Monday, March 30, 2009

Coffee n U..[:)]...part 5

coffee प्यायला चलशील?
तु मला घाबरत विचारलं होतं.
आठवतं मला अगदी तेव्हडच ताजं,
मी हो पण भाव खाऊन म्हंटलं होतं.

पुन्हा ते नेहमीचं सीसीडी...
जीथे मी नेहमी बसते तिथेच बसली.
पण तु मात्रं समोर च्या ऎवजी
बाजुला येऊन बसला.
मला कळत होतं सगळं,पण मुद्दाम तसा
काहीही न कळण्याचा आव आणला.

आयरीश coffee आणि तुझी 
cafe mocha..
तु होता ्चलबीचल,आणि शोधत होता मौका.
त्या coffee च्या बदामा कडे नजर फ़िरऊन 
तु माझा हाथ तुझ्या हाथात घेतला.
हेच तर हवं होतं पण
मी म्हंटलं हे कशाला.

तु म्हणाला,मला काही सांगायचं आहे,
मी म्हंटलं कधी,लवकर बोल.
उगाच डोक्यात जाऊ नकोस.
मगा पासुन fashion,te politics
सगळं बोलुन झालं होतं...
आणि माझ्या डोक्याचं दही झालं होतं.

म्हणालास आजकाल,अयरीश coffee 
आवडायला ला्गली आहे.
तुझी नजर माझी तगमग आता,अनावर व्हायला
लागली आहे...
...
...
...मी तुझा हाथ स्वतःहुन हाथात घेतला,
आणि विचारलं,
तुला हो म्हंटलं तर?

D shivaनी
Nagpoor

Thursday, March 26, 2009

Coffee n U..[:)]...part 4

उठा उ्ठा हो सकळीक,
वाचे स्मरावा गजमुख....

सकाळची काकड आरती,
वेदांच्या रुचा,
मंत्रांचे नाद..
नंदादीपाच्या तेजस्वी
ज्योती चं भरभरुन आयुष्यं देणं....
आणि आपण नुकतच
आंघोळ करुन,श्रीनीवासाला स्मरुन
निवांत बसलं नं,
की दिवस आल्हाद दायी जाणार
श्रीनीधीच्या सा्क्षीने ह्याची
हमी आपोआप मिळते.....

मग

पेपर ची वाट बघुन,तो 
आल्याच्या आनंदात
coffee चा घेतलेला घोट सुद्धा
अम्रुता पेक्षा कमी वाटत नाही....
वाह...........

D shivaनी
Nagpoor

Coffee n U..[:)] ...part 3

बापरे!!!बघता बघता १ वाजला,
डॊळे थकले माझे.
म्हणताहेत मला,्खुप झालं 
आता झोपा राजे.
पण "आज तो कत्तल की रात है",
किताबो की ही अंगढाई,
पढाई से ही बात है.
लाल झाले डोळे,
अजुन गडद होतेय रात्रं.
डोकं ही जड वाट्तय.
परिक्षेचं टेन्शन आहे मात्रं.
डोकं हव शांत for exams sake
lets have a coffee,
take a break..................


exam time.................................पटतय का?

Dshivaनी
Nagpoor

Coffee n U..[:)]....part 2

you are like coffee beans,
hard,bitter, aromatic but cooler.
when beans get boiled,
it changes the aroma,
and gives new taste of life.
just like that,you came in to 
my life,n changed the total scene.
you are like coffee beans.

you are hard,but perfumed through out
with the aroma of life,softness and love.
you are hot too.
you are bitter to show.but 
inside you are full of energy.
just like that,you came in to 
my life,n changed the total scene.
you are like coffee beans.

Dshivaनी
Nagpoor

Coffee n U..[:)]

coffee..............

coffee तु आणि मी
एक अतुट समीकरण.
माझ्या असण्याला
तु एकच कारण..........

तुझ्या सोबत मी पहिल्यांदा
कोफ़ीशोप लाच भेटले होते.
तु आणी तुझा सहवास
सगळं डॊळयासमोर तरळ्लं
तुझ्या सोबत घलवलेले
अमाप क्षण,जणु सात
जन्माचं नातं जुळलं..

coffee आणि तु.........
वाह........

Dshivaनी
Nagpoor

Friday, March 20, 2009

देवा मला पाव

आज तुझ्या दारी आले 
सावर माझे जीवन.
तुझी भक्ती हीच शक्ती,
ह्यानेच जगणे पावन.!!धु!!

मी न मागते केवळ सु्ख
आज तुझ्याकडे.
भले सागराच्या लाटा 
लोट माझ्याकडे.
पण त्यांना परतवण्यासाठी
कणखर कर माझे मन!!१!!

नको नेहमी सम्रुद्धी अन
प्रसन्नता परडीत.
आज वेचली मी फ़ुले
काटे ही मिळालीत.
पण ह्या का्ट्यांचा घाव,
करव फ़ुलान्ना अर्पण!!२!!

Dshivaनी
Nagpoor

Wednesday, March 18, 2009

तुझ्यासाठी

काळ्याकु्ट्टं अंधारात,
पावलं जेव्हा थरथरतात.
वादळाच्या थैमानात,
जमीनीला पाया खलुन नेतात.
तेव्हा तुझी साथ असु दे.

छान निरागस कातरवेळी,
वारा जेव्हा गुणगुणतो.
मोहक मातिच्या वासानंतर,
मल्हार साज छेडतो.
तेव्हा तुझी साथ आसु दे.

भर उन्हात उकडताना,
पिंपळाची सावली पार बदलते.
हिवाळ्यातली रात्र मग,
बोचरे वारे अमाप फ़ेकते.
तेव्हा तुझी साथ असु दे.

D shivaनी
Nagpoor

निवडणुका

ह्यांना कदाचीत आपल्याला,
कधी खुष बघा्यचच नसेल.
आपण खुष राहीलो तर त्यांचं
गणित मात्रं पक्क फ़सेल.

आपल्याच गरजांना हे
चुनावी मुद्दा बनवतात.
आपल्याच दुःखांचा सहारा,
स्वतःच्या सत्ते साठी करतात.

दरवे्ळी,आपण ्मात्रं
ह्यांच्या बनवेगीरीला भुलतो.
त्यात ह्यांची सीट पककी करुन
आपण स्वतःचच हसं करतो.

कीत्येक जण तर मतदान 
ह्याच रोषाने करत नसतील.
पण ह्यानेच नालायक नेते
निवडुन येत असतील.

बघता बघता १४ वी 
लोकशाही बनणार आहे.
काय ह्या वेळी पण लोकसभेत
हेच चित्रं रंगणार आहे?

जागे व्हा दोस्तं हो,
आपण आपला अधिकार वपरुया.
वासरात का होईना
लंगडी गाय शोधुन निवडुया.

कित्येक चांगले नेते ह्याच 
चढाओ्ढीत मागे राहीले.
जमलाच तर त्याच चांगल्या यादीत
आपलंही नाव जोडुया.

D shivaनी
Nagpoor

Thursday, March 12, 2009

तुझी आठवण 2

व्याकुळ झाल्या भवना अजेव्हा,
तुझी आठवण पाण्यात होती.

मरण वाटले बेहत्तर जेव्हा,
तुझी आठवण जगण्यात होती.

निरव झाले जीवन तुला,तेव्हा
तुझी आठवण झुरण्यात होती.

पलीकडे अश्रुंच्या बरसातीत,
तुझी आठवण हसण्यात होती.

D shivaनी
Nagpoor

Wednesday, March 11, 2009

तुझी आठवण

श्वासांच्या ह्या चढाओढित,
तुझी आठवण नसात होती.

आठवणींचे मेघ दाटले,मग
तुझी आठवण सरीत होती.

विरहाने मंतरले्ल्या काळ्या रात्रीत,
तुझी आठवण तारकात होती.

धमन्यांनी नाकारल्यावर,
तुझी आठवण रक्तात होती.

D shivaनी
Nagpoor

जानु के

जानु के मुश्कील है सब,
पर नामुमकीन ना मानु कभी,

हर पथ पर है कठीनाइ झगमग,
पर हार ना लेकीन मानु कभी.


पथिक बनी मै धुंड रही हू,
नेक मन्झिल के राह अनेक;

हर राह बनाए साकी मुझको,
चुन ना पाउ उनमे एक.

ठुकराउ यदी कींतु राह,
मेरे लीये क्या बच पाएगा शेष कभी?

यदी पग ना ऊठाउ सही राह,
तो मै क्या,होन्गे फ़ीर वीशेष सभी.

D shivaनी
Nagpoor

Monday, March 9, 2009

श्ब्दांना,कवितेत विकते

एकाच उत्तराला त्या,
नवे प्रश्नं छळतात.
कोरड्या आभाळातुन,
ओले भाव गळतात.

निशब्दं होते नेहमी,
अश्रु गोड वाटतात.
आम्ही दूर असण्याला,
लोक फ़ोड म्हणतात.

थट्टा बनुन गेला हा,
विषय माझ्या प्रेमाचा.
काहुर माचते जेव्हा,
विरह,issue मस्करीचा.

आता

प्रेमाची तुलना होते,
हारीची निलामी ठरते.
एकतर्फ़ी प्रेमाचे नाणे,
श्ब्दांना,कवितेत विकते.


D shivaनी
Nagpoor