Saturday, June 21, 2008

प्रेयसी मागे एक सावली खुणवत असेल?


एखादं ध्येय निश्चित केल्यावर ,
जेव्हा मार्ग शोधत फ़िरते.
तेव्हा तुझ्या हाथाची आणि
साथीला नजर भिरभिरते.

मी ठरवलय तुझ्या विनाच
आता हा मार्गं गाठायचा.
प्रवास हा एकट्यानेच
सोसायचा.

कधी कधी मी ध्येय
सुद्धा गाठते.
पण
पण
प्रत्येक यशात मी एकटी
पुर्णत्वाला समजावते.

तुला कधीतरी माझी
आठवण येत असेल?
तुझ्या अफ़ाट यशात,
प्रेयसी मागे एक सावली खुणवत असेल?

D shivaनी
nagpoor

20 june 2008

Monday, June 16, 2008

एका बादलीत तोंड बुडउन,


एका बादलीत तोंड बुडउन,
नाकातुन हवा पण सोडता येत नाही आहे.

गुदमरुन जाईल रे मन ते,पण मनाच्या
पेटीचे कवच तोडुन एकही तार जोडता येत नाही आहे.

अर्ध्यावर आला रे खेळ हा,आता नव्याने सुरवात
करायला खेळ मोड्ता येत नाही आहे.

आयुष्याचीच सुत्रे जोडलीत नं,आता सगळं
संपलं म्हणुन एकतर्फ़ी नातं तोडता येत नाही आहे.

पिसाळलेल्या कुत्र्या सारखे लचके तोड्ले तिने पण,
नियतीला कुत्र्यासारखं झोडता येत नाहई आहे.

अस्व्स्थं व्यथा माझी,अल्याड मी आणि पल्याड
जीवन,मधली नाईलाजाची भिंतं फ़ोडता येत नाही आहे.

D shivaनी
nagpoor
15 june 2008

Sunday, June 15, 2008

आजही

आजही ह्रुदय तुझ्या साठी स्पंदते,
आजही मी तशीच हासते.
जी तेव्हा होती,ती आता नाही,
आजही मी हे स्व्प्नं विणते.

आजही मला लोक चांगलं म्हणतात,
आजही मला लोक प्रसिद्धं म्हणतात.
तुच आहे कारण माझ्या असण्याला,
आजही लोक बावरी राधा म्हणतात.

आजही गुज सांगतात तारे.
आजही तुझाच शहारा आणातात वारे.
रोखु नाही शकत श्वासांना,
आजही यंत्र तुझ्यावरच जगणारे.

आजही ओढा वाहतो प्रेमाचा,
आजही संगम होतो श्वसांचा.
माझ्या जागी आज तुझी प्रेयसी आहे.
आजही होई दिवस आसवांचा.

D shivaनी
nagpoor
14 june 2008

Saturday, June 14, 2008

तुमच्याच कवितेवर ताव मारते.


आज काल माझ्या शब्दांना लयच गवसत नाही.
भावना over flow होतात पण,वाटच मिळत नाही.

हथात लेखणी घेतल्यावर,पानं कोरी राहुन जातात.
मी आत कासावीस होते,त्या वेगाला शब्दं अड्वतात.

सगळ्यांचा कविता वाचुन घेते,समर्पक प्रतिक्रिया ही देते.
माझ्या शब्दांच्या बांधणीला मात्रं,अधुरी एक कविता राहते.

सगळ्यांच्या शब्दांना वाहवा,शब्बासकी कधी मुजरा,कधी सलाम मिळतो.
माझ्या शब्दांकडे सहसा कुणी वळतच नाही,
वळालच तर कधी छान आणि बरेचदा अपुरी कवितेचा शेरा मिळतो.

कदचीत मनानी भीती बाळगली,चककं धास्तीच बसली,
"चालत रहा" ऎकुन सुद्धा माझी लेखणी थरथरली.

आज सगळ्यांचा पावसात मन ओलं चिंबं झालय,
आणि शब्दांना पण एक अंकुर फ़ुटलय.
आता ठरवलय की शब्दांना पुर्णं न्याय द्यायचा.
आणि एकदा तरी शब्दांवर उत्तम प्रतिसाद घ्यायचाय.

बोचर्या वार्यात,आणि शहारणार्या पावसात
शब्दांना जरा गरम गरम फ़ोडणी घालते.
नाहीच जमलं तरीपण मग तुमच्याच कवितेवर ताव मारते.

D shivaनी
nagpoor

Wednesday, June 11, 2008

IT COULD BE MORE BEAUTIFUL

तुला माझाशी जोडणारं नात एकच होतं,
तुला माझाशी जोडणारं नातं एकच होतं,
प्रेम आणि भावना ह्यांना तुझ्या मते
असणारं स्थान फ़ेकच होतं.

तुझ्या नसण्याने बेरंग झालेल्या
जिवनात,बेरंग नावाचा रंग बनवला.
आता फ़क्तं तुझ्याच आठवणीच्या
भिंतींनी आणि बेरंगी छपरानी महाल सजवला.

पाऊस आला,गालावरुन पाण्यासोबत
अश्रु ओघळले,मी चिंब भिजले.
कात टाकल्या प्रमाणे एक वेगळाच उत्साह
जाणउ लागला,जग सुंदर दिसत होतं
पण
IT COULD BE MORE BEAUTIFUL
जर तु असता तर.........................

D shivaनी
nagpoor

Sunday, June 8, 2008

डोस्कं वेडं पीसं झाले,

डोस्कं वेडं पीसं झाले,
पन सापडेना वाटं.
शोधाया गेले रस्ता,
मिळे खद्द्ड पायवाटं.

म्या हरवुन गेले,
ह्या गजबजीत आता.
मनं उतरुन गेले,
वाटे राहावे एकटं.

टोचे मले नजर,
त्या शहर वाल्यांची,
हरेक श्वसांमंधी
येई भयाचे सावटं.

थाटला संसार,
म्या कामं सोधू लागली.
पैसे मिळे आसानीने,पन
आस्था नं मीळे फ़ुकटं

सेवटी सापडला रस्ता ,
म्याबी शहरामंदी रमले.
वर्याच्या वेगालाबी लाज वाटे
एव्ह्डा प्रवास बिकटं.

D shivaनी
nagpoor

अस्सा पाउस .... तस्सा पाउस


प्रेमाची भाषा बोलणारा,
त्याची भावना ऎकणारा.
आणि म्हणुनच अवेळी
बरसणारा
एक वेड पाउस,उन्हाड पाउस
अस्सा पाउस .... तस्सा पाउस