Monday, April 20, 2009

दिवस मागे जातात

दिवस मागे जातात,ओंजळ ही राही रीती.
आसवे झाली कोरडी,अन अधुरी ही प्रीती.!!ध्रु!!

प्रेयसी उवाच...
रंग ओसरुन गेले,काळ्या पांढर्याची पाती.
चव लागे न कशाला,कडु वाटे सार्या बाती.
आसवे झाली कोरडी,अन अधुरी ही प्रीती.!!१!!

प्रियकर उवाच...
सारे हवेत घेतले,दावी लवली मी नाती.
आता एकटा मी आहे,केली आयुष्या्ची माती.
आसवे झाली कोरडी,अन अधुरी ही प्रीती.!!२!!

D shivaनी
Nagpoor

No comments: