Friday, February 20, 2009

पुन्हा येणार नाही.

हजार घाव केलेच नाही कुणी,
ऎसा केला,तो भरलाच नाही.
एक सुई आर पार निघावी,
कवच ऎसा तटस्थ राहिलाच नाही.

कधी न हरले मी आज वर तसे,
ऎसी हरले मग ऊठणारच नाही.
एक वार,निर्णायक ठरला आज,
डाव ऎसा पुन्हा मांडणारच नाही.

जे शोधले ते नेमके हरवले मजपासुन,
ऎसॆ ्गेले दुर,समीप आलेच नाही.
एक चुकामुक झाली ्जवळुनच,
श्वास ऎसा पुन्हा येणार नाही.

D shivaनी
Nagpoor
15th feb 2009

No comments: