Sunday, July 1, 2007

मी कधीचीच मेली आहे..................................


तुझ्या गल्लीच्या खुप चकरा मर्ल्यात,
कि तुझं कधि तरी दर्शन घडावं .
बरेच दिवस हा खेळ चलला ,
हे कदाचित नियतीला पण मान्यं नसावं.

मी तुला विचारणं,
तुझा तो नकारात्मक प्रतिसाद.
तुझं ते दुर जाणं,
आणि मझा माझ्या नशिबाशी झालेला वाद.

नंतर तु कधीही वळून
बघितलं नाही.
आणि असं का?,ह्याचं ऊत्तर
मी कधीही मगितलं नाही.

तु तिचा होतान्ना मी पाहिलं,
आणि तुझ्या आनंदात सहभागी झाली.
मी गळ्लेल्या पाखळ्या,
टप्पोरी कळी व्हायच्या आधी झाली.

नंतर बरीच दिवस झाली,
आज परत त्याच गल्लीच्या तोंडाशी उभी आहे.
तुझ्यासाठी सर्वस्वं हरले,
आता काही कर्तव्यं या भुं वर
आणि स्वप्नं नभी आहे.

मरणावर माझ्या कदाचित
तु ही अश्रु गाळशील,
पण काय सांगु मित्रा,
ह्याच गल्लिच्या तोंडाशि
मी कधीचीच मेली आहे.
मी कधीचीच मेली आहे..................................


शिवानी दाणी
नागपुर.

2 comments:

HAREKRISHNAJI said...

बहोत बेआबरु होकर तेरे कुचे से हम निकले

HAREKRISHNAJI said...

दिल ही तो है न संगोखीस्त दर्द से भर न आये क्यु
रोयंगे हम हजार बार कोई हमे सताये क्यु