Monday, May 26, 2008

मस्तानी.....

नितळ कान्ती तीची,अन सुरेख वाणी..
गोरा वर्ण तीचा,नामे मस्तानी.....

वाखाण्यजोगं सौन्दर्य तीचं
बजीरावाने जपलं...............
लोकांने मात्र ह्याला व्यव्हीचाराचं
नाव दिलं......

मला ह्यात काहीच वावगं वाट्त नाही.
मस्तानी सोबत हा न्याय पण वाट्त नाही
प्रत्येक सौंदर्याचं कौतुक हा मानवतेचा
संस्कार आहे.
बाजीरावाने तो जपला,व्यव्हीचार
मानणार्यांवर केलेला प्रहार आहे.


(नैतिकता बाजुला ठेउन निव्वळ,मस्तानीच्या सौंदर्याला उद्देशुन मनात उमटलेल्या ह्या ओळी,please dont take it otherwise)

D shivaनी
nagpoor

Thursday, May 22, 2008

hi bhasha premachi,
he nata manacha........
dharmaviranna thauk ranangan
aani gaan sanharacha.
kashya kaltil ya bhavna,
tujhi apeksha fol tharel.......
tu bindast prem kar,
tujha prem premvirannaa mol tharel.............

Wednesday, May 21, 2008

कारण हरलेय मी आज..


मन धाव घेतय फ़क्तं तुझिच
कारण हरलेय मी आज..

जणु घ्यायाळ मी अजुनी,
स्वप्नं मनात दफ़न
आणि अश्रु नयनी.
का मान्य नाही माझ्या
सुरांन्ना तुझा साज???
कारण हरलेयय मी आज..

तुला ठाउक आहे दुःखं,
as you say,
"the pain of refusal of love"
आणि होणार्या अनावर वेदना,
संपले ते क्शण,स्वप्नं
आणि माझ्या संवेदना.
माझ्या नशिबाला ही
नुकताच चढ्लाय माज..
कारण हरलेय मी आज..

रागाउ तरी कुणावर?
तुझ्यावर?स्वतःवर?
की तुझ्यावर केलेल्या
अक्शम्यं प्रेमावर??
माझ्या प्रेमालाही नाही
त्याच्या स्पंदनांची लाज..
कारण हरलेय मी आज..

D shivaनी
nagpoor

Thursday, May 15, 2008

continued to ha ek adbhut prayatna

त्या धुरालाही तुझ्याच
प्रतीमेची आस
तू कुठेच नसताना
सारखे तुझेच भास
श्वास घेतानाही
बोचातात तुझ्याच आठवाणी
साला............
म्हाणुनच मी श्वासालाच नाकारल

ही कैफीयत तुझ्या प्रेमाची
मला मृत्युलाही कवटाळू देत नाही
ओढल मला या आमानुष जगतात
उधार म्हणुन पण माझ आयुष्य
क्षणभर घेत नाही.
कोंडलेल्या तुझ्या प्रेमाच्या खोलीत
मी असच कुढत जगण्याच ठरवल

D shivani
nagpoor

Tuesday, May 13, 2008

एक अद्भुत प्रयत्न


एक अद्भुत प्रयत्न

श्वास घेतांना ,आठ्वणिच्या प्रत्येक
क्शणाला मी गिळलं
आणि श्वास सोडतांना
सगळं धुरात मिसळवलं.

आज नकोच ते आठ्वणींचं
डोळ्यात तरळणं,
म्हणुन त्याचं जग मी
डोळ्याबाहेर ओघळवलं.

माझ्या मनाचा आक्रोश
नाही कळायचा त्याला,
म्हणुन त्याच्या आनंदात
मी जगणं मालवलं.

हा एक अद्भुत प्रयत्नं,
मला क्शितिजा पार नेइल,
पण तेव्हाही तु माझ्यातच असशिल
हे मला तेव्हा जाणवलं.

तु असशील ह्या पार तेव्हाला
मी क्शितिजा पार असेन,
तु जिंकावं प्रेम तुझं
म्हणुन मी स्वतःला हरवलं.

मी जगेलही तेव्हा,
तुझ्या नसण्यात रमुन जाईल.
मी धुर बनवला तेव्हा,
आज मढाला धुराने कवटाळलं

D shivaनी
nagpoor

Friday, May 2, 2008

स्वस्तं झाली माणुसकी.............

महगाई वाढ्ली म्हणे,
दारु स्वस्तं आणि ,तेल महाग झालं आहे.
पण आपण मुक गीळुन,जास्तं पैसे मोजताना
जपतो भ्रष्टाचाराशी बांधिलकी.
स्वस्तं झाली माणुसकी.............

ह्या विरोधात शक्ती प्रदर्शन करावं,
पोलिसांचा दंडा,आणि उगाच झमेले
कशाला म्हणुन मागे परततो.
एकटा कंठ टाहो फ़ोडतो
आपण महागाई वाढ्ली म्हणुन ,
अर्ध पोटी निजवतो डोळे,विझवतो खिडकी
स्वस्तं झाली माणुसकी.............

बाजारात तरुणीला,काही छेडतात,
नको नको ते बोलतात........
आपण........
आपण मात्र कशाला राडा म्हणुन
तिच्या आब्रु ला दावा वर लाउन
तुडवत निघुन जातो तिची पोटत्तिड्की
स्वस्तं झाली माणुसकी.............

वर्तमान पत्रात,रोज आत्महत्येच्या
बतम्या वाचतो,
कचेरित जाताना,बेबुनियाद
चर्चा करतो........
मदत म्हणुन जेव्हा त्यांच पिक
थेट खरेदी करण्यास गाव बाजाराचं
बोलवणं येत.
तेव्हा कशाला ते भाव करणं आणि चिकचिक
म्हणुन mall चा रस्ता धरतो.
सकाळी म्हणतो मिळत नाही वाचायला चवदार बतमी
स्वस्तं झाली माणुसकी.............


D shivaनी
nagpoor