Thursday, March 18, 2010

निखळ जगलो होतो.

अजुनही कातरवेळी
मी जाते त्या पारावर.
जीथे आपण एकदा
सहज विसावलो होतो.

संवादही प्रस्रुती,
ओळखीच्या रस्त्यावर,
जीथे आपण बोलण्यात
गुंग झालो होतो.

तुझे ते हसणे आपसुक,
मी मनात बांधुन ठेवलेय,
त्या चार क्षणांना अवचित,
आपण निखळ जगलो होतो.

D shivaनी
Nagpoor

Sunday, February 14, 2010

एलर्जी

मला पानझडिच्या
पानां समावेत गळुन गेल्यागत वाटतय,

क्षितीजावर पसरलेल्या
रंगांसारखं,टोटल मिक्स होऊन गेल्यागत वाटतय.

प्रवाहाच्याच दिशेने,
पण थोडं कडेनी प्रवास करावासा वाटतोय.

आणि आकाशात उंच,कधीही
परत न येता येण्यासाठी उडावसं वाटतय...

कटल्यावर पेचातुन पतंगी सारखं,
म्हणेल त्या दिशेनं वाहुन जावं वाटतय..

आले तर खुश ,
अन नाही तर अजुनच खुश मन आज होतय.

कदाचीत मला माणसांची एलर्जी होतेय....
आणि कदाचीत स्वतःची सुद्धा...........

D shivaनी
Nagpoor
21st jan 2010

Tuesday, January 19, 2010

तो क्रुष्ण कुठेय?????

सावली आणि वास्तवाचा
लपंडाव.
मनाचे खेळ,विचारांचे झुले,
भावनांचा डाव.

सगळं काही अपुर्ण,पुर्तता फ़क्त आशा.
विश्वासही निलाम झाला,दिशाहीन दिशा.

तोच आशय,तोच निलय,
तिच भुमिका,तिच जाणीव,
तेच निस्वार्थ झोकुन देणं,
तेच एकतारी जगणं,
तेच समाधान,तिच समजदारी
त्याच्या प्रेमाची........
निस्वार्थ मीरा आहे,
असीम प्रेम करणारी रुक्मिणी,
प्रेयसी राधा....
पण काळाच्या ह्या ओघात
तो क्रुष्ण कुठेय?????

D shivaनी
Nagpoor
16th jan 2010