.
ओघळते एक अश्रु बनुन.
मिटुन जाते तुझं मन हल्कं करयला.

तेव्हा तु ही माझ्या डोळ्यात नकळत तरळतो.
माझ्याही डॊळ्यात पाणी तरंगतं.
माझ्याही मनात घालमेल होते,
श्वास दाटुन येतात.
पाणी ओघळणार,तेवढ्यात मी डोळे मिटुन घेते,
तुला माझ्यात सामावुन घेण्यासाठी.


D shivaनी
nagpoor

Monday, July 14, 2008

साकारले स्वप्नं माझे,

सखे तु आज अवतरली.

बहाणे बनवुन अनेक,

तु भावनांना माझ्या जगली.


आजच अनुभवुया आपण नाद प्रेमाचे.

चांदण्यात फ़िरुन येउ गाउ साज प्रेमाचे.

होइल रात्र्म उद्याहि सखे,

पण आजच न्हाउ भाव प्रेमाचे


ह्या सौम्यं समीरासंगे,

चांदण्यांचे गुज ऐकुया.

तु द्यावा हाथात हाथ तुझा.

एक नवा बंधं जोडुया


मधाळ ह्या निशेस सखे,

प्रितिची रंग चढुदे.

होइल पहाट काळाने,

समई जरा मालउ दे.


रुतु निरोप घेउन सरले,

म्रुगाने हजेरी लावली.

आभाळ नभी गजबजले,

चांदणे तुझ्यासाठी सांडली.


एकेक चांदणी माझ्या

तुझ्या प्रेमाचे गाणे गाते.

स्वप्नाच्या दुनियेत राणी

तुझ्यासम मन चिंब चिंब न्हाते.


श्वासांनी ठेवली लाज माझ्या

तुझ्या सोबत जगण्याची.

मी धन्य झालो तुझ्यात हरउन

किमया ही प्रेमाची.


D shivaनी
nagpoor
14th july 2008
बहर मागितला होता तुला

तु पान झडिचं रान दिलं.

गुलाबाचं फ़ुल मागितलं

तु कॅकटसचं पान दिलं


नसेल मी ह्या जगतात जेव्हा,
तुझ्या डोळ्यां मध्ये दोन अश्रु येतील.
किमान माझ्या दुसर्यांदा मरण्याने
तुझ्यात आठवणींचे पुर येतील.

आठ्वतय,तुझ्या आठवणीत
म्रुग,वसंत आणि शिशिर पालटलीत.
पाऊस तुझीच कहाणी ऐकवुन गेला
बघ,सांभाळ कदाचीत आता तुला माझे वेड लागेल.

गंधं आसेलही मोगर्याचा तो,
पण तुला आपला वाटला नाही.
त्याच मोगर्याचा सेज चढ्वला चितेवर माझ्या
पण तुला तरीही माझ्या प्रेमाचा केवडा सुचलाच नाही.

त्या सुगंधात किमान तुला
माझं पहिलं गुलाब आठउ दे.
शेवटचं दर्शन माझ्या चितेला तुझम
तुला धुरात साठउ दे.

काय कमाल आहे नं,
आजही तुझी प्रेयसी मागे उभी आहे.
तुला माझ्या चितेजवळ रडताना बघुन
जरा तिलाही हेवा वाटु दे.

D shivaनी
nagpoor
झरे काका

कवितेने वेड लावलं
जागे पणी स्वप्नं मागता?
स्वप्नातच कोवळी पालवी
म्हणुन शब्दाचं अंकुर मागता?

गवसेल ती,
रुजेल ती,
स्वप्नातल्या काळजातुन,
झंकारुन फ़ुटेल ती.

रिझवेल ती,
भुलवेल ती,
अक्शरांच्या पुंगळी मधुन
बासरी नाद गुंजवेल ती.

D shivaनी
nagpoor
तुझं नाव पुसुन टाकलं

मी ह्या ह्रुदयाच्या ताम्रपटा वरुन.

पण असच अवेळी

डोळ्यात एक अश्रु बनुन तु ये

D shivaनी

nagpoor

Saturday, July 5, 2008

देव च्या कवितेला दिलेला रिप्लाय.................

गांधी देवापेक्षा मोठा होता का?
गोळी चालली,
"हे राम" आवाज आला,
आणि गांधी खाली पडला.
किती वेळात मेला माहित नाही.
" श्री राम" तेच ना,
ज्यांनी रावणाचा वध केला होता?
अरे मग गांधी नुसार,
" श्री राम" तर हिंसावादि" होते,
मग त्यांचे नाव गांधीच्या तोंडात कसे?
भगत, बोस, आज़ाद, सावरकर यांच्या विषयी,
लोकांच्या मनात द्वेष निर्माण..
करणार्‍या गांधीच्या तोंडात.
" हे राम" हा शब्द शोभला नाही ना....

बरं झाले त्या काळात गांधी नव्हता,,
नाहीतर रामाने उपवास...,
केला असता सीतामाई ला मिळविण्यासाठी....

जेव्हा देव स्वतः लढले पापाविरुद्ध
तेव्हा हिन्दुस्तानच्या भोळ्या जनतेला...
भरकटवण्याचा गांधीला कय अधिकार होता?

गांधी देवापेक्षा मोठा होता का?

निशब्द(देव)



सगळ्यात पहीले कोणालाही एकेरी संबोधणे चुकीचे आहे.त्यामुळे देव त्याबददल माझा निशेध.

मात्रं,

गांधीजींना पण देश स्वातंत्र व्हवा असं मना पासुन वाटत होतं,त्यासाठी चळवळ उभी करण्याची महत्वाकंक्शा मनात दडुन होती.पण स्वतःकडे बघता आणि स्वतःचा स्वभाव बघता त्यांना हे नेमकं ठाउक होतं की ते जहाल विरोध नाही करु शकत आणि म्हणूनच त्यांनी सत्याग्रह नावाचा जालीम उपाय शोधला.त्यांची मोहिम त्या संपुर्ण आवाम ला आव्हान होती जी जहाल प्रकारे विरोध दर्शउ नव्हती शकत.ज्यांच्यात जहाल विरोधाला सामोरे जाण्याचं धाडस नव्हतं ते सर्वं गांधीजींच्या मागे उभे झाले आणि त्यानी आपल्या परीनी लाढाई लढली.
त्या काळात डोक्यावर कफ़न बांधुन स्वातंत्र्यासाठी लढ्णार्याची संख्या सत्याग्रहींच्या comparision मधे कमी दिसली आणि म्हणुन हा मार्गं ऎवढा समोर आला.
ह्या पद्ध्तती अवलंबिल्या मुळे भन्नाट प्रोबलेम्स झाले.आणि त्याची शिक्शा त्यांना नथुराम च्या रुपात मिळाली सुद्धा...........
वयक्तिक मला त्यांचा विचार आणि व्यक्तिरेखा खुप काही पटत नाही.
जहाल रुपात,"ना तारिख ना मुकदमा,सीधा इन्साफ़ on the spot"असं वागण्याची हिम्मत आणि परिस्थिती सगळ्यांमधे नसल्याने अमाप लोकांन्नई त्यांना राष्ट्रपिता बनवलं.

राहीली गोष्टं त्यांच्या विरोधात बोलण्याची अथवा नाही तर आम्ही तो संपुर्ण अधिकार ठेवतो,
२ वेळा अटक,४०-५० मोर्चे,रेडिओ वर २४ मुलाखाती,वर्तमान पत्रात १०० हुन अधिक लेख,किमात २० deputation ३० हुन अधिक सामाजिक कार्यक्रमातुन देशासठी काहीतरी करण्याच्या प्रयत्नात झटतो आहोत.........

त्यांनी त्यांच्या परिनि केलं,जे मला आणि देव ला नाही पटलं.म्हणूण शब्दांची बांधणी करावी लगली.............

Thursday, July 3, 2008

बंद चा आवाज देश भर उठतो.

कोणी म्हणे नौटंकी.
कोणी म्हणे देशप्रेम,
कोणता मुद्दा?कश्याचं काय?
ह्याचा कुणालाच नाही नेम.
आगीचा भपका,मनात धगधगतो
बंद चा आवाज देश भर उठतो.

ह्याला हे तर आम्हाला पण ते मिळुच दे.
पैशानी देव विकणार्याला पण ते कळु दे.
श्क्ती प्रदर्शन करु,शंढांना ती दखउन देउ.
हक्क तो आमचा,आमच्याच जमिनीत उधार दे.
शेवटी एकाच धडाचे दोन हाथ,
मोठे होण्यासाठी झगडतो.
बंद चा आवाज देश भर उठतो.

कधी कधी तो मुद्दा सामांन्यांपर्यत पोहोचतच नाही.
वरच्या वर निर्णय होतात खाल पर्यंत ते गळतच नाही.
फ़क्तं झळ पोहोचते,दैनंदीन जिवनात,
सामान्यांचा हुंकार वरचा ऎकतच नाही.
तोड फ़ोड,जाळ लोट ह्यानी अगदी उब येतो,
जेव्हा
बंद चा आवाज देश भर उठतो.


D shivaनी
nagpoor
3 july 2008