Wednesday, September 10, 2008

माझं निराळं अध्यात्मं...

लोकं बाराही महीने
अठराही काळ माळी जपतात,
आणि मनातुन
मात्रं समोरच्याचं काळं मागतात.
आणि ह्याला लोक
अध्यात्मं म्हणतात.

असं होतं बरं का?
बरेच असे भेटतात सुद्धा,
मी ही त्यांचा मार्गावर
चालावं म्हणुन
फ़ोर्स पण करतात.

पण माझं जरा वेगळच आहे.
मला मनःशांती मिळायला,
हिमालयावर कीवा मठात
जाण्याची गरज कधीही भासत नाही.
आणि भगवंता थॅंक्स,
स्वतःच्या ताटातला घास
भुकेल्याला दिलं ना,
रस्त्याच्या कडेवर थांबुन गरजुला
साईड दिली नं,
की गजबजलेल्या CCD मधे सुद्धा
ती शांती मिळते.
लोक ह्याला माझी पैशाची ऊधळण म्हणतात,
पण माझ्या dictionarइत ह्यालाच अध्यात्मं म्हणतात.

देवाचा वास असावा म्हणुन लोक
धुप दीप लावतात.
म्हणतात की सुगंधात देव वसतो.
पण मला सकाळी सकाळी
मारलेल्या पोहाच्या तर्रित पण हा आनंद लाभतो,
स्वतःसोबत चार गरजुन्ना आणि मित्रांसोबत
ताव मरतांना मनाला देव आनंद भिडतो.
लोक ह्याला माझा अगाउ पणा म्हणतात,
पण माझ्या dictionarइत ह्यालाच अध्यात्मं म्हणतात.

D shivaनी
nagpoor
30 aug 2008
हा एक संवाद आहे माझा आणि राहुल दा आणि सन्तोष चा.
लाल अक्षरं राहुल दा चा reply आणि निळे अक्षरं संतोष चा.
आणि काळे अक्षरं माझा reply.
तेव्हा एक संवाद म्हणुन वाचा आणि कळवा.

माझ्या रुक्षं वाळवंटी जीवनात
नं जरा वेगळच घडलय.

पहीले पालवी फ़ुटली,
ती बहरु लागली.
एका शिकारीने तुला उपटलं.
मात्रं माझ्यात बोन्साय ठेवलं.
आणि मग माझ्यात आभाळ
दाटुन आले,सरी आक्रोषाने
कोसळतात आजही.

माझे आयुष्यं पावसातलं वाळवंटं.
म्हणजेच एक नेहमी वाढत जाणारा
एक अथांग समुद्रा.
नेहमी वाढत जाणारा.
-------------------------------
मी जगते तशी तुझ्यातच,
तुझ्यातच मी निजते.
कधी मोहरावा सुगंधं प्रेमाचा,
म्हणुन चंदनावाणी झिजते.

मी हुंकारते नाम तुझे,
तुझेच चित्रं स्मरते.
मालावलीस ज्योत तु तुझी.
मी सतःला विझवते.

--------------
बोन्साय
खुज नाही .....
छोटं नाही ......
एका चिमटीत मावणारं
ब्रह्मांड !
एका हातात मावणारं
आभाळ !
ज्या पांगळ्यांना नाही ना बघता येत अवकाश
ज्या आंधळ्यांना नाही ना सांधता येत प्रकाश
त्यांच्या साठी
तुझी निर्मिती.......
ब्रह्मदेवाच्या कमंडलूतल्या तीर्थाला आव्हान
देणारी तुझी दुनिया
सारच लाजवाब !
-----------------------

असेलही मी एका चिमटीत मावणारं ब्रह्मांड,
असेलही एका हाथात मावणारं आकाश.
पण...
ज्याच्या अस्तित्वाचं जग मी मानते
त्याचा साठि तर एक खुंट्लेलं झुडुपच ना?

खुप वेदना होतात रे,
जेव्हा माझ्या खुंट्लेल्या वाढिला
सुद्धा लोक एक creative नीर्मिती म्हणतात.

---------------------------

तु निघुन गेल्यावर मनाला खुप घट्टं बांधलय मी.
दोरखंडांनी केलेल्या प्रेमाच्या,कुलुपही लावलय.
मी असते तीथेच,त्याच खोलीत.
अधुन मधुन खिडकीही ऊघडते,
आणि वाट बघते तुझी फ़क्तं तुझी...
किमान आज तरी येउन,ह्या मनाचं
दार उघडुन आत येशील,
बाहेरचं जग तुझ्या डोळ्यात घेउन...?

---------------------------------

तुझ्या विचारात,आठ्वणीत
एकदा फ़क्तंएकदा मरुन
मग निवांत तुझीच म्हणुन
जगेन मी

काय म्हणतो?

कोणाला कानोकान खबरही नाही होउ देणार,
की तुझ्या साठी जीव दिला म्हणुन,
तु फ़क्तं एवढी कबुली दे की,
तु स्वतः माझ्या नसुन असण्य़ाला
प्रचीती देशील.
मग

तुझ्या विचारात,आठ्वणीत
एकदा फ़क्तंएकदा मरुन
मग निवांत तुझीच म्हणुन
जगेन मी

काय म्हणतो?
----------------------------

विरहिणी तू
आभाळाचं मोकळं भान
आणि वा-याचा पदर घेउन
जगणारी तू......
अग् विरहीणी.....
तुझ्या मिठीत असतानापण
तुला नाही जाणवला
माझ्या स्पर्शातला बाजारीपणा..?
तुझ्या केसातुन हात फ़िरवत असताना
माझ्या हातातली थरथर
नाही वाटली कॄत्रिम...?
विरहीणी तू.....
तू तर माझं पा-याचाच रूप
तुझ्यात गोंदुन ठेवल आहेस......
आणी मी असाच
तुझ्या केसातल्या मोग-याचा
वास घेणारा....
अलगद तुला हातावर घेउन
आकाशातुन फ़िरवुन आणणारा.....
माझी म्हणुन जगेन म्हणतेस.....
कशाला आग्रह या मुसाफ़िराला
एका उंब-यात अडकवुन ठेवण्याचा...!!
विरहीणी तू !!!!!!

------------------------------------

मुसाफ़िर असशीलही तु ह्या जगताचा,
प्रेम बाज ही असशील...
माझ्या सठी तर तु रामच ना.
मी तर फ़क्त प्रेम केलं होतं.

तुझ्यातला मुसाफ़ीर बघितला नव्हता.
काय कुणास ठाउक,
लोक म्हणतात तोच डाव चुकला होता.

मी म्हणते चाअलायचच,
तु तुझं ठरव.
मी प्रेम केलय तुझ्यावर,
तुझ्या कडुन प्रेमाचीच अपे्क्षाही होती खरी
पण तु पुर्ती करविच अस नाही.

--------------------------------

पावसात ह्या मी चिंब भिजले आज.
मन मात्रं तुझ्याविना कोरडच राहिलं.

तु नसतांना सोबत माझ्या ह्या जीवनात,
सुखाशी माझं नेहमी भांडणच राहिलं.

कोणी तुला मुसाफ़ीर म्हणतात,कुणी प्रेमबाज,
ह्याच नादात मन माझाशीच फ़ितुर वागलं

--------------------------------

पाऊसच आला भयाण असा..
आणी फुटलेली पालवी गळुन पडली
जो आधार व्हायचा तोच विनाश झाला
झाडाला खुप वाईत वाटल तेव्हां
त्याने आक्रोश केला..
पण तेव्हां पावसाला मात्र दयाच आली नाही..
पालवी गळुन गेली ती कायमचीच ..
तेव्हांपासुन झाडाला नवीन वेध लागलेत ..
वाळवंटाचे..
अगदीच रुक्ष ऊन असेल तरी जीवघेणा पाऊस नसेल त्याच्यात
कधीतरीच बरसेल तो..
पण नव्याने उमललेली पालवी उपटुन नाही टाकणार
त्या पावसासारखी ..

संतोष (कवितेतला) ९८५०९५८१६३

-------------------------

नाही उपटणार नं ती पालवी?
नाही करणार नं ती घोड चुक पुन्हा?

माझ्या त्या व्रुक्षाचं वाळवंट कधीच झालं,
भर वैभवात जगाच्या,ते दुःखानी न्हालं.

ह्या असीम वाळवंटात नियतिने ,
कौस्तवाची पालवी फ़ुलवली.
एकरुप होता होता ती
हरउन ही घेतली.

मझ्या व्रुक्षाला बघुनच कदाचित
आता पुर्णत्वाचे वेध लागले,
मी मात्रं संगम घडउन
कायम अपुर्णच राहिले.

----------------------------

एकदाच आला शेवटचा तु..
सोबत बरसणाऱ्या असंख्य धारा घेऊन,
मी तेव्हांच भिजायला हव होत..
पण .. राहुन गेल..
आणी जेव्हांपासुन ओढ लागलीये अनामीक भिजण्याची
तु मात्र गेलास कायमचा निघुन..
मागे जळजळीत वाळवंट ठेऊन ..
आणी मी पण वेड्यासारखी जळत राहीले
एक ओली पालवी उशाला जपत..
अजुन खुप काही जपायच होत..
पण .. राहुन गेल..
मला बनायच होत, "पुर्ण" तुझ्यात
थोडस फुलायच होत तुझ्या प्रीतीत
राहीलच काही तर थोडस गाणं व्हायच होत..
पण .. राहुन गेल..

संतोष (कवितेतला) ९८५०९५८१६३

------------------------------------

राहुन गेलं जगणं तुझ्या त्या एका नकारात जगताना.
रहुन गेलं उपभोगणं तुझा दुरावा भोगताना.

राहुन गेलं गाणं होणं,तुझ्या साठी विरह गीत गाताना.
राहुन गेलं तुला पलटणं तु शेवटचं जाताना.

राहुन गेले माझे गीत अपुरे तु नसताना सोबतीला,
मुखडा माळला होता मी,तु अंतरा सोबती नेला.

राहुन गेले मरणे पण वास्तवात,मी त्या क्षणीच मेले.
तु स्विकरलं असतं ते तर मी मरुनही असते जगले.

----------------------------------

D shivaनी
nagpoor
20-21 जुलै २००८