
आज परत एकदा,ग्राउंड वर जाउन
बेधुंद धावावसं वाटतय...........
निःश्चिंत मनाने
मित्रांसोबत आकाशात उंच उडावसं वाटतय...
लहानपणी मोठं होण्याचं आकर्शण होतं.
खेळणं सोडुन मोठ्यांसारखं गाणी ऐकायची.
आज मात्रं परत एक्दा टाळ्यांच्या गजरात
लगोरी खेळवसं वाटतय...
नको त्या जवाबदार्या,नको ते टेन्शन्स.
नको ते मोठेपण ,नको ती स्पर्धा, ती गजबज
शेजारच्या पिंपळच्या झाडाखाली
दोन क्षण एकटं रहवसं वाटतय
D shivaनी
nagpoor