Thursday, June 14, 2007

दर वॆळी पाऊस येतो,........................................


दर वॆळी पाऊस येतो,माझ्या मनाची
व्यथा अस्वस्थं व्हायची.
तोंडा वर पावसाचे थेंब झेलत,मनातुन मी
ऒली चिंबं न्हायची.

वाटाय़चं फ़ारच ओळख झाली आहे,
तो आला नाही की मी त्याची वाट बघायची.
तो प्रेमाची अनुभुती देतो म्हणून
त्याची तहान सारखी लागायची.

म्हणतात की पाऊस आणि प्रेम
ह्यात नातं हे अलिखित असतं.
पाऊस आला की त्याची आठवण
येणार हे पण एक भाकित असतं.

पण पाऊस आला की मझ्या सोबत
असं होत नाही .
आंतरबाह्यं तो असं काही काहुर माचवतो
की अजुन कोणी मनात येत नाही.

मग पाऊस आणि प्रियकर काय साम्यं
हे कोडं ऊलगडत नाही.
पण पाऊस म्हणजे प्रेम हे मात्रं पटतं.
तसच डोक्याच्या खळखळण्यार्या
प्रवाहात पावसाचं तळं साचतं.

जेंव्हा त्याची परतण्याची वेळ यायची,
डोळ्य़ात काळॆ ढ्ग जमायचे,
कारण प्रत्येक पावसाळ्यात मी,
फ़क्तं पवसाच्या प्रेमात पडायचे.

शिवानी दाणी
नागपुर

No comments: