Monday, September 21, 2009

लिंबु चमचा...


जींकायचं सगळ्यांना असतं,
मग कोणाला कुठ्ल्या ध्येयासाठी,
तर कुणाला समधाना साठी,
कदाचीत तेच त्यांचं ध्येय असणार...
ह्या मार्गात,ध्येयाच्या धासात
आजुबाजुला कुणीच दिसत नाही..
आणि दिसायला पण नको नं,
ध्येय जे गाठायचं असतं,
शिखरावर पोहोचल्यावर हार तुरे
खुप मिळत असतात,मायेनं फ़िरवणारा
हाथ,आणि शेअर करणारा जोडिदार
फ़ारच कमी लोकांच्या नशीबी असतो..
मग अचानक मन विचार करु लागतं,
हाच तो विजय,हेच ते ध्येयं,
ज्या साठी आजवर इतके
compromises केले???
कशासाठी न का?
सुख म्हणता येईल ,ते वैभव,संपत्ती,
सम्रुद्धी,नाव सगळं आहे...
पण समाधान?????
न good companion????

म्हणुन वाटतं...

अयुष्य नं,लिंबु चमच्याची रेस आहे,
लिंबु घेउनच फ़िनिशिंग लाईन पार गेली तर
खरं जींकणं आणि तीच गम्मत आहे,
नाही तर खरं सांगते टोटल गफ़लत आहे..

D shivaनी
Nagpoor

No comments: