Tuesday, October 28, 2008

राजे तुम्ही रक्त सांडले स्वराज्यासाठी

अजुन एक विनंती आणि एक छोटी चेतावनी,
की की जागे व्हा,सर्वं राजनितिचे दलालहो जागे व्हा,


राजे जरी नसले आम्च्यात,त्यांची जिद्दं
आमच्या रक्तात ते भिनली आहेत.
आणि सांडले रक्तं भुतकाळात,त्याची
आजही सल आमच्या मनात जागवली आहे.

ऎकु अजुन काही काळ,आम्हाला रस्त्यावर उतरऊ नका,
लाज ठेवा किमान तुमच्या माय बापाची,
ज्यांचे मीठ खाल्ले त्यांना बेईमान होऊ नका.

’हे स्वराज्यं होणे आहेच’
ही राजांची इच्छा पुर्णं करण्यास उठुन पेटलो.
पुन्हा नव्याने भगवा फ़डकवण्यास,मराठे आम्ही सिद्ध जाहलो.

जागतोय मराठी

तुमचाच कुल्हड जेव्हा माणुस गाडी खाली चिरडतो,
लायकी नाही कुणावर शिंतोडे उडवण्याची,
म्हणुन मराठी वरच डफ़रतॊ.

लोकल थांबवा म्हणतात,कारण महाराष्ट्रात ती बनत नाही.
नका नं चाटु पाय तिचे जिला ईटालीयन शिवाय काहीच उमगत नाही.

चारा खाउन अजुनही भरले नाही पोट,दडपत नाही का छाती?
तरी मुजोर मेले आमच्यात येउनच म्हणतात,आमचा देश आमची माती.......

गणपती ला म्हणे ह्यांनी हिमालय वासी बनवलं.
का विसरले हे जाहील,की मारठी लोकमान्यांनीच
ह्यांना मनामनात आणि नसानसात जगवलं.

गाड्या आणि बसेस चा स्टाफ़ बदला म्हणतात राज्याच्या हद्दिवर.
आजवर आम्हिच आमच्या ताटातल्ं तुमच्या सोबत वाटलं.

भांडकुदळ,अरेरावी तुमचाच मोटॊ,तुमचा स्वभाव,तुम्ही अहंकारानी सांगता.
आज आमच्या हक्का साठी,माती साठी लढलो तर जिहाद म्हणता.

Saturday, October 25, 2008

कधी न कळले मजला

कधी न कळले मजला,प्रेम कशाला म्हणतात?
कधी न कलले मजला,भवना कश्या जपतात?
भोवले मज सदैवं एकटेपण गर्दीत,
कधी न कळले मजला,मित्रं का परके वाटतात?

का मित्रांची मैत्री आज कमी वाटु लागली.
वाळवंटात पण,पाणी ही का कोरडे वाटु लागले?
उगा केला बोभाटा,त्यांनी सोबत असण्याचा.
कधी न कळले मजला,तारे का रात्रीच गळतात?

चालले मी तिमिर गतीने,काळोखाच्या दिशेने,
वाटेत तारे रवी,मी परतवण्याच्या प्रयत्नाने.
लख लखाट मज नकोसा आता,नको ती गजबज.
कधी न भोवला प्रकाश मजला,काळाचे केवळ पार बदलतात.

आज वाजली टाळी माझी एका हथाने,
नको आता मज दुसरा हा निनाद करण्यास.
प्राक्तन माझे व्हावे आता निश्चल शांतीत.
उगा करुन प्रपंच,का भगव्य मनाला कोंडतात???

D shivaनी
Nagpoor

Wednesday, October 22, 2008

धेय बांधणी

एक ध्येय निश्चित झालं,
की वाट आपोआप सापडते.
हजार कारणं न करण्याला देण्याऎवजी,
एकच कारण करण्यासाठी पुरेसं ठरते.

सुरुवात करायला फ़क्तं
एक स्टार्ट कारायचं असतं.
ध्येयावरच प्रेम करत,
वादळ प्यायचं असतं.

सुरुवात तर करायची आहे,
अपयश पचवण्याची
सवय करायची आहे.
एकदा का अपयश गवसल
की यशाच टेलीग्राम आपोआप येतो.
फ़क्त तो वाचण्याची पद्धत शिकायची आहे. ....

तेव्हा..

तुझीच वाट,जगताला ह्या
अर्जुन संयम कायम ठेव.
एका यशाची देणे मोठ्ठी कींमत,
राधेय दान मानी रुझव.

अडथळे येतील रोजच मित्रा,
मीरेसम भक्ती ह्रुदयी वसव.
प्राक्तन असेल तुझेच आसमंत,
नैवेद्द्यी एकलव्यी निष्ठा चढव.

D shivaनी
nagpoor

घुसमठ

नावांपुढे वलय चढलं की एक भलतीच दिशा मिळते.
पण...
आमचं काय?चायला कोणी कुत्रा सुद्धा विचारत नाही.
किमान मागे राहुन,मागे राहण्यात तरी मोठे होऊ म्हंटलं,
तर गुपचुप मागे ही राहु देत नाही.
आता काय,तर फ़क्तं वाहवा करत मागे राहायचं.
आवाज उठवला तर एकटं चिरडुन टाकण्याची भीती असते नं.
वलय असतं ना,त्यांच्या पुढे,सोबत गर्दी पण.
म्हणुन आजकाल असं गर्दीत मिसळुन राहण्याची सवय झाली आहे.
खुप तिर जरी नसले तरी,किमान आपले काम सातत्त्याने करण्याची सवय झाली आहे.

D shivaनी
nagpoor

Friday, October 10, 2008

भटकंती

क्यु हर राह छुटती चली गयी,
जो तेरी ओर जाती ही नही .
क्यु हर निगाह चुभती है,
जॊ तेरी होती ही नही.
संभाला तो ले ही लिया साजन,
तेरे गम के हौसले से,
क्यु हर नफ़्ज सुलगती है,
जो तेरे नाम नही होती.

नगमे तो बहोत जीये,
कुछ तुझे भुलाने मे,
कुच्छ तुझे भुलकर बरबाद कीये,
जींदगी हर मोड ,एक नया इम्तीहा
लेती है.
कुछ पल तेरी याद मे खोकर,
कुछ तेरे तरानो से आबाद कीये.

अजीबसे मतलब निकलते है,
रिश्तो से यहा,
तेरे इन्कार से भी रिश्ते की एक
डोर बांधली.
कभी तेरे गम के शुहाओ मे
इस कदर खो जाती हू,
बस उन्ही चार पलो मे मैने
अपनी जिंदगी समेट ली.

नही जीना अब तेरी राह तकते मुझकॊ साजन,
खुदको कबसे तुझमे मिटा चुकी हु.
फ़ना किया है अरमानो को तेरी मोहब्बत मे,
खुदको तुझ्पे कबसे लुटा चुकी हु.

अपनो ने ही जखम कुछ इस कदर दिये,
हम अप्अने आप से बेगाने हुए.
इसीलीये गैर बन गये खुद उनके लिये,
अश्कोंको हसी मी दफ़नाये,हम सौ मौत जिये.

उसको भी खुश्स्नसीबी समझेंगे हम अपनी,
आखीर मे क्यो ना हो,पूछा तो सही.
हमसे कुछ इस कदर जुदा हुए है,
के उन्हे हमारे जीने की भी कोइ जुस्तजु नही.

D shivaनी
nagpoor

Monday, October 6, 2008

नागपुर

नागपुर,
दिलखुलास जगणार्यांचं,
मनापासुन खाणार्यांचं शहर.

सकाळ्च्या पोहे तर्रीला,
केशव च्या आलु बोंड्यांना.
टप्री वरच्या सिगारेट ला
नागपुर शिवाय तोड नाही.

घुगरेंच्या वडापाव ला,
तेलंगखेडी च्या समोस्याला,
यशवंत स्टेदिअम च्याशिकंजी ला
नागपुर शिवाय तोड नाही.

बजाज नगर च्या पानीपुरीला,
धंतोलीत्ल्या पावभाजी ला,
राम भंडारच्या लस्सीला
नागपुर शिवाय तॊड नाही.

हल्दिराम च्या मोतीचूरच्या लाडुला,
हीराच्या काजुकत्लीला,
घाटे च्या मसाला दुधाला,
नागपुर शिवाय तोड नाही.

अस्स्ल सावजी जेवणाला,
धाब्यावरच्या अंडाकरीला,
नाक्याजवळच्या चिकनला,
नागपुर शिवाय तोड नाही.

नागपुरात अस्सल चटखोरे राहतात.
जगण्यासाठी खाण्याऎवजी,
खाण्यासठी जगतात.
दिलखुलास व्यक्तिमत्वं,
बिन्दास्त शैली,
जिभेचे लाड,जगवेगळी मैत्री,
रत्रीच्या पार्ट्या,
ट्प्री वरचा चाहा,सोबत globalisation च्या
स्पर्धेतलं आपलं स्थान,
ह्या सगळ्याच्या समीकरणाला
नागपुर शिवाय तोड नाही

D shivaनी
Nagpoor नागपुर,