Thursday, June 14, 2007

दर वॆळी पाऊस येतो,........................................


दर वॆळी पाऊस येतो,माझ्या मनाची
व्यथा अस्वस्थं व्हायची.
तोंडा वर पावसाचे थेंब झेलत,मनातुन मी
ऒली चिंबं न्हायची.

वाटाय़चं फ़ारच ओळख झाली आहे,
तो आला नाही की मी त्याची वाट बघायची.
तो प्रेमाची अनुभुती देतो म्हणून
त्याची तहान सारखी लागायची.

म्हणतात की पाऊस आणि प्रेम
ह्यात नातं हे अलिखित असतं.
पाऊस आला की त्याची आठवण
येणार हे पण एक भाकित असतं.

पण पाऊस आला की मझ्या सोबत
असं होत नाही .
आंतरबाह्यं तो असं काही काहुर माचवतो
की अजुन कोणी मनात येत नाही.

मग पाऊस आणि प्रियकर काय साम्यं
हे कोडं ऊलगडत नाही.
पण पाऊस म्हणजे प्रेम हे मात्रं पटतं.
तसच डोक्याच्या खळखळण्यार्या
प्रवाहात पावसाचं तळं साचतं.

जेंव्हा त्याची परतण्याची वेळ यायची,
डोळ्य़ात काळॆ ढ्ग जमायचे,
कारण प्रत्येक पावसाळ्यात मी,
फ़क्तं पवसाच्या प्रेमात पडायचे.

शिवानी दाणी
नागपुर

Monday, June 11, 2007

सांगुन ठेवतो.................................


सांगुन ठेवतो हं खुन्नस नाही द्यायची.
मला ,नका सांगु काय
पुढे धोका काय?
भर उन्हात,पिंपळा वरचा
झोका काय?
मला सगळं ठाउक आहे,
आता फ़क्तं योग्यं वेळेची वाट बघायची
सांगुन ठेवतो .....................................

Tuesday, May 22, 2007

काय बाबा अठवतय?

काय बाबा अठवतय?
हाच तो पहिला बुट,
मला sale मधुन घेउन दिलेला.
मी दिवस भर हाच बुट घालुन
घर भर फ़िरली होती.
तुम्हा सगळ्यांची दुपार मग
बुट काढ म्हणण्यात
सरली होती.

आहो,तुमचीच मुलगी मी,
तुमचं म्हणणं ऐकणार होती?
जिद्दिचं बाळ्कडू तुम्हीच पाजलं मला,
ऐवढ्या लवकर मी मघार घेणार होती?
शक्यच नाही,
मग आई पण तुमच्या लाडा पयी
वैतागली होती.............................

त्या दिवशी रत्री पण,
मी तेच बुट घालुन झोपली,
मग हळूच येउन तुम्ही ते कढ्ले होते.
सकळी उठुन परत मी,
ह्याच बुटां सठि रडले होते,
मग मत्रं तुमची पण थोडी
सरकली होती..............................

ह्यच बुटांच्या मदतीने
मी पहिलं पाउल टाकलं,
आणि आजवर धावत आहे,
म्हणूनच ते आज पण जपुन
ठेवले अहे,आणि पुढलंही पाउल
ह्यांच्या कडे पाहुन टाकत आहे.
त्यात तुमचं,माझ्या साठी
असलेलं प्रेम,हिम्मत,भविश्यंभेट
आणि स्वप्नं जडली होती...........................................

D shivani
Nagpur

Monday, May 21, 2007

पाय धावत राहतात,........................



पाय धावत राहतात,
मन बागडत नाही.................

दोन दोन दिवस जतात,
आईला hi म्हणंण पण होत नाही
पण girlfnd,boyfnd कडून
सार्या जगाची माहीती घेतो.
उन्हात जतांना आईने ताकाचा
पेला दिला तर,पिववत नाही,
पण हेच उन्ह जीवावर येतं म्हणुन
BEAR आनंदाने पितो.
पण आसं का?ह्यचं ऊत्तर
आपण कधी स्वत:ला मागत नाही.......................

last time,देवळात कधी घॆलो होतो,
हे आठवायला last exam चा
time table सापडत नाही,
पण JUST TO FREAK OUT
म्हणुन CCD ला किति वेळा गेलो
हे तर आठवतच नाही.
म्हणून आजकाल,वरण भाताची
भुक लागत नही.....................

PROFESSINALISM
इतकं वाढलय,की मित्रं
दिवसेंदिवस भेटलेले नाही.
आजकालच्या conferences मुळॆ
कट्टॆ कित्त्येक दिवस
फ़ुललेले नाही.
पण आमचे डोळे,
अजुनही उघडत नाही........................

D shivani
nagpur

Saturday, May 19, 2007

Marlboro vs Charminar

किसिने मुझे चारमिनार सीगरेट के फ़ायदे बताये,Marlboro के खिलाफ़.उसिके प्रत्युत्तर मे ये कविता.


मुझे तो एक बहना चहिये
तुम्हे देखने का.
सीगरेट के एक कश के बाद
धुए मे तुम्हे धुंड्ने का.

मेरे साकी ने बतलया मुझको,
देसी मे ही बात है.
कैसे यकीन दिलाउ यार?
ये खोकले होने की तयारी नही,
मेरे दिल के जस्बात है.

अभी तो बहोत जीना है
तेरी य़ाद मे.
मरने वालो को
चारमिनार समर्पित करती हुं.
तेरि याद,तेरि सांसे,
यहा तक के तेरा अहसास भी
महसुस कराती Marlboro मुझको,
इसीलीये होठों से लगाती हुं.

D shivani
Nagpur

Friday, May 18, 2007

चल एक गाणं गाऊया!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

चल आपण एक गाणं बनऊया.
तुझे सुर आणि मझे ताल,एक गाणं गाऊया.

गिटार चा एक तार छॆडुदे
मनातला एक सुर छॆडूदे
भावनांना शब्दात गुंफ़ुन
गाण्यातला एक ताल छेडूदे.

प्रेमाच्या रंगात नाहुया
चल आपण एक गाणं बनऊया.

नवी उमेद,नवा साज,
मनाला आहे तुझाच नाद,
वाट आहे तुझीच,
हवा आहे तुझा प्रतीसाद.

चल या नव्या गीताच्या तालावर
प्रेमाचे झुले झुलुया,
चल आपण एक गाणं बनऊया.
तुझे सुर आणि मझे ताल,एक गाणं गाऊया.

D shivani
Nagpur

Saturday, May 12, 2007

Marlboro



आठवतय का दोस्ता,

तुझी नी मझी मैफ़ील

जेव्हा जमली होती,

धुराने भरलेली खोली

पण सप्तसुरांनी

रंग्ली होती...............................
कोलेजात सीगारेट चा

पहिला झुरका ओढ्ला होता,

खोकल्याने श्वास सुद्धा

चढ्ला होता.

नंतर पुर्णं दुपार मग

डॊळॆ पुसत सरली होती,

धुराने भरलेली खोली.....................................



पहिले फ़क्तं स्टाइल तेवढी

मारयला हातात ती जळत राहायची,

नंतर मग हिच्या नवाने

खिशातली चिल्लर गळ्त राहायची.

आठवतय,तुझी पहिली गर्लफ़्रेंण्ड

ह्याच स्टाइल ने पटली होती,

धुरने भरलेली खोली ................................



आ हा हा!!

सीगारेट, चहा आणि पुस्तक,

काय EQUATION होतं.

खरं काय माहीत?नाही,पण

प्रत्येक प्रोबलेम ला सीगारेट हेच एक SOLUTION होतं.

इथेच तर आयुष्याची वाट

फसली होती.

धुराने भरलेली खोली,

पण सप्तसुरांनी रंगली होती,

आठवतय तुझी नी माझी

मैफील जेंव्हा जमली होती............................
D shivani
Nagpur