Tuesday, February 10, 2009

ड्राय

आधीच उशिर,
आईचा फ़ोन,तिला १० मिन येते म्हणुन सांगीतलं.
मैत्रीणीच्या वाढदिवसाची पार्टी तशी तिच्या
विनाच मनवत होतो.
तिच्या शिवाय तिच्याच घरी तसं खुप मज्जा करत होतो.
ती तिच्या मित्रा्ला भेटायला गेली होती.
तिची वाट बघण्यात मात्रं माझी जाम वाट लागली होती.
आधीच उशिर...............
त्यात राडा[असं अजिबात म्हणवत नाही]झाला,
गाडी ड्राय झाली,नविन गाडी अंदाज थोडा चुकला.
पण बरच झालं,
माझी गाडी ड्राय त्याच्या घराच्या खाली झाली.
काय नशिब माझं,देवाने नेमकी टायमींग सेट केली.
त्याला आवर्जुन फ़ोन केला.
त्यानी कधी नव्हे ते पहिल्याच रींग मधे उचलला.
तो घरी नव्हता.पण यायला एका पायावर तयार होता.
मी त्याच्या वाटेत हळुहळु १०० मिटर गाडी खिचली.
तो हि हुशार,त्याने पेट्रोल आणण्याची बात अशिच उडवली.
स्वतःचि गाडी रस्त्याच्या कडेला पार्क केली.
आणी मग मझीच गाडी आपल्या हाथात घेतली.
उरलेले ११०० मिटर त्याच्या हाथात माझी गाडी.
आणि माझ्या हाथात त्याचं मन.
प्रत्येक पावलात त्याच्या स्वाधिन करत उगाळणारं मन चंदन.
कधी पेट्ोल पंप आला,[आणि का आला?]कळलच नाही.
त्याच्या बोलण्यात रस्ता कधी संपला कळलच नाही.
आधिच उशिर................
भरलेलं पेट्रोल आणि मग त्याला त्याच्या गाडी पर्यंत मी 
दिलेली लिफ़्ट.
क्या बात है.
मी कधीच विसरु शकणार नाही.
बस असच त्यानी माझ्या आयुष्याच्या गाडिला खिचावं,
ऎवढच मागते देवा........
दिलही असतं त्याने,मी आधी सांगीतलं असतं तर.....
त्याच्याही आयुष्यात कोणी तरि आधीच होती.
म्हणाला.
झाला थोडा उशिर........................

D shivaनी
Nagpoor

No comments: