Wednesday, April 22, 2009

ATM

काही दिवसांपुर्वी आईला मायक्रोवेव्ह घेऊन दिला.
नवनवीन पदार्थ करण्याची आवड,
म्हणुन तिला ला ही खुप आवडला.
आता रोज रात्री ती माझी 
वाट बघत असते.
कहीतरी नवित खाऊ घालेल,असे रोज म्हणते.
वय झालं तिचं पण.
मी येई पर्यंतं बिचारी,निजलेली असते.
पण मी करते त्या मायक्रोवेव्ह चा उपयोग..
दोन घास गरम करुन गिळण्यासाठी.
माझ्या वाटेत निजलेल्या आईसाठी..
...
आई,
मी पण काय करु?
मायक्रोवेव्ह घ्यायला,ATM मधुन
पैसे काढता येतात गं,
पण ह्या फ़ास्ट आणि competition च्या
लाईफ़ मधे तुझ्या साठी वेळ 
कुठल्या bank च्या कुठल्या ATM मधुन काढू?

D shivaनी
Nagpoor

Monday, April 20, 2009

अनुत्तरीत प्रश्न

पुन्हा तु येणार नसतांना सुद्धा,
वाट तुझी का बघते मी?

आणि तु सापडणार नसतांना सुद्धा,
तुलाच का शोधते मी?

पुसट झाल्या काळाच्या रेशाही आता,
अजु्नही का तुज स्मरते मी?

रोज नवे घर बांधतांना,तुला आठवून,
पाया,पुन्हा का पाडते मी?

आणि तुझ्या अंधुक भेटितुन,स्पष्टं
आठवणीत का झुरते मी?

D shivaनी
Nagpur

दिवस मागे जातात

दिवस मागे जातात,ओंजळ ही राही रीती.
आसवे झाली कोरडी,अन अधुरी ही प्रीती.!!ध्रु!!

प्रेयसी उवाच...
रंग ओसरुन गेले,काळ्या पांढर्याची पाती.
चव लागे न कशाला,कडु वाटे सार्या बाती.
आसवे झाली कोरडी,अन अधुरी ही प्रीती.!!१!!

प्रियकर उवाच...
सारे हवेत घेतले,दावी लवली मी नाती.
आता एकटा मी आहे,केली आयुष्या्ची माती.
आसवे झाली कोरडी,अन अधुरी ही प्रीती.!!२!!

D shivaनी
Nagpoor

Sunday, April 12, 2009

once upon a time

बालिश पणात लिहिलेली ही कविता,जुन्या पुस्तकाच्या मध्ये ठेवलेली सापडली....आणि पोस्ट करतेय....
कविता पण बालीश आहे तशी......


ऎ चांद बेखबर,
तुझे लग रहा है डर.
तुझसेभी खुबसुरत,
मेरा है हमसफ़र.

तु मस्त था अब तक,
आसमा के आगन मे,
नशा भी तेरा बिन्दा्स,
जोशीले आनन मे.
ना थी कोई सीमा,
ना कोई speed breaker ..

सबने नापी खुबसुरती,
तुझसे अपने चांद की.
किसीने कहा तारा,
तारीफ़ की चांद की.
मेरा चांद दुनिया मे
खुबसीरत मगर..........

twist..

आऒ मै अब सुनाऊ,
ईक रोज यु हुवा था,
मै चांदनी बनी थी,
वो चांद इठला रहा था.
मैन बनी उसकी गझल,
और वो बना शायर....
ऎ चांद बेखबर.........

शेर पिरोया गया,
कैफ़ियत,अजिब थी.
किस्मत हुई बेपर्दा,
तनहाई करीब थी.
तुटे यु सपने,न जाने
लगी किसकी नजर...
ऎ चांद बेखबर........

D shivaनी
Nagpoor

once upon

बालिश पणात लिहिलेली ही कविता,जुन्या पुस्तकाच्या मध्ये ठेवलेली सापडली....आणि पोस्ट करतेय....
कविता पण बालीश आहे तशी......


ऎ चांद बेखबर,
तुझे लग रहा है डर.
तुझसेभी खुबसुरत,
मेरा है हमसफ़र.

तु मस्त था अब तक,
आसमा के आगन मे,
ना थी कोई सीमा,
ना कोई speed breaker ..

सबने नापी खुबसुरती,
तुझसे अपने चांद की.
मेरा चांद दुनिया मे
खुबसीरत मगर..........

D shivaनी
Nagpoor

Sunday, April 5, 2009

हास्यखळी आसवात.

हे एक गीत आहे तरुणाई चं.......

वेगवेग्ळे कडवे,वेगळ्या थीम पण मेनकोर्स ना तरुणाई.............

कडकीच्या दिवसात,
बेकारीच्या पावसात,
जुन्या जीन्स मधले २० रु
जणु
हास्यखळी आसवात. 

[एक उदास मुलगी,त्याच्या विरहात]

काहीच दीसत नाही.
हा अंधार अंगणात.
तु चंद्र बनुनी यावा,
जणु
हास्यखळी आसवात. 

[परिक्षेचा टेन्शन मद्ध्ये मुलगा]

रिझल्टच्या टेन्शनात,
ATKT च्या दहशतीत.
AC होण्याची बातमी
जणु
हास्यखळी आसवात. 

[प्रे्मातलं couple ]

प्रेमाच्या मौसमात,
हाथी घेतला मी हाथ.
तु स्वतःच हो म्हणाली,
जणु
हास्यखळी आसवात. 

[सगळे मिळुन]

सारे टेन्शन्स पिवुन घेऊ,
तरुणाईच्या कैफ़ात.
मैत्रीचा नाद म्हणजे,
जणु
हास्यखळी आसवात. 

D shivaनी
Nagpoor