पुन्हा तु येणार नसतांना सुद्धा,
वाट तुझी का बघते मी?
आणि तु सापडणार नसतांना सुद्धा,
तुलाच का शोधते मी?
पुसट झाल्या काळाच्या रेशाही आता,
अजु्नही का तुज स्मरते मी?
रोज नवे घर बांधतांना,तुला आठवून,
पाया,पुन्हा का पाडते मी?
आणि तुझ्या अंधुक भेटितुन,स्पष्टं
आठवणीत का झुरते मी?
D shivaनी
Nagpur

No comments:
Post a Comment