Saturday, September 19, 2009

I am fed up of being PERFECT

लोकांना स्वतः मध्ये perfection
आणायला वर्ष उलटु द्यावी लागतात,
इथे जन्मजात सोन्याचं नशीब न जोडिला,
माणकाचं नाही तर कित्येक मण कैफ़
पायात घुटमळतात....

पाय मारील तिथुन कशाला रे पाणी काढलं,
कौतुकापेक्षा जळणारे जास्तं झाले....
हाथानी तारे तुटतील,ऎव्हढंच मोठं व्हायच
होतं,तसं मला.
पण चायला आजकाल तारे पण त्यांचे प्रोब्लेम्स
येऊन मला सांगतात...

मेहनत केली खरी,पण परिस्थीती ते करण्यास
तु आणली नं....
जीद्द मनात सहस्त्रं आयुष्य पादाक्रांत
करयची का रे जागवली मनात....
शेकडो वेळा पडले मी रस्त्यात,
प्रत्येक वेळी उठुन ध्येय गाठण्याचं धैर्य आपसुकच
मनात धगत होतं....
आग होती जींकण्याची...न मी जींकले सुद्धा....

खुप उंचावर येऊन गेले यार...
इथे लोक आहेत आजुबाअजुला पण जवळ मात्रं कोणीच नाही...
माझ्या उंचीचा complex आहे की भीती,तुलाच ठाऊक,
च्यायला इथे कोणी मनाला फ़ुटलेला पाझर बघायला कोणीच नाही...
perfect असली तरी मी पण साधाराण मनुष्य रे...
जींकणं शौक जरी असला माझा,तरी
प्रेमासाठी हजार वेळा हारायला मला ही आवडेल...
माझ्या शब्दावर,हजारो निर्णय बदलतात आता,
पण त्याने शब्दं न उगारता सुद्धा त्याच्या साठी माझे निर्णय
बदलवायला मला ही आवडेल....
oh god पण हे perfection अन हा विजय आड येतोय ....
perfection n success हवी होती नेहमी,
पण आयुष्यात जर का ती एकटे पणा देणार असेल तर
seriously देवा I am fed up of this PERFECTION n SUCCESS.....

D shivaनी
Nagpoor

No comments: