Tuesday, February 3, 2009

उत्तर हवय

दर वेळी प्रत्येक घडीला
एकच प्रश्नं
मनात काफ़ुर माचवतो.
प्रत्येक घडीला दर वे्ळी
एकच उत्तर
मन गहिरा सुर मारतो.

अगणीक वेदना झेलल्या,
तुझ्या साठी
एकटेपण फ़क्तं मिळालं .
वेदना झेलल्या अगणिक,
माझ्या साठी
विसरावं तुला गिरवलं.

का?

तु आलास,आणि काही वेळातच
पोरकं करुन गेला.
नेहमी साठी.
पोरकं करुन गेला.
मी थांबवलं आयुष्याला,निस्तब्धच.

तुला १०८ आणि अजुन कितीतरी
afairs करण्याची अनुमती.
आणि चायला इथे,
एकाला सुद्धा पुर्तता नाही?
फ़क्तं ही तुझी निति आणि 
तुच रचवलेली किमया आणि दुनिया?
का?

आता उत्तर हवय,खुप झालं?
ही वर्षानुवर्ष चालत आले्ली माझी
घुसमठ कु्ठेतरी थांबायला हवी.
आता कंटाळ आलाय,तुझी वाट
बघण्याचा.
पण मन सुद्धा तुझ्याशिवाय अजुन 
कुणालाच आपलं करत नाही.
आता उत्तर हवय.............

No comments: