Sunday, July 1, 2007


आज तो कैफात येवुन बेधुंद कोसळला.
आज तो कैफात येवुन बेधुंद कोसळला.
कदाचित त्याला माझं गुपित कळालं असणार.

कि संघर्षाच्या अन प्रेमाच्या मैदानात
कि संघर्षाच्या अन प्रेमाच्या मैदानात
त्याला जिंकवुन मी मात्र एकटी आज हरणार.

कधी तरी तो मला मिळावा म्हणुन पावसा
तुझ्याशी एक नवस बोलले होते.
कधी तरी तो मला मिळावा म्हणुन पावसा
तुझ्याशी एक नवस बोलले होते.
पण आता नवस कसला फेडते,
त्याच्या आठवणित फक्त झुरणार.

त्याला मी जिंकावं अशी आशा कधिच नव्हति.
त्याला मी जिंकावं अशी आशा कधिच नव्हति.
पण आता,आता त्याच्या विना आयुष्य कसं सरणार?

प्रेमात त्याच्या आकंठ बुडायच होतं
फक्त एकदा
प्रेमात त्याच्या आकंठ बुडायच होतं,
पण आता त्याच्या आठवणिचे फक्त घडे भरणार.

काय सांगु व्यथा माझी, मी पाहीलं स्वःता त्याला तिचा होताना
काय सांगु व्यथा माझी, मी पाहीलं स्वःता त्याला तिचा होताना
ह्या जन्माचं माहीत नाही, पण पुढल्या जन्मी तो माझाच होणार.

शिवानी दाणी
नागपुर

No comments: