Sunday, February 14, 2010

एलर्जी

मला पानझडिच्या
पानां समावेत गळुन गेल्यागत वाटतय,

क्षितीजावर पसरलेल्या
रंगांसारखं,टोटल मिक्स होऊन गेल्यागत वाटतय.

प्रवाहाच्याच दिशेने,
पण थोडं कडेनी प्रवास करावासा वाटतोय.

आणि आकाशात उंच,कधीही
परत न येता येण्यासाठी उडावसं वाटतय...

कटल्यावर पेचातुन पतंगी सारखं,
म्हणेल त्या दिशेनं वाहुन जावं वाटतय..

आले तर खुश ,
अन नाही तर अजुनच खुश मन आज होतय.

कदाचीत मला माणसांची एलर्जी होतेय....
आणि कदाचीत स्वतःची सुद्धा...........

D shivaनी
Nagpoor
21st jan 2010

No comments: