Saturday, December 27, 2008

जगण्याचे गाणे नसते

जगण्याचे गाणे नसते,
असते केवळ बहाणे.
जो टाहो फ़ोडी नशिबाला,
त्याचे तर केवळ नाणे.
जगण्याचे गाणे नसते....

असतात केवळ गरजा,
त्या पुर्या करण्यास मग्न.
जो करतो कुणाच्या राखुन,
त्याचे तर व्यर्थ जगणे.
जगण्याचे गाणे नसते....

होते डोईजड जगणे,
श्वास ही उधार मागतो.
आकाशी बघतो आशेने,
दिशा गाठण्या थकतो.
क्वचीतच येतो हाथ कुणाचा.
तोवर जीव निसटून वेदना उरणे.
जगण्याचे गाणे नसते....

मनावर झालेल्या वेदना,
त्यांचे घाव ही असती कोवळे.
वाट कशाची बघु कळेना,
हे परतीचे जल्लोश सोहळे.
ताम्रपटावर जीवनाच्या मग,
भावनात हरवुन झुरणे.
जगण्याचे गाणे नसते....

कुठवर शोधत केवळ,
चालणे हा रस्ता एकटा.
बिकट ठरती वाट प्र्त्येक,
प्रवास्याला मारी फ़टका.
असं जगण्या पे्क्षा अवचीत
बेहतर ठरेन मरणे.
जगण्याचे गाणे नसते....

घेतला मी निरोप नुकताच,
परतीची तयारी करते.
थांबले कुठे अगदीच ,पुन्हा
ह्या शब्दात वेदना गवसते.
काय तारीफ़ ह्या शब्दांची,अमर असुन
ह्या कडुन मरणाचे बळ मिळणे.
जगण्याचे गाणे नसते....

D shivaनी
Nagpoor

Wednesday, December 24, 2008

नागपुरी कानफ़ट


सांज होताच आम्ही,निघालो फ़िरायला.
हाथाथ माझी बाईक,नटून गाव मिरवायला.

मी माझी बाईक,सोबत कयनेटीक.
आम्ही चार मैत्रिणी,स्पीड नव्हती झुईक.

चौकात पुढच्या,दोन मुलं आहे सोबतीला,
कधी मला,कधी टापे माझ्या सखीला.

आम्ही पण जरा नयन सुख घेत होतो,
पण त्याम्ची मजल कद्चीत जास्तच वाढवत होतो.

एकाने जवळ येऊन म्हटले,
"क्या प्रिती झींटा लगती है."
आणि घेतली कीक स्टार्ट.

आम्ही पण नागपुरी मुली.
केला सुसात पाठलाग.

पुढल्या चौकात सिग्नल वर जाऊन त्याला विचारले,
भैया.....
भैया.....
excuse me....
मै आपसे बात कर रही हु,
ब्लु शर्ट,आपसे.........

त्याने वळुन बघितलं,
आणि चौकातल्या सगळ्यांनी....

त्याला विचारलं,
"भैया हम मे से प्रिती झीटा कौन?"

वो आपने पिछले चौक मे बोला था ना,

वो क्या है ना,फ़िर हमारे मे झगडा हो जाता है,
क कौन प्रिति झींटा दिखता करके......

खरं सांगते,त्याचा चेहरा जाम पडला होता,
आणि चौकात ्प्रत्येकाच्या चेहर्यावर ह्शा पिकला होता.....

माझ्या मैत्रीणीने विचार्ले हे काय होतं?

मी म्हंटलं,नागपुरी कनपट.........

आता अयुष्यात कोणाला प्रिती झिंटा बनवणार नाही तो,
दिसलीच राखी सावंत तरी पाय धरेल तिचे तो.......

कमाल आहे,नागपुरी कानफ़टीची...........

D shivaनी
Nagpoor

Monday, December 22, 2008

स्वस्तं हास्य

आजवर मी हसण्याला सुद्धा वजनाच्या काट्यात तोलायची.
दुखःला हलकं करुन ,हसण्याला नेहमी स्वस्तं ठरवायची.

आज चायला काही तरी वेगळच झालय.
मीच स्वतःला आज वेगळच बघितलय.

गाडीत नेहमी प्रमाणे ड्रायव्हर सीट वर बसुन गाडी वेगाने पळवली.
तोच वेग,तिच दिशा पण अचानक स्पीड कुठेतरी कमी झाली.
त्याने हाथ गेयर स्टिक वर माझ्या हाथावर ठेवला.
आणि खरं सांगते,माझ्या आयुष्याचिच स्पीड consistent झाली.

आज मझ्या मनाला त्याचा सारखं कोणीतरि दिसलं होतं.
पापण्यांनी आता पापण्यांनीच पांघरल्ं होतं.
माझ्या थरथरणार्या श्वासांना कशाची तरी ओढ होती.
जग जिंकणारी मी त्या दिवशी मी स्वतःशीच हरली होती.

गाडी तीच,फ़क्तं जागा बदलल्या,
मी फ़्रंट सीट ला बसते खरी,ड्रायव्हर तेव्हडा बदलला.
माझ्या हाथात स्टेअरींग च्या जागी त्याचा हाथ असतो.
अनामिक नात्यात,मी माझा दादागीरी स्वभाव हरवला.

नेहमीचे वारे आज ब्रुटस बनलेत माझा साठी.
त्या़च्या साठि मी स्वतःला सीझर बनताना बघितलय.

वार्यानी धरला त्याचा धावा नेहमी,आज मी पण त्याच दिशेने निघालीय.
का असं होतय?
प्रश्नं पडला मला,
महाग वाटणारं हास्यं इत्क्या स्वस्तात कसं मिळतय?????

D shivaनी
Nagpoor

Friday, December 12, 2008

तुझीच आठवण येते......

संथ किती 
हा वेळ जाई,
तुझीच वाट
हुरहुर लावी.

येणार का
तु कातरवेळी,
तुझीच वाट
दिस मावळी.

मी आतुर
दर्शनाला,
तुझीच वाट
स्पर्ष रिझवी.

मधाळ से
हसणे तुझे,
तुझीच वाट
ओठ फ़ुलवी.

D shivaनी
Nagpoor

Monday, December 1, 2008

आज मन

आज मन मा्झं आक्रोश करत नाही.
पण ह्रुदय मात्रं हुमसुन रडतय.
सारं का्ही,रोज सारखच,पण
ह्रुदयातुन आ्ठवणीचं रक्तं गळतय.

चौघडे सनई वाजती त्या पलीकडे,
एकटेपण वणव्याचं रुप घेतय.
केळीचे खांब,आंब्याचं तोरण लावलय तेथे,
येथे क्षितीज दुखःत वाह्तय.

गाभर्यात त्याने दुर केलं मला,
मी त्याच क्षणी,स्व्तःला संपवलय.
आता फ़क्तं श्वासांना ओढतेय,
मरुन स्वतःत त्याला जगवलय.

पापण्या थकल्यात माझ्या,
अश्रुंचे पुर लोटता.
त्या तरळत्या पण्यातही,
मी तुला बघितलय.

कैकदा मी प्रयत्नं केला,
विसरुन जाईल म्हणते.
स्वतःलाच विसरुन मी,
आठवणींना स्मरतेय.

D shivaनी
Nagpoor