Monday, February 23, 2009

kaa?

जगतानी म्हंटले मजला,
तु विसर सारे जे झाले मागे.
विरले सारे नाते आपुले,
पण उरले आठवणींचे धागे.

त्या धाग्याला मी जपले,
नेहमी ठेवले मनाच्या कुपित.
आज आले मोहोर त्याला,
उघडले सारे नात्याचे गुपित.

गुपित कळ्ले जगताला जरी,
तरी तुला ते गवसलेच नाही ना?
आज झाले पोरकी मी तुझ्याविना,
कधी तुला प्रेम कळलेच नाही का?

D shivaनी
Nagpoor
23rd feb09

Saturday, February 21, 2009

पुर आला भावनांचा.

कैकदा मी मांडला तो
खेळ होता जीवनाचा.
एकदा उलटला असा की,
पुर आला भावनांचा.

बळ नाहि पंखात या,
अन द्रुष्टीही धुसरशी.
उठु कशी ह्या स्पर्धेत आता,
पुर आला भावनांचा.

थकुन गेले पावलेही,
इच्छा कुठे हरवुन गेली.
स्वप्नं भंगली अशी जणु,
पुर आला भावनांचा.

विसरले नैतिकता
मी खोट्याच्या उंबर्यावर,
परतु कशी मी जगतात ह्या,
पुर आला भावनांचा. 

D shivaनी
Nagpoor

Friday, February 20, 2009

पुन्हा येणार नाही.

हजार घाव केलेच नाही कुणी,
ऎसा केला,तो भरलाच नाही.
एक सुई आर पार निघावी,
कवच ऎसा तटस्थ राहिलाच नाही.

कधी न हरले मी आज वर तसे,
ऎसी हरले मग ऊठणारच नाही.
एक वार,निर्णायक ठरला आज,
डाव ऎसा पुन्हा मांडणारच नाही.

जे शोधले ते नेमके हरवले मजपासुन,
ऎसॆ ्गेले दुर,समीप आलेच नाही.
एक चुकामुक झाली ्जवळुनच,
श्वास ऎसा पुन्हा येणार नाही.

D shivaनी
Nagpoor
15th feb 2009

Tuesday, February 10, 2009

ड्राय

आधीच उशिर,
आईचा फ़ोन,तिला १० मिन येते म्हणुन सांगीतलं.
मैत्रीणीच्या वाढदिवसाची पार्टी तशी तिच्या
विनाच मनवत होतो.
तिच्या शिवाय तिच्याच घरी तसं खुप मज्जा करत होतो.
ती तिच्या मित्रा्ला भेटायला गेली होती.
तिची वाट बघण्यात मात्रं माझी जाम वाट लागली होती.
आधीच उशिर...............
त्यात राडा[असं अजिबात म्हणवत नाही]झाला,
गाडी ड्राय झाली,नविन गाडी अंदाज थोडा चुकला.
पण बरच झालं,
माझी गाडी ड्राय त्याच्या घराच्या खाली झाली.
काय नशिब माझं,देवाने नेमकी टायमींग सेट केली.
त्याला आवर्जुन फ़ोन केला.
त्यानी कधी नव्हे ते पहिल्याच रींग मधे उचलला.
तो घरी नव्हता.पण यायला एका पायावर तयार होता.
मी त्याच्या वाटेत हळुहळु १०० मिटर गाडी खिचली.
तो हि हुशार,त्याने पेट्रोल आणण्याची बात अशिच उडवली.
स्वतःचि गाडी रस्त्याच्या कडेला पार्क केली.
आणी मग मझीच गाडी आपल्या हाथात घेतली.
उरलेले ११०० मिटर त्याच्या हाथात माझी गाडी.
आणि माझ्या हाथात त्याचं मन.
प्रत्येक पावलात त्याच्या स्वाधिन करत उगाळणारं मन चंदन.
कधी पेट्ोल पंप आला,[आणि का आला?]कळलच नाही.
त्याच्या बोलण्यात रस्ता कधी संपला कळलच नाही.
आधिच उशिर................
भरलेलं पेट्रोल आणि मग त्याला त्याच्या गाडी पर्यंत मी 
दिलेली लिफ़्ट.
क्या बात है.
मी कधीच विसरु शकणार नाही.
बस असच त्यानी माझ्या आयुष्याच्या गाडिला खिचावं,
ऎवढच मागते देवा........
दिलही असतं त्याने,मी आधी सांगीतलं असतं तर.....
त्याच्याही आयुष्यात कोणी तरि आधीच होती.
म्हणाला.
झाला थोडा उशिर........................

D shivaनी
Nagpoor

Tuesday, February 3, 2009

उत्तर हवय

दर वेळी प्रत्येक घडीला
एकच प्रश्नं
मनात काफ़ुर माचवतो.
प्रत्येक घडीला दर वे्ळी
एकच उत्तर
मन गहिरा सुर मारतो.

अगणीक वेदना झेलल्या,
तुझ्या साठी
एकटेपण फ़क्तं मिळालं .
वेदना झेलल्या अगणिक,
माझ्या साठी
विसरावं तुला गिरवलं.

का?

तु आलास,आणि काही वेळातच
पोरकं करुन गेला.
नेहमी साठी.
पोरकं करुन गेला.
मी थांबवलं आयुष्याला,निस्तब्धच.

तुला १०८ आणि अजुन कितीतरी
afairs करण्याची अनुमती.
आणि चायला इथे,
एकाला सुद्धा पुर्तता नाही?
फ़क्तं ही तुझी निति आणि 
तुच रचवलेली किमया आणि दुनिया?
का?

आता उत्तर हवय,खुप झालं?
ही वर्षानुवर्ष चालत आले्ली माझी
घुसमठ कु्ठेतरी थांबायला हवी.
आता कंटाळ आलाय,तुझी वाट
बघण्याचा.
पण मन सुद्धा तुझ्याशिवाय अजुन 
कुणालाच आपलं करत नाही.
आता उत्तर हवय.............

Monday, February 2, 2009

होई ना

तहानेला व्याकुळ चातक,
प्रसन्ना व्हावे ..........आभाळ माने ना.

तपश चमकवे म्रुगजळाला,
त्रुप्तं करावे..........भौतिक समजे ना.

साद घालती प्रेमाची,
प्रतिसाद द्यावा.......सख्याला कळे ना.

राधेची मी मीरा झाली,
रुक्मिणी करावी.....कान्ह्यला उमगे ना.

D shivaनी
Nagpoor