Friday, March 20, 2009

देवा मला पाव

आज तुझ्या दारी आले 
सावर माझे जीवन.
तुझी भक्ती हीच शक्ती,
ह्यानेच जगणे पावन.!!धु!!

मी न मागते केवळ सु्ख
आज तुझ्याकडे.
भले सागराच्या लाटा 
लोट माझ्याकडे.
पण त्यांना परतवण्यासाठी
कणखर कर माझे मन!!१!!

नको नेहमी सम्रुद्धी अन
प्रसन्नता परडीत.
आज वेचली मी फ़ुले
काटे ही मिळालीत.
पण ह्या का्ट्यांचा घाव,
करव फ़ुलान्ना अर्पण!!२!!

Dshivaनी
Nagpoor

No comments: