Tuesday, May 22, 2007

काय बाबा अठवतय?

काय बाबा अठवतय?
हाच तो पहिला बुट,
मला sale मधुन घेउन दिलेला.
मी दिवस भर हाच बुट घालुन
घर भर फ़िरली होती.
तुम्हा सगळ्यांची दुपार मग
बुट काढ म्हणण्यात
सरली होती.

आहो,तुमचीच मुलगी मी,
तुमचं म्हणणं ऐकणार होती?
जिद्दिचं बाळ्कडू तुम्हीच पाजलं मला,
ऐवढ्या लवकर मी मघार घेणार होती?
शक्यच नाही,
मग आई पण तुमच्या लाडा पयी
वैतागली होती.............................

त्या दिवशी रत्री पण,
मी तेच बुट घालुन झोपली,
मग हळूच येउन तुम्ही ते कढ्ले होते.
सकळी उठुन परत मी,
ह्याच बुटां सठि रडले होते,
मग मत्रं तुमची पण थोडी
सरकली होती..............................

ह्यच बुटांच्या मदतीने
मी पहिलं पाउल टाकलं,
आणि आजवर धावत आहे,
म्हणूनच ते आज पण जपुन
ठेवले अहे,आणि पुढलंही पाउल
ह्यांच्या कडे पाहुन टाकत आहे.
त्यात तुमचं,माझ्या साठी
असलेलं प्रेम,हिम्मत,भविश्यंभेट
आणि स्वप्नं जडली होती...........................................

D shivani
Nagpur

1 comment:

Anonymous said...

mast ahe