आयुष्यं तेच आहे,
पण सोबत तू नाही.
मैफ़िलीत आहे अस्तित्वं माझं
मात्रं मनाला एकटेपण पण सोबतीला नाही.
आयुष्य तेच आहे
रोज नवा रंग.
कधी भॆटती फ़ुले,
कधी सोबतीला निवडूंग.
आयुष्य तेच आहे
कधी दुसर्यांना
हरऊन जिंकणे आहे,
पण कधी दुसर्याला
हरुन जिंकणे आहे
आयुष्य तेच आहे
वीण माहीत नसतांना
प्रेमाचा कशिदा
विणणे आहे.............
आयुष्य तेच आहे
त्याचं नसतांना
असणे आहे,
आणि त्याच्या आठवणिंने
विनाकारण छ्ळणॆ आहे.
आयुष्य तेच आहे
प्रेम आणि कसब
ह्यातली चढाओढ आहे
कधी आंबट,कडु आठवणी
कधी आयुष्यं गोड आहे.
आयुष्य तेच आहे
कधी सावल्यांचा खेळ
कधी अपयशाशी ताळमेळ
आयुष्य तेच आहे.
D shivani
nagpoor

No comments:
Post a Comment